Submitted by विदेश on 5 April, 2011 - 04:12
(चाल : एक धागा सुखाचा -)
एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे -
घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे !
तू असशी जरी कर्ता तगडा ,
सासू सुनेचा बघशी झगडा -
सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे !
उचलबांगडी बालपणाची ,
धुळीत स्वप्ने तारुण्याची -
जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे !
सासू सुनातें बघतो कोणी ,
एक सारखी बसती फुगोनी -
कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
मस्त जमलयं. एक प्रतिसाद
मस्त जमलयं.
एक प्रतिसाद हक्काचा..!
<<जीर्ण माय मग उरे शेवटी -
<<जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे >> kya baat hai....
हे सल्ले नाही मिळाले का
हे सल्ले नाही मिळाले का त्यांना
http://www.maayboli.com/node/12564
आणी ही बिचार्या एका सासुची व्यथा
http://www.maayboli.com/node/21883