दिसला गं बाई दिसला!

Submitted by अन्नू on 17 April, 2012 - 12:35

(जगदीश खेबूडकर यांची मनस्वी क्षमा मागून.)

दिसला गं बाई दिसला महीला मुक्ती (क्रांती) सॉंग स्पेशल
प्रथम, गाण्याची चाल नीट समजण्यासाठी ते ओरिजनल गाणे येथे पहा व ऐकून घ्या.
http://www.youtube.com/watch?v=lCiUi_LKkoM

गाणे:- दिसला गं बाई दिसला (रिमेक)
चाल:- दिसला गं बाई दिसला मुख्य गाणे (पिंजरा सिनेमा)
नाईका गायकः- गावचीच एक सर्वसामान्य धाडसी बाई
कोरसः- गावातील पाच सहा शोधून काढलेल्या तोंडच्या फटकळ बाया!

अग बयोs गंsssssssssssss
झाडूच्या मुडग्याचं सोटाणं हातीss ई ई ई ई ई! आले मी अवसची भायेर रातीss ई ई ई ई ई...
घरात सासू मरं, सासरा ठोकं, कारटी ती भोकांड पसरी,
कपाळाचा टेना न् सासूचा दिवटाsss हो ओ हो ओ हो..
माझ्या, कपाळाचा टेना न् सासूचा दिवटा
कुठंच दिसना मला ग बाई बाई कुठंच दिसना मला
इथं दिसना, तिथं दिसना, पडवीत दिसना, सपरात दिसना...
याला आता शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं
ह्यो बघ!!!
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मुडदा, मला बघून गोठ्यात घुसला गं बाई घुसला...
ऊ हूंss.....
दिसला गं बाई दिसला....(नाक मुरडत आणि हात नाचवत कोरस)

पडला दारवानं उभा नी आडवाssss
त्याच्या तोंडात गावरान हगवा
गं त्याच्या ग्यानात माती कालवा!
पिदाडा घोडा, ह्यो गल्लीचा कुत्राssss
डोक्यामंदी घुसला ग बाई बाई डोक्यामंदी घुसला
डोस्क्यामंदी, टाळक्यामंदी, ह्या टकुर्‍यामंदी..
सुटला गं बाई सुटला....(कडाकडा हातापायाची बोटं मोडत कोरस)
बेवडा, मला बघून शेरात घुसला ग बाई घुसला...
ऊ हूss......

त्याच्या डोस्क्यात तमाशाच खुळंsss
रस्त्यात, बायांना मारतोय डोळं हो ओ हो ओ हो.
त्वांड त्याच पकडा, शेनात कुचलाsss आ आ आआ आss
फोडा त्याचा थोबडा ग बाई बाई फोडा त्याचा थोबडा
थोबडं फोडा, तंगड मोडा..
पकडा गं बाई पकडा....(तनातना सैरभैर पळत कोरस)
कुत्रा, मला बघून गंजित लपला गं बाई लपला
ऊ हूss.....

अंग-अंगाची कपडे फाडाss
खालून मिरचीची धुरी सोडा
गं बया, मिरचीची धुरी सोडा!
उलटा वर टांगा, चप्पलीनं झोडाsss
अजुन कसा उलटना ग बाई बाई अजुन कसा उलटना
मरना कसा, टळना कसा, वर जाईना कसा..
कुचला गं बाई कुचला....(धुणं बडवण्याची स्टाईलने कोरस)
कुणी, मसनात मेल्याला पोचवा ग बाई पोचवा
ऊ हूss......

उचला ग बाई उचलाss आs आs आs
उचला गं बाई उचला
रेड्याला, नाल्यात घालून बुकला ग बाई बुकला...

-------------------मुडदा बशीवला दिवट्याचा--------------------

गुलमोहर: