शूर आम्ही उमेदवार

Submitted by स्मितागद्रे on 3 October, 2009 - 10:33

"शूर आम्ही सरदारच्या"निर्मिकांची क्षमा मागुन

शूर आम्ही उमेदवार आम्हाला काय कुणाची भिती
पैसा, सत्ता आणि किर्ती पायी , मतदार धरले वेठी

सत्तेच्या धुंदीत विसरलो देशाचे या हित
खुर्ची संगे लगीन लागल, जडली येडी प्रीत
सत्ते पायी विसरुन गेलो सारी नाती गोती

जिंकाव वा मारुन जिंकाव हेच आम्हाला ठावं
निवडणूकांच्या वेळीच देतो मतदारांना भाव
देशा वर जरी आली संकटे,विसरुन जातो निती

गुलमोहर: 

बाईच्या पदरात इसरलो, देसाचं या हित
घड्याळाशी लगीन लागल, कोडगी रे ही प्रित
लाख विकेट झेलून घेईन अशी आघाडी होती...

साम, दाम अन बंडा पायी IPL घेतलं हाती...
क्रूर आम्ही पॉवर आम्हाला हाय कोणाची भिती... Sad

फार लवकर आटोपलीस उमेदवारी... अजून गुर्‍हाळ चालवता आलं असतं की..
हे उमेदवार इतक्यात गप बसणारे वाटले काय काय तुला?

विडंबन मस्त जमलंय पण... Happy