विडंबन

या मुलींच्या साधेपणाची काय वर्णावी कथा..

Submitted by ऋयाम on 27 January, 2010 - 08:04

आम्ही पण.... आम्ही पण...

रेणू यांची माफी मागुन
(मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा…. http://www.maayboli.com/node/13639)
अर्र.. माफी म्हटलं का चुकुन? :o

या मुलींच्या साधेपणाची
काय वर्णावी कथा..
लवते त्यांपुढे शीर..
काय सांगु गाथा??

"अबाउट मी" यांचं पाहिलं
तर असते तिसरीच माहिती,
बोलु नका म्हणे माझ्याशी कारण,
ओळखीच्यांशीच माझे स्नेह आणि प्रिती...

म्हणे मी आलीये इथे
फक्त ओळखीच्यांनाच भेटायला
आम्ही जणु विचारतोय हिला
काय, येतीस काय खंडाळ्याला??

पण, जरा पोरींशी बोललं, सांगा बिघडलं कुठे,
ढापली पोरांनी कविता एखादी.. सांगा बिघडलं कुठे?

गुलमोहर: 

बायकोच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा….

Submitted by वर्षा_म on 27 January, 2010 - 03:29

रेणू यांची माफी मागुन

मुळ कविता
http://www.maayboli.com/node/13639

/////////////////////////////////////////////////

बायकोच्या चालूगिरीची
काय वर्णांवी गाथा….
तडतडते शीर नि
ठणठणतो माथा…

बोला की हो माझ्याशी
बोलायचे आहे मला खूप…
माहेराला जायचे असेल
म्हणुन पोळीवर माझ्या तुप

तुमचे नाव कोरले मनात
तूम्हीच सर्वांहून खास…
माहित आहे मला
झालाय आता तुरुंगवास

इंप्रेशन मग पाडायला
दिले पदार्थ करायला टेस्ट
स्वयंपाकघर जरा आवरता का
सगळीच मेहनत वेस्ट….

थांबा म्हटली जरा
वेगळ्या नाहीत आपल्या वाटा….
कुठल्याही वाटेने गेलो तरी
पायात कायमचा रुतलाय काटा

तुमच्याशिवाय जगायचं?

गुलमोहर: 

अ व ता र द र्श न

Submitted by गोमू on 26 January, 2010 - 05:42

आमच्या असण्यावर जाऊ नका
आमच्या दिसण्यावर जाऊ नका
कारण आम्ही आहोत फक्त एक अवतार (चित्त च् क्शू चमत्कारिक )

आमच्या हसण्यावर जाऊ नका
आमच्या प्रतीक्रियेवर रुसू नका
कारण आम्ही आहोत फक्त एक अवतार ( शेपूट विरहीत )

आमच्या किसण्यावर जाउ नका
कवीता कर्णे थाम्बवू नका
कारण आम्ही आहोत फक्त एक अवतार (!* अन्तर्धान * !)

गुलमोहर: 

हा वास हा.छळतो तुला.. : आभस हा छळतो तुला.

Submitted by सत्यजित on 26 January, 2010 - 03:07

मुळ गाणे इथे ऐकता येईल: आभास हा.. http://kahigani.blogspot.com/2008/05/blog-post_6006.html - शेड्यां पासुन मुळां पर्यंत सर्वाची माफी मागुन.

खर तर ह्या विडंबना साठी आभास हा. चे "हा वास हा" येवढेच करणे पुरेसे होते. तरी इतर बदल भावना पुरेपुर उतरवण्या साठी केले आहेत.

विषेश टीपः हे विडंबन वाताचा त्रास , अपचन, बद्ध कोष्ठतेचा त्रास असताना ऐकल्यास विषेश आराम मिळतो. Proud तरी प्रयोग अ‍ॅट ओन रीस्क करावा, त्रास वाढल्यास मी जबाबादार नाही.

कधी पूर पूर, कधी टूर टूर, पोट कळवळे आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे कुंथतानाही मला

गुलमोहर: 

काय हवयं आणि?

Submitted by वर्षा_म on 20 January, 2010 - 02:30

अमोल बारई कविमोल यांची माफी मागुन >>>

माझ्या डोळ्यामध्ये तू
तुझ्या डोळ्यामध्ये मी,
असे सलत असतांना
काय हवयं आणि?

जेंव्हा कधी ओरडतेस
किती ती रुक्श वाणी,
तू अशीच ओरडतांना
काय हवयं आणि?

कुरुप तरी किती
वर्णितो जशी माकडीण,
शब्द शब्द पडलेत कमी
काय हवयं आणि?

कुरळलेले तुझे केस
शिरत नाही फणी
त्याच्या वेण्या घालत रहातो
काय हवंय आणि ?

तुझे तिरळे नयन
पहाताच माझ्या डोळ्या पाणी,
नजर तुझी शोधतो
काय हवयं आणि?

गुलमोहर: 

मधात लडबडेन मी .....

Submitted by कौतुक शिरोडकर on 15 January, 2010 - 10:14

(श्री. नीरज कुलकर्णी आपली गजल इतकी छान आहे की मोह आवरला नाही. जित्याची खोड. माफी असावी.)

तुझ्या प्रतारणेतला, 'बुखार' हा जगेन मी...
जगास वागणे तुझे, पदोपदी कथेन मी...

कधी 'जगन' ... कधी 'मगन'..., कुठे कुठे दिसायची....
हजार घोळ ते तुझे, कसा न बावरेन मी... ?

सदा त्रिकाळ 'रोज' डे, भमर तुझ्याच भोवती;
मनास भास 'एकटा', मधात लडबडेन मी...

'झुला'वणे मला सखे, अशक्य ते नसायचे
तुला सदैव खातरी, सुखासुखी पटेन मी...

प्रसाधने न ड्रेसही, पिझास कोक सोबती,
अता बिले उरावरी, ऋणात या डुबेन मी...

कितीक खर्चले कधी, हिशोब मांडला कुठे ?
"मधाळ ती मदालसा", पुन्हा न विरघळेन मी

गुलमोहर: 

रोज चमचमीत खाउ वाटले तरी

Submitted by तुष्कीनागपुरी on 9 January, 2010 - 11:55

रोज चमचमीत खाउ वाटले तरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी

तो चटोर चायनिज वाट रोखतो
हासुनी खुशाल मेनु कार्ड टाकतो
रंगवून, रंगुनी नुडल्स वाढतो
सांगतो अजूनही तुला परोपरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी

सांग श्याम पाटलास काय जाहले
रोज मस्त खाउनी हे पोट वाढले
वेढती भल्याभल्यांस जीभ चोचले
एकटाच वाचशील काय तू तरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी

जो ईथे घरीच जेवणात रंगला
बायको मुलांसवे मजेत दंगला
त्यास रामबाण स्वास्थ्यलाभ लाभला
आजकाल जीवनात रीत ही खरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी

गुलमोहर: 

पहाटे पहाटे तुला जाग आली

Submitted by के बालचंद्र on 9 January, 2010 - 05:31

(कविश्रेष्ट सुरेश भटांची माफी मागुन)
(एक पहाट अशीही.....)

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालु कानी, बोळे ते कळेना
असा राहुदे हात, माझ्या कानाशी ...!!

म्हणू घोरणे की, फुस्कारने याला
कर्कश बेसुरांची,जणू पुष्पमाला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी,ऑलाउट कशाला ?
फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
झोपही अताशा, चकनाचूर झाली ...!!

के बालचंद्र.
*****************************************

गुलमोहर: 

साहेब बास करा : १('दा'चं) : व्यसन

Submitted by अरभाट on 9 January, 2010 - 04:21

मागच्या कवितेच्या वेळी
गहिवरलो होतो मी (जणू छळछावणीतला ज्यू)
शेवटची ओळ वाचताना.....
डोळा मारून म्हणाले होते ते,
ही कविता शेवटचीच बरं का !

मागच्या ३१ डिसेंबरला
पार पकलो होतो मी
कविता पाहून त्यांच्या
कानात त्यांच्या विचारलं होतं
आता पुढच्या वर्षी तरी थांबवणार ना !

मागच्या ३१ डिसेंबरला
संकल्प केला होता मी
आता माबोवर येणे बंद,
शोधले मी दुसरे संस्थळ.... पण हाय !
दुसरे सोडा, तिसर्‍या आणि चौथ्या संस्थळावरही तेच ते !

३१ डिसेंबर परत येऊनही गेला
कविता वाचणेच विसरलोय मी
म्हाळसाकांत पोम्बुर्पेकराची 'प्रादेशिक' पुस्तके घेऊन बसलेहेत ते (आणि काही मित्र)

गुलमोहर: 

चंडीका आली...(अप्सरा आली ...)

Submitted by shashank pratapwar on 8 January, 2010 - 14:32

अवजड काया की पडछाया,
अवस घेउन आले,
नवर्‍याला फोडले झाडुनी झोडले,
पदर खोचुन आले.

मी फेकली ताटली,
जाउन लागली,
त्याच्या कानाखाली.
मी क्विंटल भरली,
खाउन फुगली.
टेरर असे भोवताली.

चंडीका आली,
लपा पलंगाखाली,
उमटेल लाली,
पुन्हा हो गालाखाली.

कडुषार सुरत हेकनी,
माझा हो धनी,
किती बेजार.

पाहता होइ तो दुखी,
त्याच्या हो मुखी,
हसे शेजार.

हाकते तया एकटी,
बांधुन वळकटी,
होती पसार.

कुणी दिली तुम्हाला दाजी,
देणगी भंगाराची,
फुलाच्या नावाखाली दाजी,
टोपली अंगाराची.

मी फेकली ताटली,
जाउन लागली,
त्याच्या कानाखाली.
मी क्विंटल भरली,
खाउन फुगली.
टेरर असे भोवताली.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन