Submitted by कौतुक शिरोडकर on 26 October, 2009 - 02:48
(प्राजू यांना अपेक्षित (http://www.maayboli.com/node/11585) असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती)
घरात अपुल्या भरून उरल्या
मद्यराणीचा सुवास तू
वेगवेगळ्या गचाळ गंधाची
उभी ठाकलेली रास तू
क्षणैक जागेवरी न थांबे
लडखडणारा त्रास तू
मित्रांच्या कुबड्या करुनी
तरंगणारा भकास तू
अखंड रिचवणारा... झरझर
घोट संस्कृतीचा दास तू
चाखण्यावरती पोसलेली
तुंदीलतनू आरास तू
डोळे मिटूनी तुला पहावे..
ग्लास तू ..... ग्लासात तू
तुझ्याविना ते कसे जगावे
मद्यकर्त्याचा श्वास तू
पेगवेड्या त्या जनांना
लागलेला ध्यास तू..
बाटलीतील उत्कटतेचा
झिंगला उल्हास तू
सदा सदाच पीत रहावे
न संपणारा प्रवास तू
काल बेवडा... आज बेवडा
हवाहवासा हव्यास तू..
गुलमोहर:
शेअर करा
छान .... विडंबन ... अगदी
छान .... विडंबन ... अगदी `ड' या अक्षरावर असलेल्या अनूस्वारासारखं लक्षवेधी
सस्नेह
देवनिनाद
हा हा हा......धमाल!
हा हा हा......धमाल!:D:-D
मस्त जमलेली आहे (हात)भट्टी
मस्त जमलेली आहे (हात)भट्टी कौतुकराव !
वरचा देवनिनाद प्रतिसाद कळायला दोन मिनीटं विचार करावा लागला. मग वाटलं ....................! लोकांचं लक्ष कुठे वेधलं जाइल याचा नेम नाही आजकाल !
मस्त विडंबन..... आवडले.....
मस्त विडंबन..... आवडले.....
.धमाल!
.धमाल!
छानच....
छानच....:स्मित:
खुप विनोदी ! छान!
खुप विनोदी !
छान!
कौतुक तुझं खूप कौतुक
कौतुक तुझं खूप कौतुक