Submitted by kalpana_053 on 4 October, 2009 - 07:06
'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' या कवितेवरील विडंबन....
देवाच्या खांद्यावर भक्ताचे ओझे?
'प्रेमा'साठी प्रेमवीर तळ ठोकून?
कोण बोले वंशासाठी नवस फेडीन?
आरोग्याची आस कुणी मनांत ठेवून
वरी कसे ठेवतात नैवेद्य हे ताजे
गुन्हे सारे जाती येथे नमून बोलून
काळा पैसा अंधारात हुंडीत घालून
देवापाशी घेती सजा 'आबातोबा' करून
म्हणती हे भक्तवीर आम्ही देवभोळे
देवाच्या खांद्यावर भक्ताचे ओझे?
गुलमोहर:
शेअर करा
गुन्हे सारे जाती येथे नमून
गुन्हे सारे जाती येथे नमून बोलून
देवाच्या खांद्यावर भक्ताचे ओझे?
खरच बिचारा देव!
-छान.
दमदार हाय. व्हा फुडं. आजून
दमदार हाय. व्हा फुडं. आजून येऊंद्या.
छान !!!!!
छान !!!!!
मस्त !!!!!
मस्त !!!!!