Submitted by यःकश्चित on 8 June, 2012 - 05:41
पावसाळा
( चाल : दूर देशी गेला बाबा )
-------------------------------------------------------------------------
पावसाळा सुरु झाला झाली आकाशात गर्दी
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...
एक पावसाचा थेंब
ढगाआड लपवला
चंबू चोचीचा करूनी
चातकही वेडावला
आता पुरे रोष थेंबा कुणी म्हणतच नाही
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...
कशासाठी कोणजाणे
जून पावसाळी म्हणती
जून संपता तरीही
भेगाळली काळी धरती
मन आशावादी ठेवून बळी आकाशात पाही
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...
जसे नेते देती खोटी
आश्वासने मोठी मोठी
खुर्ची मिळाल्यावरती
नाही पूर्ण ती करती
तुला हवे काय आणखी 'माया' 'प्रेम' आणि काही
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...
- यःकश्चित
गुलमोहर:
शेअर करा