एयर ड्राय क्ले पासून बनवलेले गणपती बाप्पा!!

Submitted by पूनम ब on 9 November, 2011 - 12:36

हा पाच गणपती बाप्पाचा सेट एयर ड्राय क्ले पासून बनवला आहे.

clay ganesha1.jpg

गुलमोहर: 

खूप सुंदर पूनम.
एयर ड्राय क्ले म्हणजे नक्की कसा असतो? खूप सॉफ्ट असतो का?
वेगळ्या रंगात मिळतो? की तुम्ही नंतर रंगवलंय?
स्टेप बाय स्टेप माहिती देऊ शकाल का?

तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल..:)एयर ड्राय क्ले खूपच मऊ आणि हाताला चिटकत नाही.त्यामुळे त्यावर काम करणे खूपच सोपे जाते. पण या मातीवर खूप लवकर काम करावे लागते. हवेशी संपर्क आल्यावर हि माती कठीण होऊ लागते. हि माती वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. हे गणपती हाताने बनवले आहेत..एक एक भाग बनवून घेऊन ते एकमेकांना जोडले आहेत..जोडण्यासाठी १-२ पाण्याचे थेंब टाकावे..थोडे कठीण झाले तर पाण्याची गरज पडते..एका दिवसात पूर्ण कठीण होतात..या मातीमुळे वस्तू वजनाने खूप हलक्या होतात. दुसऱ्या दिवशी यावर काळ्या रंगाच्या मार्कर पेन ने डिझाईन बनवले आहे.

माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/

व्वा! मस्त! गम्मतच्चे! Happy आवडले.
एअर ड्राय क्ले म्हणजे नेमक काय? इकडे जी स्टेशनरि दुकानातुन रन्गित क्ले मिळते तीच का?

छानच!! ह्या प्रकारचा क्ले वापरून अगदी घरच्या घरी गणपती बाप्पा बनवता येतील मस्त! Happy

Pages