Submitted by A M I T on 11 October, 2011 - 05:06
(चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी )
बायको घरात जंग छेडते खरी
सैनिका जरा जपून जा तुझ्या घरी !
ऑफीसातूनी येता चहा टाकते
घोट घेता त्याचा, विष बरे वाटते
बद्धकोष्ट नाही तरी, उगाच छळते
कॅन्टीनातला चहा बेश्ट त्यापरी !
सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
वाईट करून तोंड, गप्प ढोसला
सोस तू हिला, प्राण आहे तोवरी !
काल शेजारिणीला काय पाहीले !
खिडकीस आज नवे पडदे लागले
लाटण्याने बिनचुक कपाळ भेदले
सुजले कपाळ, लेप लाव त्यावरी !
बायको घरात जंग छेडते खरी
सैनिका जरा जपून जा तुझ्या घरी !
* * *
http://kolaantudya.blogspot.com/
( मुळात मी हे विडंबन हितगुजच्या २००७ मधील दिवाळी अंकात 'मिल्या' यांनी लिहलेल्या याच गीताच्या विडंबनावरून प्रेरणा घेवून लिहले. मिल्या यांनी लिहलेलं ते विडंबन प्रचंड प्रभावी आहे.. अगदी मी लिहलेल्या या विडंबनापेक्षाही कितीतरी..! )
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
छान जमलय
छान जमलय
खूप हसले रे... लाटणं - जवळपास
खूप हसले रे...
लाटणं - जवळपास प्रत्येक विडम्बानात डोकावतय रे
सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
वाईट करून तोंड, गप्प ढोसला
>>
(No subject)
अजुन काहितरी पाहिजे
अजुन काहितरी पाहिजे होत.(बायको म्हणते मग पोळपाट डोक्यात पडला असता)
आईआईगं
आईआईगं
बायकोबद्दल काय दिव्य स्वप्नं
बायकोबद्दल काय दिव्य स्वप्नं रंगवतोयस लग्नाआधीच !!
कॅन्टीनातला चहा बेश्ट त्यापरी
कॅन्टीनातला चहा बेश्ट त्यापरी !
जबरी! सुप बनवून असा डाव
जबरी!
सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
'पाटणकरांचा काढा' हे खतरी आहे!
काल शेजारिणीला काय पाहीले
काल शेजारिणीला काय पाहीले !
खिडकीस आज नवे पडदे लागले >>
एकदम झ्याक!!!
आरे राजा, शेजारयावर प्रेम
आरे राजा,
शेजारयावर प्रेम करावे पण पुरुष्यांनी पुरुष्यांवर आणि
स्त्रियांनी स्त्रियांवर ! कुणी कुणा सोबत भांडणे करू नयेत हा अर्थ घ्यावा.
सुप बनवून असा डाव
सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
वाईट करून तोंड, गप्प ढोसला...............अरेरे देवा
अरे म्हणुन बघितले रे
लय भारी अमित.
लय भारी अमित.
(No subject)
अमित
अमित _____________________/\_______________________

_____________________/\_______________________
_____________________/\_______________________
काल शेजारिणीला काय पाहीले !
खिडकीस आज नवे पडदे लागले
लाटण्याने बिनचुक कपाळ भेदले
सुजले कपाळ, लेप लाव त्यावरी !>>>>>लय भारी.
मजेशीर आहे गड्या
मजेशीर आहे गड्या
हाहाहाहाहा...च्या सर्र्व
हाहाहाहाहा...च्या सर्र्व स्मायलीज!!!!!!!!!!
अमित ___/\___ दंडवत रे भौ
अमित ___/\___ दंडवत रे भौ
अमित पेटलाय! का पेटवला गेलाय
अमित पेटलाय!
का पेटवला गेलाय
आभार
आभार
.
.
मस्त मस्त मस्त...!!!
मस्त मस्त मस्त...!!!