Submitted by बेफ़िकीर on 10 May, 2012 - 07:19
http://www.maayboli.com/node/34875 चे विडंबन
त्या आत्यंतिक वासांची मळमळ अजून आहे!
गझलोत्सव कधीच सरला; भळभळ अजून आहे!!
रोखले मोठमोठाल्ले पर्यायी शेर परंतू
इस्लाह द्यायची त्यांची, चळवळ अजून आहे!
धुगधुगीच केवळ उरली गुलमोहरावरी यांची
पण गप्पांच्या पानांवर वळवळ अजून आहे!
आई, वडील दोघांची तकदीर चांगली नव्हती
मी त्यांना झालो याची हळहळ अजून आहे
काळजात माझ्या होते धडधड घडीघडीला;
प्रत्येक पोरगी म्हणते सारे निष्फळ आहे
ते वीर मुक्तछंदाचे गेले कुठे कळेना;
पण त्यांचे लिखाण सारे बाष्कळ अजून आहे
कर्जे फेडत हा नवरा गतप्राण जाहला पण
पत्नीचे भारीमधले पातळ अजून आहे!
मी जेव्हा बघतो तेव्हा त्यांचे ललीत येते;
अन विचारले की म्हणती पुष्कळ अजून आहे!
रसरशीत झाली होती त्याची विडंबने पण
'बेफिकिर' गझल करतो ती पोकळ अजून आहे
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
मी पहिला काळजात माझ्या होते
मी पहिला
काळजात माझ्या होते धडधड घडीघडीला;
प्रत्येक पोरगी म्हणते सारे निष्फळ आहे >> अजून टाका की
धुगधुगीच केवळ उरली
धुगधुगीच केवळ उरली गुलमोहरावरी यांची
पण गप्पांच्या पानांवर वळवळ अजून आहे!
खूपच मार्मिक विडंबन!!!!
(No subject)
ekhaadaa sher viThobaavar paN
ekhaadaa sher viThobaavar paN yaayalaa havaa hotaa ki
विठु माउली वैवकुं सोबत
विठु माउली वैवकुं सोबत Meeting मधे आहेत असे खात्रीलायक सुत्रांकडून नुकतेच समजले
(No subject)
(No subject)
अन विचारले की म्हणती पुष्कळ
अन विचारले की म्हणती पुष्कळ अजून आहे!
>>>
अवघडे
विठु माउली वैवकुं सोबत
विठु माउली वैवकुं सोबत Meeting मधे आहेत असे खात्रीलायक सुत्रांकडून नुकतेच समजले >>>>>>>>>>>>>>
मी अन् विठ्ठल बीझी होतो...पहा पुरावा त्याचा
विडंबनाची खीर वरपली ओघळ अजून आहे
हा.............................ओघळ अजून आहे !!!!


'निष्फळ'च्या शेरात गझलेचेच
'निष्फळ'च्या शेरात गझलेचेच नाही तर रदीफाचे ही विडंबन झाले आहे ......वाह बेफीजी !!
म्हणूनच हा शेर फक्त विडंबनासारखा न वाट्ता शेरासारखा देखील वाट्तो.