दिवसास माझे.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 October, 2011 - 00:00

आमची प्रेरणा : दिवसास माझे

दिवसास माझे किती हे दिलासे
संध्याकाळ माझी करते खुलासे
तुझा विरह का हा दाटून येतो
होतात सिगरेटचे, 'कश' माझे उसासे

तशी फारशी ही नसे आर्तता
तू जाता उदरी, सरते व्यर्थता
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता

घेऊन फिरतो सिगरेटी कुणाच्या
बहरतात गात्री आठवा कधींच्या
हलकेच ग्लासात तिज ओततो मी
चुकवुन नजरा अधाशी सोबत्यांच्या

थेंब पाण्याचे घसा जाळतात
अखेरचे घोट का मला टाळतात?
हरवून जाते कधी शुद्ध माझी,
इशारे साकिचे तसेही पाळतात

आता सांज होईल गडे 'चांदणी'
असावी वोडका, अन साथ रमणी
हाणुन चखणा मग मी धुंद व्हावे
किती ग्लास झाले चिंता 'बिलाची' !

हुकुमावरून....
अखिल सिंहगड रोड "चांदणीबार" सदस्य समिती

गुलमोहर: 

पिले पिले पिले,पिले पिले पिले
गावटी देशी पिउन यारो
झुम झुम तुम झिंगलो यारो
पिले पिले पिले,पिले पिले पिले.

तुमची मस्त्,पहिल्या धारेची.

तुझा विरह का हा दाटून येतो
होतात सिगरेटचे, 'कश' माझे उसासे

दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता >>>>> हे भारीय विश्ल्या... Biggrin 'तर्राट' झालो !!!

तू जाता उदरी, सरते व्यर्थता
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता >>>>
हे मस्तच ..... Happy

Lol