Submitted by निंबुडा on 27 January, 2012 - 05:02
ढगांचं आपलं एक बरं असतं
जड झाले की बरसून मोकळे होतात
मग मी ही ठरवलं
आपणही आता असंच वागायचं
दु:ख, वेदना, राग, संताप
सगळ्या-सगळ्याचा एका क्षणात निचरा करायचा!
पण एखादा चुकार ढग असतोच ना...
तो नाही हा नियम पाळत
वाहत राहतो त्याचं ओझं अव्याहत
पण तरी एक दिवस तो फुटतोच!
पण मग त्याला पाऊस म्हणत नाहीत
त्याला म्हणतात ढगफुटी....!
मी ही त्या अशाच चुकार ढगांपैकी एक!
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर ! इतकी अर्थपुर्ण आहे.
सुंदर ! इतकी अर्थपुर्ण आहे. मला फार आवडली.
तु गायब होतीस का आयडी बदलला होतास काही दिवस?
त्या ओझं वाहणार्या ढगाचं
त्या ओझं वाहणार्या ढगाचं दु:ख त्यालाच बिच्यार्याला ठावे...बाकी जे बरसून जातात ते मात्र भाग्यवान असतात..! छान!
मस्त लिहिली आहेस. आशय आवडला.
मस्त लिहिली आहेस. आशय आवडला.
आशय आवडला. बर्याच
आशय आवडला.
बर्याच महिन्यांनी?
मस्तंच ....... आवड्ली
मस्तंच .......
आवड्ली
छान कविता ,सर्वांच्या मनात
छान कविता ,सर्वांच्या मनात असे ढग तयार असतात.(अशिच एक ढगफुटी अण्णा हजारेंच्य रुपाने दिल्लित झाली.)
ह्म्म्म .... मनात अती साचलं
ह्म्म्म .... मनात अती साचलं की केव्हातरी उद्रेक होतोच.
हा आशय कवितेतून समजतोय.
बर्याच दिवसांनी ढग
बर्याच दिवसांनी ढग फुटला?
भा.पो!
आशय पोहोचला..
आशय पोहोचला..
छान आहे,आवडली ढगफुटी.
छान आहे,आवडली ढगफुटी.
मनिमाऊ + १. अप्रतीम आहे. आता
मनिमाऊ + १.
अप्रतीम आहे.
आता कवितांची ढगफुटी होऊदे
येउद्या आणखी!! 
निंबुडा...बरेच दिवसांनी ! खूप
निंबुडा...बरेच दिवसांनी !
खूप आवडली कविता
कविता सुंदर आहे हे खरेच, पण
कविता सुंदर आहे हे खरेच, पण वाचून फक्त मर्यादित अपेक्षा पूर्ण होतात. कवी किंवा नायक/नायिका दु:ख, वेदना, राग, संताप आपल्या ठायी सहन करत बाळगत राहिली आहे आणि निसर्गनियमानुसार त्याचा निचरा होणारच आहे इतकेच. उल्लेखलेल्या दु:ख, वेदनांचे अधिक स्पष्टीकरण असते तर कवितेला तिसरे परिमाण लाभले असते.
कविता सुरेख आणि सुंदर आहे.
कविता सुरेख आणि सुंदर आहे.
छान आहे कविता ! आवडली.
छान आहे कविता ! आवडली.
सुंदर कविता.
सुंदर कविता.
आवडली कविता, निंबुडा.
आवडली कविता, निंबुडा. ढगफुटीचा ह्या बाबतीतल वापर अतिशय समर्पक... छानच.
अप्रतिम
अप्रतिम
कविता म्हणून तितकीशी आवडली
कविता म्हणून तितकीशी आवडली नाही. पण अर्थ, प्रतिमा तर उत्कृष्ट.
मस्त कविता, आशय हा मूळ गाभा,
मस्त कविता, आशय हा मूळ गाभा, त्यामूळे खुपच आवडली..!!
मस्तच !!
मस्तच !!
सुंदरच कविता निंबे
सुंदरच कविता
निंबे 
छानै!!!
छानै!!!
छानच. आवडली.
छानच. आवडली.
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार!
छान कविता
छान कविता
प्रचंड भारी... >>पण एखादा
प्रचंड भारी...
>>पण एखादा चुकार ढग असतोच ना...
तो नाही हा नियम पाळत
वाहत राहतो त्याचं ओझं अव्याहत
खरंय न कित्ती......
मस्त लिहितेस गं तू....:)
वेक्स
वेक्स
अरे हो रियाचे जाहिर आभार
अरे हो रियाचे जाहिर आभार मानायचे राहिले नाही का लिंक्सबद्दल....बस क्या भिडू (निंबी वैतागेल न अशाने म्हणजे विषयांतराने
)
वेक्स आभार राहू देत चॉकलेट्सच
वेक्स आभार राहू देत चॉकलेट्सच बघ तेवढं

निंबु तुला कळालच असेल की मी रिक्षा फिरवलीये तेंव्हा आता तूही चॉकलेट्स लक्षात ठेव
Pages