कविवर्य निशिकांत यांची"आणले तारे नभीचे" ही गझल वाचताना डोक्यात घुसलेली कल्पना................
निशिकांत यांची प्रामाणिकपणे क्षमा मागुन लिहित आहे.
आणले पापलेट बोंबिल , ये घरी जेवून जा
आमटीतील शिंपल्याना भसाभसा चोखून खा !!
तू मला औसानघातकी का म्हणावे नाकळे
गत रविवारी नच मिळाले,हा माझा रे दोष का!!
तूला मासे खावू घालण्या पैसे खर्चावे किती
कर्ज काढूनी आणितो रे, खायला तू येत जा !!
पापलेट नासके आहे, बोंबिल नाहि भाजले
असे म्हणुनी सर्व काही फस्त तू करित जा !!
कुठून हा राक्षस येतो, बायको माझी भांडते
पोरे बापडी पाहती रे शिव्याशाप खाऊन जा!!
आज खाल्ले पुन्हा नाही हे मनी जाणून घे
जाता जाता बडिसोपचा बकाना मारुन जा !!
टोपात उरले फक्त आता कोकमाचे तुकडे
पाहिजे तर ते सुध्दा जाताना भुरकून जा !!
भुक माझी मरुन गेली पाहुन रिती पातेली
स्वखर्चाने विकत घेउनी यापुढे तू खात जा!!
आभार माणुनी निशिकांता अनंता गातो फझल ही
क्षमा असावी गझलकारों नाही आहे गझल ही!!
टोपात उरले फक्त आता कोकमाचे
टोपात उरले फक्त आता कोकमाचे तुकडे
पाहिजे तर ते सुध्दा जाताना भुरकूण जा !!
क्षमा असावी गझलकारों नाही आहे गझल ही!! >>.
(ते 'गझलाकारांनो' करा)
जमलेय
जमलेय
(No subject)
(No subject)
धन्यवाद दोस्तहो!
धन्यवाद दोस्तहो!
आवडली. छान सेन्स ऑफ ह्युमर.
आवडली. छान सेन्स ऑफ ह्युमर. पुलेशु.
निशिकांतजी खुप खुप आभार.
निशिकांतजी खुप खुप आभार.
छान.. पण सगळीकडे 'ण' का
छान.. पण सगळीकडे 'ण' का वापरलाय.. ? की मला खरी कविता माहित नसल्यामुळे गोंधळ आहे.
परदेसाईजी दुरुस्ती केली
परदेसाईजी दुरुस्ती केली आहे,धन्यवाद.
छान विनोद
छान विनोद
धन्यवाद पाभेजी.
धन्यवाद पाभेजी.