Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 25 March, 2011 - 03:31
दार मनाचे उघडावेसे वाटत आहे
मज माझ्याशी झगडावेसे वाटत आहे
तेल्,तूप संपले राहिले धुपाटणे अन,
अता वाळूला रगडावेसे वाटत आहे
खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाहि थोडे बिघडावेसे वाटत आहे
मनासारखे घडत नसावे ''कैलासाच्या''
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे.
--डॉ.कैलास गायकवाड
गुलमोहर:
शेअर करा
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाही थोडे बिघडावेसे वाटत आहे>>>>>>>>> छान आहे
दार मनाचे उघडावेसे वाटत
दार मनाचे उघडावेसे वाटत आहे
मज माझ्याशी झगडावेसे वाटत आहे >>> मस्तच लिहीलेय
दार मनाचे उघडावेसे वाटत
दार मनाचे उघडावेसे वाटत आहे
मज माझ्याशी झगडावेसे वाटत आहे>>> छान मतला आहे.
खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे>>> छान!
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाही थोडे बिघडावेसे वाटत आहे>>>
(मला'हि'?)
सहीच डॉक....
सहीच डॉक....
सही आहे >>मनासारखे घडत नसावे
सही आहे
>>मनासारखे घडत नसावे ''कैलासाच्या''

उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे.
हे काय हो? का असं वाटतंय?
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाहि थोडे बिघडावेसे वाटत आहे>>>> हे मस्त जमलंय....
आवडली.. खुले खुले राहण्यात
खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
खरच?
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे>>
मनासारखे घडत नसावे ''कैलासाच्या''
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे.>>
डॉक्टा तुमची गझल अप्रतिम
डॉक्टा तुमची गझल अप्रतिम आहेच...
विडंबन नाही म्हणणार.. पण जे काही सुचले ते
http://www.maayboli.com/node/24602
खुले खुले राहण्यात नाही मजा
खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे
वाह!!!
पण अजून थेट आला असता तर मजा आली असती!
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाहि थोडे बिघडावेसे वाटत आहे>>>
हा शेर गझलेशी फटकून असल्यासारखा वाटला...बाकीचे सर्व शेर आवडले.
डॉक, राग मानू नका पण थोडी उथळ
डॉक,
राग मानू नका पण थोडी उथळ वाटली..
गझल छानच आहे. मनासारखे घडत
गझल छानच आहे.
मनासारखे घडत नसावे ''कैलासाच्या''
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे.
बापरे, त्यात मायबोलीकर आहेत का ?
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाही थोडे बिघडावेसे वाटत आहे
वहिनिंना दाखवलीत का गझल ?
दार मनाचे उघडावेसे वाटत
दार मनाचे उघडावेसे वाटत आहे
मज माझ्याशी झगडावेसे वाटत आहे
खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे
चांगले शेर.
काय सॉल्लिड गझल आहे!!
काय सॉल्लिड गझल आहे!! तुफान!!
मनासारखे घडत नसावे ''कैलासाच्या''
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे.
हे अगदी माझ्या मनताले आहे.
कैलासदादा.. तुमच्या गझला म्हणजे एक पाठ असतो गझल शिकण्यासाठी.