प्रेरणा- चरे(http://www.maayboli.com/node/33470)-मिल्या
"बापरे किती खराब झालायंस?" मी हृदयात डोकावत म्हणालो
"तुझ्या कवितेवरील प्रतिसादांमुळेच की रे, पाहतोयस ना किती घरे पाडलीस तू मला?" ते विषण्ण होऊन उत्तरले
"खरेच की आता मला आठवत सुद्धा नाही ... कधी अन केव्हा इतकी घरे पडली ते... " मी खांद्यावरची झोळी सावरत उद्गारलो
"हा पण तो बघ ते पहिलं घर पडलेलं आठवतंय...
’आईविना पोर....गुरख्याविना ढोर......चोरीविना चोर.....बायकोविना जोर’ या यमक जुळवून केलेल्या पहिल्या कवितेच्याच्या वेळचेच ना ते... अरे पण केवढ्या टाळ्या, केवढे कौतुक..."
"तुला नाही कळणार ते...
हे असच असतं येथे! टाळ्या आणि कौतुक उपहासाचे होते प्रस्थापितांचे!
तेच फेसबुकवर टाकले असते तर निदान १०० (अडाण्यांकडून)तरी लाईक्स मिळाले असते... जाऊदे"
ते जोरजोरात हसायला लागले
"अरे आणि हे बघ..." त्याच्याकडॆ दुर्लक्ष करत मी म्हणालो
"हे किल्लारी भूकंपात पडल्याप्रमाणे जे पडलंय ते घर; बेफिकीर यांच्या प्रतिसादामुळे. पायाच नाहीसा होतो! हे भुजंगप्रयात वृत्ताप्रमाणे आकार असलेले पडलेले घर, आनंदयात्रींच्या प्रतिसादामुळे आणि ते आणि ते.. छोटी छोटी घरे पडलीत ना ती घरे पाडण्यात एक्स्पर्ट असलेल्या गझलकार पिलावळींमुळे!
ते जरा जास्तीच मोठ्ठं असलेलं पडलेलं घर संपर्कातून मेलमधून ठरवून पाडलेलं आणि शेजारीच ते डू आयडींनी पाडलेलं घर आणि हे बघ अगदी ताजं ताजं वैभव कु............ ने बहुतेक..."
"आणि तो एवढा मोट्ठा तडा पडून पडलेलं घर कसलं रे? ते रे डाव्या बाजूला अगदी छातीजवळ?
"अरे ते वारंवार पडलेलं? ते मंदार जोशींच्या वारंवार प्रतिसादामुळे पडलेलं! कितीही वेळा संपादीत केलं तरी मिटत नाही!..."
"अरे पण ह्या ट्रॉफ्या बघितल्यास आणि ती फॅन मेल्स?..."
"...जाऊदे तुला नाहीच कळणार? जितकी जास्त घरं पडतील आणि जास्त प्रतिसाद तेव्हढ्या ट्रॉफ्या आणि एवढे करूनही साला प्रकाशक म्हणतो या कविताच वाटतात, मुक्तछंद वाटतच नाही!..."
"अरे फिकर नॉट्ट" हृदय छद्मी हसत म्हणाले
"तू भविष्य नाही वाचलेस २०१२ चे .. कितीतरी नैसर्गिक प्रतिसाद येणार आहेत म्हणे आणि समजा नाहीच आले तर अजून एक घर पडलेलं मी झेलू शकतोच की...
... अॅडमिन तर अजून जिवंत आहे..."
.
.
.
.
.
.
.
.
.
(चला आता फक्त मीच राहिलो)
लई भारी कोठीकर....
लई भारी कोठीकर....
लेखाचं पण इडंबन
लेखाचं पण इडंबन
उमेशजी, _________/\_________
उमेशजी,
_________/\_________
उमेशजी, फारंच मार्मिक...
उमेशजी,
फारंच मार्मिक...
भारी!
भारी!
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
(No subject)