Submitted by उमेश कोठीकर on 31 October, 2009 - 01:37
श्रेष्ठ कवी श्री वैभव जोशी यांची माफी मागून.
मूळ कविता येथे (http://www.maayboli.com/node/7658)
............................................................................
हे 'झाड' पाहिलस?
हे आधी मानवी शरीर होतं फक्त...
कवीच्या मुंजाने धरण्याआधी...
नशीबाने रिकामं 'झाड' मिळालं
फिरत फिरत मुंजा इकडे डोकावला
मुंजा मेहेरबान झाला
आणि हे रूजलं
कवीचं 'झाड' म्हणून नावारूपाला आलं
हळुहळू याला वाटू लागलं की
आपण धरतो त्याच 'झाडाचे' डोके सुपीक
आपण प्रसवलो तरच शब्दांना अस्तित्व
आपलं 'फुगणं' तर 'झाडा'ची गरज
आपण चुकलो तरच टीकाकारांना महत्व
आता कधीतरी....
याच मुंजाची लहर फिरली तर
कवी म्हणून मुळासकट उखडलं जाईल हे 'झाड'
आणि तेंव्हा याला कुणी कवी म्हणूनही ओळखणार नाही
...............
हा कवी पाहिलास?
हा आधी एक माणूस होता... फक्त!!!
गुलमोहर:
शेअर करा
उमेशराव, काय राव ? नशीब मी
उमेशराव, काय राव ?
नशीब मी कवी नाही. फक्त झाड आहे.
आता विडंबन पण का? भारीच
आता विडंबन पण का? भारीच प्रकार.. सुटला आहेस अगदी.. !!!
वा.. शेवटच्या दोन ओळी खासच!
वा.. शेवटच्या दोन ओळी खासच!