टिचभर खळगी भरण्यासाठी रोज करावी किती कवायत?
खून पसीनेसे है हासिल रूखी, सूखी, बासी दावत
म्हणे दीन दुबळ्यांना देतो तत्परतेने देव सावली
सवाल मेरा आज खुदासे"गयी तुम्हारी कहाँ रिसालत?"
दु:ख सांगता दुसर्यांना ते हलके होते म्हणे परंतू
गलियारे है उज़ाड इतने बयां करू मै किसे हक़ीकत
खळे संपले, थवे उडाले मीच सहारा माझा आहे
मरनेसे है जीना बत्तर तनहाईसे करे बग़ावत
मला न मागे, पुढे कुणीही दिवाळखोरीमुळे सुखी मी
सवाल वरना ज़ायदादकी बनाम किसके करे वसीहत
अंधाराच्या पानांवरती आत्मवृत्त लिहिताना कळले
माहताबके एक किरनकी देख न पाया कभी नज़ाकत
अलिबाबाची गुहा गवसली आत संपदा माणिक मोती
"खुलजा सिमसिम"भूल गया मै करते बैठा सिर्फ हिफ़ाज़त
न्यायावरती आज भरवसा कसा , कुणी अन् किती करावा?
गवाह फर्ज़ी, फर्ज़ी कागज़ पेश हुई है झूठ शहादत
दोषपूर्ण ग़ज़लेसम झाले "निशिकांता"चे जीवन सारे
मस्त काफ़िया, रदीफभी है बिगड गई है कंही अलामत
वाचकांच्या सोयीसाठी उर्दू शब्दांचे अर्थ खाली देत आहे.
दावत--मेजवानी
हासिल--प्राप्त
रिसालत--देवाचे कार्य--divine mission
गलियारे-- गल्लीचे अनेक वचन
बत्तर-- वाईट
तनहाई--एकटेपण
बगावत--बंड, उठाव
बनाम-- नावाने
वसीहत--मृत्त्यूपत्र
माहताब--चांदणे
नजाकत--सौंदर्य
हिफ़ाजत--संरक्षण
फर्जी--बनावट
शहादत--पुरावा, साक्ष
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
एकंदरीत हा प्रकार
एकंदरीत हा प्रकार आवडला.
टिचभर खळगी भरण्यासाठी रोज करावी किती कवायत?
खून पसीनेसे है हासिल रूखी, सूखी, बासी दावत >>> इथे भी घालून वाचला आणि मतला आधिक परीणामकारक वाटला.
मला न मागे, पुढे कुणीही दिवाळखोरीमुळे सुखी मी
सवाल वरना ज़ायदादकी बनाम किसके करे वसीहत
अंधाराच्या पानांवरती आत्मवृत्त लिहिताना कळले
माहताबके एक किरनकी देख न पाया कभी नज़ाकत
अलिबाबाची गुहा गवसली आत संपदा माणिक मोती
"खुलजा सिमसिम"भूल गया मै करते बैठा सिर्फ हिफ़ाज़त
हे शेर आवडले, मक्ताही छान!
शुभेच्छा!
मस्स्स्स्त!!
मस्स्स्स्त!!
निशिकान्त
निशिकान्त सर
ग्रेट्जॉब...............
मस्त गझल
धन्यवाद
व्वाह.. अप्रतिम गझल.
व्वाह.. अप्रतिम गझल.