माझं भुंकणं!!
Submitted by खारीक on 3 October, 2011 - 07:44
बागीची क्षमा मागून.. 
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/29384
आज वहाण मागायला
तू दारी आलास.... बाटाचं!
अगदी काल-परवा,
जी वहाण मी चावून
चघळून फेकून दिली,
तिचीच जोड एका पायात घालून....
जोरात कर्कश भुंकून,
उभा होतो तुला सामोरा,
भुंकण्याच्या आवाजाचा
प्रतिध्वनीही आला... चाळीच्या कानाकोपर्यातून
घुमत...
तू रस्त्यावर एकाच चपलेत उभा असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....
पोटातून नाकापर्यंत आलीच
ढेकर तुझ्या वहाणेची,
मनमुराद रेंगाळू दिली चव जिभेवर....
आज मी भुंकलो होतो....
पण;
गळणार्या लाळेचं कारण मात्र
अनाकलनीयच!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा