विरंगुळा
कोठे जाशी भोगा...!!
पाईन कोन्स
हल्लीच यलोस्टोन नॅशनल पार्कची ट्रिप करून आले .. काही वर्षांपुर्वीच्या मोठ्या वणव्यामुळे पार्कमधला बराच भाग (forestation, पाईन इ. वृक्ष) जळून गेला आहे .. पण निसर्गाची कमाल अशी की वणव्यातल्या उष्णतेमुळे पाईन कोन्स फुटून परत बीजांकुरण झालेलं आहे आणि बर्याचशा भागात नविन तरुण पाईनचे वृक्ष दिसून येतात .. तसे पाईन कोन्स मी रहाते तिकडेही खुपच दिसतात पण हे यलोस्टोनमधले आकाराने छोटे वाटले आणि का कोण जाणे जास्त सुंदर वाटले (सुट्टी असल्याने चिंतामुक्त असलेलं मन, वेगवेगळ्या स्वरुपात ठायी ठायी दिसणारा जादूगार निसर्ग ह्यांचा परिणाम असावा :)) ..
मैने कहा फुलोंसे ..
मैने कहा फुलोंसे हसो तो वो खिलखिलाके हस दिये ..
विरंगुळा
विरंगुळा
विमानं धावती शेअर्सची, टीव्ही-स्क्रीनच्या "रनवेवर"
धरावा-सोडावा क्लच नजरेचा, अन् बघावा प्रवास नफ़ातोट्याचा.
कुठे मंदी कुठे संधी, दिसतो गुंता बॅंकेच्या खात्याचा
खुलता अन् बंद भाव, बघुया लागतो का ठाव.
चेहेर्यावर अर्थमंत्रीच असल्याचा भाव,
जगात सर्वत्र दिसतो मंदीचा फटका,
समाधान एकच - टीडीएस मघून सुटका !
सुगंधी कट्टा:
सुगंधी कट्टा:
हा आहे दौरा एका आठवाचा स्मृतीतल्या साठवाचा
वळणावळणानी उलगडतील चित्रांच्या लडी
तुम्हीसुद्धा सामील व्हा ह्या प्रवासात दोन घडी.
धुक्यात हरवलेल्या शोधताना वाटा जुन्या आठवणींचा सापडेल का पत्ता?
जिवाभावाच्या मित्रांचे सुटलेले धागे काळाबरोबर सरले मागे.
पण मग त्या सरलेल्या दिवसांचे काय?
प्रवाहात भेटलेल्या जीवालागांच काय?
काहीच नात उरलं नाही ?
कि बरेच दिवसात भूतकाळात डोकावलोच नाही?
आणखी एक विचारू तुम्हाला?
मला सांगा मित्रांना इतक्यात विसरलात काहो?
भान हरपलेले ते दिवस खरंच सांगा, कुठे विरले काहो?
कुठे गेल्या ह्या आठवणी? कसं वाढलं अंतर....
मुलं लाजवतात तेव्हा !
किस्से गमतीचे
कधी कधी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात असे कांही लहान मोठे प्रसंग सहज होऊन जातात कि
त्याची आठवण आपल्याला कायम हसू आणते.मग आपण रस्त्यात असू किंवा घरात. आपल्याला हसू
आवरत नाही आणि विनाकारण लोकांचे गैरसमज होतात. आज असे प्रसंग विरंगुळा म्हणून सांगायचे
ठरवले आहे. बघा तुमच्याहि कांही आठवणींना उजाळा मिळतो का ?
***********************************************
एकदा मी आणि माझी मैत्रीण तिच्या अंगणांत गप्पा मारत बसलो होतो. एवढ्यात चप्पल घासत
रविवारी भल्या सकाळी
वेळ : सकाळी ७:०० वाजता
स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप
वार : रविवार
काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!
यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)
सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...
(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला
जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका
*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे
*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे
*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात
*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे
रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो
*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात
*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात
*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात
Pages
