प्रेरणास्रोत : निशिकांत यांची द्विभाषिक गझल "रूखी सूखी दावत ( द्विभाषिक ग़ज़ल )"
टिचभर गझला लिहिण्यासाठी रोज कशाला हवी कवायत?
खून पसीना छोडो, भैया, इतनी मुष्किल नहीं किताबत
पहा दीन वाचकांस देतो तत्परतेने गझल द्विभाषिक
सवाल मेरा आज कवी से, "गयी तुम्हारी कहाँ रिवायत?"
शेर सांगता दुसर्यांना आनंदित होतो कवी परंतू
कहनेवालें यहाँ हज़ारों, सुननेवाला मिले, गनीमत
दिवे लागले, अतिथी गेले, तूच उबारा माझा आता
सोनेसे जागना है बेहतर, तनहाईमें करें शरारत
मला न चिंता, न काळजीही, ज़नानखान्यामध्ये सुखी मी
सवाल मुझको है सिर्फ़ इतना, बनाम किसके करूँ मुहब्बत
अंधाराच्या किश्श्यांवरती आत्मवृत्त लिहिण्याला बसलो
माहताब शरमाकर बोली, "बेग़ैरत हो, मियाँ, निहायत"
अलिबाबाच्या गुहेत होत्या तिघी, संपदा, माणिक, नीलम
याद आ गयी मुझको भी किस वख़्त मगर कंबख़्त शराफत
लग्नावरती आज भरवसा कसा, कुणी अन् किती करावा?
निकाह फर्ज़ी, फर्ज़ी काज़ी, गले पड गयी मेह्र की आफत
दोषपूर्ण गझलांच्या "खोड्या" काढत केले लेखन सारे
अर्ज़ मेरी है यही खुदासे, रहे सुखनवर सभी सलामत
वाचकांची बोंबाबोंब (आणि शिव्या ) टाळण्यासाठी उर्दू शब्दांचे अर्थ खाली देत आहे.
किताबत - लेखन
रिवायत - परंपरा
गनीमत - पर्याप्त
शरारत - खोडसाळपणा, खोड्या
बेग़ैरत - निर्लज्ज
शराफ़त - सभ्यता
आफ़त - संकट
सुखनवर - कवी
सलामत - सुरक्षित