फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -

Submitted by विदेश on 17 April, 2011 - 05:23

(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा )

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा
पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ?

नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -
सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?

उजेडात होते पहाणी - अंधारात साsssफ
चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप -
दक्ष पोलिसांची कैसी नसते गस्त तेव्हां ?

फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी
आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी -
माल मनी तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!

गुलमोहर: 

मस्त विडंबन, माझाही एक झब्बू!

http://www.maayboli.com/node/25151

अपल्या विडंबनातील हे कडवे फार आवडले.

नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -
सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

वा !!

'बेफिकीरजी ',
झब्बू छानच मिळाला. आभारी आहे .

'तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -' ही ओळ 'तरी चोरटयांना नाही भीती मुळी त्यांची -' अशी वाचावी.

'तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -' ही ओळ 'तरी चोरटयांना नाही भीती मुळी त्यांची -' अशी वाचावी. >>>

ही ओळ खरी तर अशी आहे आता - म्हणजे सत्य असे आहे -

नसे दूर चौकी इथुनी पोलिसांची
नाही भीती त्यांना तरी चोरटयांची
सरावल्या पोलिसांना हप्ता जो मिळाला.
उघड दार देवा आता! उघड दार देवा!