Submitted by कमलाकर देसले on 18 May, 2012 - 07:44
आळ ..
घातला पायात चाळ ;
घेतला त्यांनीच आळ ..
रे करुनी आत्महत्या ;
जिंकता येतो न काळ ..
आजचा नेता तरी हा ;
जाहला घोटून लाळ ..
आटले की प्रेम होते -
हे जिणे बाबा रटाळ ..
पावतो का देव?भक्ता -
फक्त रे वाजून टाळ
धावतांना थांब थोडा ;
तू गतीचा नियम पाळ .
दांभिकांना सापडावी -
का तुकोबांचीच माळ ?
गुलमोहर:
शेअर करा
वाह...!! खयाल अप्रतिम आहेत.
वाह...!!
खयाल अप्रतिम आहेत. सगळ्याच द्विपदी आवड्ल्या.
पण बहुतेक तरी गझलेत शेवटचा शब्द लघु असल्यास त्याला गुरू मानता येत नाही. त्यामुळे इथे 'ळ' ला 'ळं' करता येईल का हे विचार करण्याजोगे आहे.
काही चुकल्यास क्षमा असावी.
धन्यवाद!
कमलाकरराव! आपली गझल वाचली.
कमलाकरराव! आपली गझल वाचली. खयाल आवडले. पण वृत्त सदोष वाटले. मतल्यात एकदा वृत्त ठरले, जमीन ठरली की, सबंध गझलेत ते वृत्त कायम वापरायला हवे. एका मिस-यात एक व दुस-या मिस-यात दुसरे वृत्त चालत नाही. एकदा ठरले की, शेवटचे अक्षर लघु, तर सर्व मिस-यातील शेवटचे अक्षर लघुच आले पहिजे. या बाबतीत कधीच सूट वा सवलत घेवू नये, या मताचा मी तरी आहे. गीतात ते कदाचीत चालेल, पण गझलेत ते क्षम्य नाही!
म्हणून मी आपल्या गझलेवर काही खयाल देत आहे. सर्वच खयाल तुमच्या बरहुकूम नसतील, पण केवळ आस्वादासाठी हे खयाल देत आहे. तुलनेचा कुठलाही हेतू नाही किंवा तुम्ही तुमच्या गझलेत काही बदल करावेत असेही मी म्हणणार नाही. फक्त गझल निर्दोष, गोटीबंद, नि:संदिग्ध व सफाइदार होण्यासाठी मी माझ्या अभिव्यक्तीतून हे खयाल/शेर देत आहे. पहा कसे वाटतात ते. आपली प्रांजळ प्रतिक्रिया जरूर कळवा, वाचायला आवडेल.
माझे खयाल/शेर खालील प्रमाणे..............
घातले पायात चाळ!
का न यावे सांग आळ?
आत्महत्येने कुणास;
जिंकता येईल काळ?
काय हे करतील लोक?
घोटतो नेताच लाळ!
आटले दुनियेत प्रेम......
वाटते जगणे रटाळ!
पावतो का पांडुरंग?
फक्त कुटल्यानेच टाळ!
धावताना तू सुसाट...
वर्दळीचे नियम पाळ!
भाव नाही अंतरात;
घातली नुसतीच माळ!
..............प्रा.सतीश देवपूरकर
व्वा व्वा, यावेळचे पर्यायी
व्वा व्वा,
यावेळचे पर्यायी शेर दादोत्पादक आहेत हे निश्चीत
घातला पायात चाळ ; घेतला
घातला पायात चाळ ;
घेतला त्यांनीच आळ ..
रे करुनी आत्महत्या ;
जिंकता येतो न काळ ..
आजचा नेता तरी हा ;
जाहला घोटून लाळ ..
हे तीन आवडलेत.
प्रा.सतीश देवपूरकर, आपण जे
प्रा.सतीश देवपूरकर,
आपण जे वारंवार पर्यायी शेर देता ते अयोग्य आहे. गझलेच्या संस्कृतीमध्ये सुद्धा मागीतल्याशिवाय इस्लाह न देणे, अशी परपंरा आहे, असे म्हणतात.
मराठी संस्कृती तर फारच वेगळी आहे. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेल्या काव्यगंगेत अशा तर्हेचा आगाऊपणा कोणी केल्याचे माझ्यातरी निदर्शनास आलेले नाही.
उदा.
निवृत्ती, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई हे तिघेही भावंडे अल्पवयातच भजने रचायला लागली. त्यातिघांमध्ये ज्ञानदेव हे सिद्धहस्त कवी होते. तुलनेने निवृतीनाथ आणि मुक्ताई यांच्या लेखनीला फार मर्यादा होत्या. पण ज्ञानदेवाने निवृती किंवा मुक्ताईला भजन कसे लिहावे, याचे धडे देण्याचा उद्दामपणा केलेला आढळत नाही.
निव्रुत्तीनाथांच्या मर्यादा ज्ञानदेवापेक्षा भजन रचण्याच्याबाबतीत फारच तोकड्या असूनही ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना आपल्या गुरुस्थानी मानले, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
तात्पर्य एवढेच ज्याला जसे जमेल तसे त्याने लिहायचे असते, आणि इतरांनी त्याचा सन्मान करायचा असतो.
सन्मान करता येत नसेल तर हरकत नाही पण त्याचा उपमर्द होईल अशी वर्तणूक करणे कुणालाही शोभा देणारी नाही.
असो, तुर्त एवढेच. )
गंगाधरराव! माझे प-यायी
गंगाधरराव! माझे प-यायी शेरांवरचे म्हणणे, माझी भूमिका, मी द्न्यानेशजी, बेफिकीरजी इत्यादींना सविस्तरपणे कळवलेली आहे. मी दिलेल्या कोणत्याही प्रतिसादात ते तुम्हाला कळून येईल. द्विरुक्ती टाळण्यासाठी, याउपर काही लिहित नाही. आपण ज्याला “आगावपणा” म्हणत आहात त्याला सुसंस्कृत साहित्यिकांमध्ये
“रसग्रहण” असे म्हणतात. जावू द्या ना, या सर्व गोष्टींपासून आपण मैलोनमैल लांब आहात! आपल्या डोक्यावरचे आहे ते!
हेच खरे की,
“रक्ताचे पाणी केल्यावर मला समजले......
रक्ताला पाण्याइतकीही किमत नाही!!
>...........प्रा.सतीश देवपूरकर.
टीप: टीका सोसवत नसेल तर आपले काव्य आपल्या घरीच सेफ वहीत ठेवावे!
नेटवर टाकू नये! व कोणासही कुठलेही न शोभणारे सल्ले देवू नयेत. जो तो आपल्या कुवतीनुसार, व शैलीनुसार प्रतिसाद देत असतो! पटेल, रुचेल, पचेल, पेलवेल तेवढेच घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे. उगाच आपल्या नसलेल्या बुद्धीचे प्रदर्शन करून हसू करुन घेवू नये.
>...........प्रा.सतीश देवपूरकर
<<<<आपण ज्याला “आगावपणा”
<<<<आपण ज्याला “आगावपणा” म्हणत आहात त्याला सुसंस्कृत साहित्यिकांमध्ये “रसग्रहण” असे म्हणतात.>>>>>
हात्तीच्या मारी. पर्यायी गझल सादर करणे म्हणजे रसग्रहण करणे होय. असे मला आजवर ज्या प्राध्यापकांनी, मित्रांनी कधीच सांगीतले नाही, आणि ही गोष्ट माझेपासून दवडून ठेवली त्या सर्व प्राध्यापकांचा आणि मित्रांचा मी जाहीर निषेध करतो.
आणि उच्च अभिरुचीसंपन्न रसग्रहनाचा खरखुरा अर्थ समजाऊन सांगितला, त्या प्रा.सतीश देवपूरकरांचे अभिनंदन करतो.
(No subject)
प्रा. साहेब : या वेळ्ची
प्रा. साहेब :
या वेळ्ची पर्यायी गझल जमली आहे .......................तिची गरज होती असे मूळ गझल वाचून वाटू लागले होते ........
अभिनन्दन
मुटे सरः
जाऊद्या............रागावू नका
तुमचे मत माय्बोलीवर ९९.९९ % लोकाना पट्ते...........मलाही
पण इलाज नाही
<<< तुमचे मत माय्बोलीवर ९९.९९
<<< तुमचे मत माय्बोलीवर ९९.९९ % लोकाना पट्ते. >>>>
कुणाला काय पटते, काय नाही. माझे पटते किंवा नाही,
हे मुद्दे गौण आहे.
मुख्य मुद्दा असा की, मुळ कविने/शायराने जे काही खरडले ती त्याची मुळ अभिव्यक्ती आहे. तेच अभिजात आहे.
त्याचा उपमर्द करण्याचा कुणाला अधिकार असू शकत नाही. कुणी असे करत असेल तो मर्यादा ओलांडतो, हेही स्पष्ट आहे. त्याला आवर घालायलाच हवा. अगदी जमेल त्या मार्गाने आणि सबंधिताला कळेल अशा भाषेत.
टीप; हीच पर्यायी गझल त्यांनी मुळ शायराला विपू / इमेल किंवा फोन करून कळवायला काय हरकत आहे? पण ते तसे करणार नाहीत. कारण त्यांचा मुळ हेतू वेगळा आहे.
पर्यायी गजल, विडंबन यांचे
पर्यायी गजल, विडंबन यांचे वेगळे धागे काढून इथे लिंक द्या.. म्हणजे दोन्ही गजला स्वतंत्र राहतील
.............................
...................................
.................... क्षमस्व
....................चुक भूल देणे घेणे
....................मुटे सर त्रास करून घेवू नका ............( ............ त्यान्च्या नादाला लागून !!)
{टीप: मुटे सर ..........तुमच्या टीपेत दिलेली आयडिया प्रा. साहेबाना देण्याची काहीतरी गरज होती का .....( ठाम मत!!!)}
त्यापेक्षा इथल्या गझलकारांनी
त्यापेक्षा इथल्या गझलकारांनी आपल्या गझला प्रकाशित करण्यापूर्वी प्राध्यापक साहेबांना पाठवाव्यात. ते त्या घासूनपुसून देतीलच. मग त्या प्रकाशित कराव्यात. म्हणजे वाचकांनाही निर्दोष वगैरे गझल पहिल्याच फटक्यात वाचायला मिळेल.
'आयत्या' मिळालेल्या खयालांवर वृत्तांत लिहिण्याच्या आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याच्या वृत्तीबद्दल काय बोलणार? दुसर्याच्या गझलांमधील दोषांवर पंतोजी स्टाइल छडी उगारणारे महाशय स्वतः मात्र 'परंतू' , 'मंदीर' असे शब्द वापरतात. खयालांत संदिग्धता नसावी असे म्हणताना शुद्धलेखनात असली तरी चालेल असे सुचवतात.
मायबोलीवर आतापर्यंत अनेकांनी इतर अनेकांच्या रचनांमध्ये बदल सुचवले असतील, मात्र प्रत्येक सूचनेत एक नम्रपणा असायचा. सूचना स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा निर्णय मूळ रचनाकाराचा आहे ही सभ्य जाणीव असायची. आणि अशा सूचना एखाद्या कवितेवर एखाद-दोन असायच्या. संपूर्ण रचनेचा चेहरामोहरा बदललेला नसायचा.
नवोदित गझलकारांना आपल्या रचना निर्दोष करण्यासाठी मार्गदर्शन हवेच असते, पण ते पाठीवर फिरणार्या प्रेमळ हाताचे; छडीचे नव्हे.
सुंदर सुंदर गझला लिहिणार्या इथल्या अनेक नामांकित गझलकारांनी दुसर्याच्या गझलांवर मतप्रदर्शन करताना 'मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मला जास्त कळते' अशी भूमिका घेतल्याचे आठवत नाही.
||विद्या विनयेन शोभते||
अजून वाचत आहे, वेळ मिळाला की
अजून वाचत आहे, वेळ मिळाला की माझीही मते मांडून पाहीन
मुटे साहेब, अहो रस ग्रहण या
मुटे साहेब, अहो रस ग्रहण या शबदाची त्यांची व्याख्या वेगळी असणार.
रसग्रहण म्हणजे काव्याच्या रसाचे ग्रहण करणे ही तुमची व्याख्या.
नवीन शब्दरचना करुन काव्याच्या मूळ रसाला ग्रहण लावणे म्हणजे रसग्रहण ही त्यांची व्याख्या.
<<<< नवीन शब्दरचना करुन
<<<< नवीन शब्दरचना करुन काव्याच्या मूळ रसाला ग्रहण लावणे म्हणजे रसग्रहण ही त्यांची व्याख्या.>>>
जामोप्या, लय भारी.
जामोप्या, लय भारी.
जामोप्या : सौन्दर्यबोध
जामोप्या : सौन्दर्यबोध म्हनजे काय मग......................?? आम्हाला जरा सन्गा की...............
मयेकरांनी अत्यंत चांगले
मयेकरांनी अत्यंत चांगले मुद्दे मांडले आहेत त्याला संपूर्ण सहमती.
इथे साहित्याबद्दलच्या चर्चा होतच नाहीत असे प्रोफेसरांचे मत झालेले दिसत आहे. त्यांच्या मतानुसार ते मुळ गझलकाराच्या विचारधारेला चालना मिळून सकस चर्चा व्हावी अशा उद्देशाने पर्यायी शेर देत असतात. पण एकंदरीतच त्यांनी जे लिहीलेले असते ते इथले काही गझलकार कोळून प्यायलेले आहेत हे काही म्हणता काही केले तरी त्यांच्या लक्षात येत नाहीये.
इथला कुठलाही कवी दुसर्याला सांगताना(अगदी पहिल्या दिवसाच्या कवीलादेखील) नम्र सुचना करतात आणि त्यात दम असतो.
मराठी गझलेत आज ज्यांच्या काव्याला एक दर्जेदार काव्य म्हणून पाहिले जाते अशांनाही ते बच्चे समजून मास्तरकीचे कर्तव्य बजावीत आहेत ह्याबद्दल खरे तर त्यांचे कौतुक करायला हवे.
एक वेळ आल्यावर स्वत:ची मुलेसुद्धा ऐकत नाहीत तर केवळ वय जास्त आहे म्हणून प्रोफेसरांचे कोण ऐकणार हे पृथ्वीतलावरचे सत्य ते कधी स्वीकारतील देवच जाणे.
प्रोफेसरांच्या प्रत्येक गझलेतून समोरच्याला काही ना काही शिकताच येईल अशी मात्र त्यांची गझल नाही.
बरेच लिहीलेय मी पण उपयोग शून्य!
सतीश देवपूरकर | 18 May, 2012
सतीश देवपूरकर | 18 May, 2012 - 12:12
कमलाकरराव! आपली गझल वाचली. खयाल आवडले. पण वृत्त सदोष वाटले. मतल्यात एकदा वृत्त ठरले, जमीन ठरली की, सबंध गझलेत ते वृत्त कायम वापरायला हवे. एका मिस-यात एक व दुस-या मिस-यात दुसरे वृत्त चालत नाही. एकदा ठरले की, शेवटचे अक्षर लघु, तर सर्व मिस-यातील शेवटचे अक्षर लघुच आले पहिजे. या बाबतीत कधीच सूट वा सवलत घेवू नये, या मताचा मी तरी आहे. गीतात ते कदाचीत चालेल, पण गझलेत ते क्षम्य नाही!
आ. देवपूरकर सर ,
आपल्या अभ्यास व अधिकाराविषयी विनम्र आदर ठेऊन माझे म्हणणे मांडीत आहे ....
>>>>पण गझलेत ते क्षम्य नाही!
नसावेच. या विषयी मीच कशाला सगळेच सहमत आहेत .
"वृत्त सदोष वाटले " हा आक्षेप होईल हे मी गृहीत धरून होतोच .
मात्र अतिशय नम्रपणे पण ठामपणे मी सांगू इच्छितो की माझी गझल तांत्रिक दृष्ट्याही निर्दोष आहे .
मी शाळेत मराठी शिक(व)तो . त्यामुळे वृत्तांचा खूप नाही थोडाफार अभ्यास झाला.
वरवर तांत्रिक दृष्ट्या सदोष वाटणारी ही गझल लिहितांना हा थोडाफार अभ्यास कामी आला .
" मतल्यात एकदा वृत्त ठरले, जमीन ठरली की, सबंध गझलेत ते वृत्त कायम वापरायला हवे. "या आपल्या मता विषयी दुमत नाही . आपल्या मते शेवटचे अक्षर लघु ,तर सर्व मिसर्यातील शेवटचे अक्षर लघुच आले पाहिजे . नियम असा आहे की1) "वृत्त कवितेतील चरणाच्या शेवटी येणारे लघू अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते दीर्घ मानावे ." (संदर्भ-सुगम मराठी व्याकरण लेखन - मो.रा. वाळंबे पान नं .142 )
2) र्हस्व स्वराते लघु बोलताती l दीर्घ स्वराते गुरु नाम देती l
पुढे अनुस्वार विसर्ग येतो l संयोग र्हस्वास गुरुत्व देतो ll
-संदर्भ - वृत्तदर्पण ,परशुरामपंततात्या गोडबोले
या नियमानुसार माझ्या गझलेकडे पहाल तर लक्षात येईल की वृत्त सदोष नाहीच .
घातला पायात चाळ ;
घेतला त्यांनीच आळ ..
या मतल्यात चाळ आणि आळ मधले "ळ" अकारांत आहेत खरे ,आणि त्याचा उच्चार व्याकरण शास्त्राच्या नियमाप्रमाणेच कशाला, असाही दीर्घच होतो . त्यामुळे मतल्यातले "ळ" गुरु आहेत . म्हणजेच खालच्या सर्व मिसार्यातली अंत्याक्षरे दीर्घ तर गुरु असतीलच पण लघु अक्षरेही गुरुच असतील . हे जर बरोबर असेल तर गझल निर्दोष सिद्ध होतेच . जाणकारांकडून मला अधिक जाणून घ्यायला आवडेल .
रे करुनी आत्महत्या ;
जिंकता येतो न काळ ..
त्यामुळे या आणि पुढच्या सर्वच मिसर्यातील पहिल्या ओळीतील शेवटचे गुरु अक्षर वाचतांना कोठेही वृत्तभंग झाल्यासारखे वाटत नाही . प्रवाहीपणात कोठेही अडथळा जाणवत नाही . ही गझल लिहतांना ती स्वाभाविक प्रवाह घेऊन आली . मतल्यात र्हस्व आणि खालच्या प्रत्येक मिसर्यातील पहिल्या ओळीचे अंत्याक्षर दीर्घ येत होते .त्यामुळे मलाही क्षणभर वृत्तभंग होतोय की काय असे वाटत होते . पण तसे काहीच नव्हते . मिसरयातल्या प्रत्येक पहिल्या ओळीतले शेवटचे अक्षर दीर्घ येऊनही गझलेतला प्रवाहीपणा कुठेही डिस्टर्ब होत नव्हता .(एक) आणि वृत्ताचा नियमही पाळलेला होताच .(दोन)
आता आपण जे पर्यायी शेर देतात त्याविषयी ...
आपण अशा पर्यायी शेरातून निर्दोष तंत्र सांगू इच्छितात इथपर्यंत काहीच अडचण नाही . पण आपल्या पर्यायी शेरातून मूळ कविच्या मनातील विचार,चिंतन किंवा भावनेचा जो स्ट्रोक ,धक्का त्याला साधलेला असतो तो आपल्या पर्यायी गझलेमधून साधतोच असे नाही . याचे साधे कारण एवढेच आहे की .तो आपला (निर्मिती) अनुभव नसणार . असा प्रयत्न आपल्या गझलेबाबतही कुणी केला तरी हेच होणार . आपला स्ट्रोक दुसर्यास साधेलच असे नाही . मन, भावना आणि प्रत्येकाची स्थूल किंवा सूक्ष्म अस्मिता असते . याही गोष्टींचा आदर व्हायला हवा.
त्यामुळे आपला हेतु निश्चितच विधायक असला तरी आपण दिलेल्या पर्यायी गझलेविषयी असेच होत राहील .
आपण माझ्या गझलेतील पहिला शेर मतला बदलून
घातले पायात चाळ!
का न यावे सांग आळ?
असा लिहिला आहे . " पायात चाळ घातलेस ना ! मग आता आळ का बरे येणार नाही ?(म्हणजे चाळ घातल्यामुळे आता तुझ्यावर आळ येईल ) " असा काहीसा भाव आपल्या पर्यायी शेरमधून ध्वनित होतो असे मला वाटते . आणि मला असे म्हणायचेच नाही . मी "चाळ" हा शब्द स्वातंत्र्याची प्रतिमा म्हणून योजलेला आहे . तर
"आळ" हा शब्द मी बंधन या अर्थाची प्रतिमा म्हणून योजलेला आहे . .मला त्यातून सांगायचे ते असे की . तुम्हीच मला स्वातंत्र्य देतात आणि तुम्हीच ते हिराऊन घेतात ?हा कुठला न्याय? हा माझ्या विचारांचा .भावनेचा स्ट्रोक आपल्या पर्यायी शेरमधून नाही येत . शिवाय अर्थ विपर्यास होतो तो वेगळाच
आपण असे पर्यायी शेर द्यावेत की नाही हे आपले स्वातंत्र्य आहे . मी माझे मत नम्रपणे मांडले .
वाद ,चर्चा हे बुद्धीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे . त्यातून कटुता निर्माण व्हायला नको . इतकेच .
माबोवर लिहिणारी सर्वच मंडळी गंभीरपणे लिहिणारी आहेत . नम्रतेनेच एकमेकांना सर्वजण पेश येतात . दोष ही स्पष्टतेने दाखवतात ,दादही मोकळेपणाने देतात. हे मोकळं वातावरण कायम रहायला हवे .
पुनश्च सर्वांचे आभार ! चु.भ.दे.घेणे .
कमलाकर सर, नमस्कार! >> "वृत्त
कमलाकर सर,
नमस्कार!
>> "वृत्त कवितेतील चरणाच्या शेवटी येणारे लघू अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते दीर्घ मानावे ." (संदर्भ-सुगम मराठी व्याकरण लेखन - मो.रा. वाळंबे पान नं .142 ) <<
मान्य! पण हा नियम गझलेला लागू होत नाही. गझल हा परंपरागत मराठी काव्यप्रकार नाही. आदरणीय भट साहेबांनी लिहून ठेवलेल्या 'गझलेतील बाराखडी'तील खालील भाग पाहावा -
"९. शेर लिहितांना शेवटच्या शब्दातील शेवटचे अक्षर लघू असल्यास ते कधीही गुरू करू नये.
शेराच्या ओळीतील शेवटी असलेले लघू अक्षर गुरू करण्याची एक अत्यंत वाईट सवय खोड मराठीतील बऱ्याच कवींना फार वर्षांपासून लागलेली आहे. उदाहरणार्थ-
ही वाट हुंदक्याची थकली अता रडून s s s
रहदारि गच्च आहे देवा तुझ्यापुढून s s s
एकवार 'रहदारि' मधील ऱ्हस्व "रि" समजून घेता येईल. पण ओळ संपतांना हा 'न s s s s s' कशासाठी?
म्हणून निदान तरूण पिढीने तरी ही चूक करू नये. व्याकरणाची बाब बाजूला ठेवली तर शेवटच्या लघू अक्षराला ओढूनताणून गुरू केल्यावर ओळीतील प्रसाद व माधुर्य कमी होते, हाही मुद्दा लक्षात घ्यावा."
इथे - http://www.sureshbhat.in/node/16
>>>पण हा नियम गझलेला लागू होत
>>>पण हा नियम गझलेला लागू होत नाही. गझल हा परंपरागत मराठी काव्यप्रकार नाही.>>>>>>
रणजीतजी , मान्य . पण गझल ही वृत्त कविता आहे हे तर नक्की . (1)
(2) माझ्या गझलेचा लगक्रम गालगागा गालगागा असा आहे . प्रत्येक मिसर्यातील पहिल्या ओळीत हा लगक्रम
दिसून येतो . तेथे तो आपोआप येतो . ही गझल लिहितांना मतल्यात र्हस्व आणि प्रत्येक मिसर्यातल्या पहिल्या ओळीत अंत्याक्षरात दीर्घ हे माझ्याही लक्षात येत होते हे मी वरती सांगितले आहेच .आणि वृत्त कवितेतले 1) "वृत्त कवितेतील चरणाच्या शेवटी येणारे लघू अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते दीर्घ मानावे ." (संदर्भ-सुगम मराठी व्याकरण लेखन - मो.रा. वाळंबे पान नं .142 )
2) र्हस्व स्वराते लघु बोलताती l दीर्घ स्वराते गुरु नाम देती l
पुढे अनुस्वार विसर्ग येतो l संयोग र्हस्वास गुरुत्व देतो ll
-संदर्भ - वृत्तदर्पण ,परशुरामपंततात्या गोडबोले "
हे नियमही अनुमोदन देत होते. म्हणून मी प्रत्येक मिसर्यातले शेवटचे अंत्याक्षर र्हस्व येईल असा प्रयत्न केला नाही .मतल्यातल्या "ळ" ला मी र्हस्व मानलेच नाही . कारण ते अंत्याक्षर आहे . आणि म्हणून ते स्वभावत: दीर्घ आहे . त्यामुळे खालच्या प्रत्येक मिसर्यातल्या पहिल्या ओळीतील अंत्याक्षर मला र्हस्व करणे आवश्यक वाटले नाही . शिवाय त्यातील प्रवाहीपणाला कोठेही अडथळा येत नव्हता .
अर्थात हे माझे मत आहे . ते सदोष असू शकते . आपण दिलेला भट साहेबांचा संदर्भ मी पूर्वी वाचला होताच . तरी हा प्रयोग केला . तो भट साहेबांच्या नियमा प्रमाणे चुकीचा आहेच . त्यामुळे आमची मन :पूर्वक माघार .
ही चर्चा बरोबर वळ्णावरून जाते
ही चर्चा बरोबर वळ्णावरून जाते आहे .............
गझल मराठी काव्यप्रकार नसेल तर तिला लगावलीचे नियम का लावले जातात ?
उर्दू हिन्दी सारखे उच्चारान्च्या लकबीप्रमाणे शब्दाचे वजन ठरवून अरकान मोजून मग त्या बहरेत गझला का करत नाही आपण ...........?
त्या त्या वृतास ठराविक लगावली अपेक्षित असते
त्या लगावली मुळे आपसूकच अक्षरसंख्यादेखील पाळावी लागत असताना आपण आधल्या मधल्या एखाद्या शब्दासाठी र्हस्व दीर्घ च्या सुटी घेतोच की
मग शेवटच्या अक्षरासाठी का नको ............
म्हण्जे आपण अक्षरगणातही अक्षरांच्या संख्येला महत्व असूनही ते देत नाही (वर अक्षरछंद गझलेत अस्पृश्य मानले जातात ते वेगळेच !!)
सूट घेणे कमिपणाचे वगैरे असेल तर एकही....... अगदी एकही सूट घेतली नाही पाहिजे आपण !!
एकच प्रतिसाद डबल झाला म्हनून
एकच प्रतिसाद डबल झाला म्हनून हा सम्पादित करतो आहे
वैभवराव, आपण मांडलेले विचार
वैभवराव,
आपण मांडलेले विचार खरोखर प्रवर्तक आहेत.
प्रवर्तक वगैरे काही नाही हो
प्रवर्तक वगैरे काही नाही हो जितूजी /जीतुजी / जीतूजी( जे असेल ते असो मी तुम्हाला 'रणजीत"च म्हण्णार) !! सुचलं ते मांडलं..........इतकंच
पेपरात नाही का "इथल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही "वगैरे लिहितात ते ..........!!
मध्यंतरी 'मुक्त गझल' असा एक
मध्यंतरी 'मुक्त गझल' असा एक काव्यप्रकार ऐकीवात आला होता. त्यावर गांभिर्याने विचार व्हायला हवा.
एका गझलेत किमान ५ च शेर का असायला हवेत? ४ असले तर ? उगाच ओढाताण करून पाचवा शेर लिहायचा? असा विचार मला बरेचदा पडतो.
मीही मुक्त गझल बद्दल ऐकून
मीही मुक्त गझल बद्दल ऐकून आहे
आपणास अधीक माहिती असेल तर कळवा .....प्लीज
उदाहरण वगैरे दिलत तर फारच उत्तम
जरूर जरूर कळ्वा वाट पाहतो आहे
नागपुरचे सुप्रसिद्ध कवी श्री.
नागपुरचे सुप्रसिद्ध कवी श्री. ज्ञानेश वाकुडकर त्यांच्या आगामी काव्यसंग्रहात 'मुक्त गझल' हा प्रकार समाविष्ट करणार होते. त्या संदर्भात एक पोस्ट त्यांनी बर्याच दिवसांपूर्वी 'थो.पु.' वर टाकली होती. सोबत एक मुक्त गझलही दाखल्यादाखल दिली होती. संबंधित रचनेत माझ्या आठवणीप्रमाणे एकूण ४ च शेर होते. आणि बहुतेक एका ठिकाणी अलामत भंग होता.
मला त्यांनी मांडलेला 'मुक्त गझल' हा विचार पटला की नाही, हा मुद्दा वेगळा कारण मी त्यावर फारसा विचार केला नाही. कारण अलामत पाळता येत नाही किंवा काफिया जमून येत नाही असा अनुभव मला क्वचितच येतो. अश्या वेळी मी उगाच जास्त त्रास करून न घेता एक तर ती रचना तशीच बाजुला ठेवून देतो किंवा कुणाची तरी मदत घेतो किंवा सरळ मतलाच 'सोडवून' घेतो !!
मला गझलेतील उपरोक्त "५ शेर असायलाच हवेत" हा नियम कधी कधी जरा समजून येत नाही. तिचे इतर नियम मला कधी फारसे जाचक वाटले नाहीत.
थो. पु. = थोबाड पुस्तक = फेस बुक
गझलेत ५ शेर असावेत हा नियम
गझलेत ५ शेर असावेत हा नियम बहुधा इतर उर्दू फारसी रचना उदा. कता वगैरे यान्च्यापासून गझलेचे वेगळेपण लगेच स्पष्ट व्हावे यासाठी केला असावा ...........बाकी ५ ही सन्ख्या आणि गझलेचे गझलपण याचा काही सम्बन्ध असेल असे नाही वाटत.............हे माझे एक निरीक्षण आहे............मलाही सत्य नेमके माहीत नाही
मला ५ ही शेरसन्ख्या गाठताना विशेष अड्चणी येत नाहीत पण ५ पेक्षा जास्त शेर कारायचे म्हणताना धास्ती वाट्ते
बहुतेक करून मी ५ शेर झाले की आता गझल झाली आता बास असे मानून गझल थम्बवतोच