कविता
मन
शोले.
यार, थोडी तू,
ढोसून घे !!
आज, जरा तू,
जगुनी घे !!!!
पाहशील तोच,
कितीदा "शोले "?
ष्टोरी ती पाठ,अन,
जीवन रटाळ झाले !!!!
भूतकाली रे,
काय दडलंय,
नको उगालूस
जे घडलय,
त्यावाचून का,
काही अडलंय ??
त्यापेक्षा पेला,
तो भर जरा,
जीवनात आनंद ,
भर जरा !!!!!!
वर्तमानाचा तू तर राजा,
दुखाचा न गाजावाजा,
आला दिन होई वजा,
कष्ट कर अन मार मजा,
माझी कविता ..........!!
कवितेस शब्दी ,
बांधु कि ,
मलाच शब्दात ,
बांधु मी ?
चाकरमानी ,
ती शब्दांची ,
का म्हणू,
मान्य मी ?
मस्त कलंदर,
एक अवलिया,
मजला मीच,
जाणे मी !!
निपजते जर,
कविताच "हटके"
का म्हणू,
सामान्य मी ?
प्रतिभेस वेसनी,
नभास गवसणी,
का न म्हणू,
अमान्य मी ?
जागीर त्या,
प्रस्थापितांची,
का करू ,
मान्य मी ?
खबरदार .....!!
"सोशल",कावल्यांनो,
का मुलाहिजा ,
बाळगावा मी ?
माझीच ती कविता,
अन कवितेचा मी !!
भस्म्यांची पंगत
भस्म्यांची पंगत
हे राव, ते राव,
या ना सगळे,
खा ना राव!
डोक्यास्नी लंगोट,
गेंद्याचं कातडं
पेव फुटलय,
खा ना राव!!
रस्ते खा!
पूल खा!
शस्त्र खा!
अस्त्र खा!
बापाचीच पेंड,
जरा निवांत खा!!
चारा खा!
भूखंड खा!
खनिज खोदून खा!
वाळू उपसून खा!
वाइच दमानं खा!
“आदर्श" ठेवा,
देशास गहाण ठेवा,
जागतीक बँकेचा मेवा
निवांत खावा!
सडू द्या गहू पाव्हणं,
जरा निवांत जेवा!!
देश थंड, प्रजा षंढ!
न्यायपालिका दंड!
भ्रष्टाचार उदंड!
काय नाय होत बंड!
चार घास दमानं खा!!
बोटी घ्या बोटी,
टुजी थ्रीजीच्या बोटी,
राजा झ्याक आचारी,
प्रधान दरबारी,
फक्कड जमलाय बेत,
जरा दमानं घ्यावा!!
तिथे चल..!
माझ्या नकळत
मला-
तिथे घेऊन चल.!
त्या विलोभनीय दुनियेत ..!
जिथे,
चंद्राला त्याच क्षितीज
आणि
वाऱ्याला त्याचा स्पर्श
कधीच दूर नाही..!
माझ्या विचारांना
आणि
माझ्या मनाला
भूतकाळाचा गंध नाही..!!
जिथे
सांजवेळी-मनाची शांती
आणि
रात्रीत -उद्याचे स्वप्न
माझी वाट पाहत आहे..!!
माझा हात
अलगद पकडून
मला-
तिथे घेऊन चल..!!
त्या मनाच्या राज्यात ..
जिथे
डोळ्याचे विचार सांगायला,
शब्दांचा डाव
आणि
शब्दांच्या अर्थामागे
स्वार्थी हेतू कधीच नाही..!
माझं मन
आणि
माझा श्वास
ओल्याचिंब शब्दासाठी
तरसत नाही..!!
जिथे
प्रत्येक डोळे ओळखतात
शब्दांचे भाव ,
आणि तो मोगरा
अंदोलने
पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू
काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू
हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू
घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू
ओठांस माणकांची आलेपने फिरंगी
गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी
काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी
अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी
अस्पर्श गोत न्यारे गेले विरून वारे
चहुओर रजतकांती आनंदघन पसारे
हळव्या सुरात हलके गंधर्व गीत भारे
गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय सारे
............................अज्ञात
कॄतार्थ
माझा आज वाढदिवस असंख्य मित्रांनी / ज्येष्ट व्यक्तींनी शुभेच्छा दिल्याच आहेत
त्याचे आभार काव्यात्मक रुपात मानन्याचा हा प्रयत्न
कॄतार्थ
मातापित्याचे औदार्य नुतन
उषःकाल पाहतो आहे
पुर्व पुण्याईचा संचय
जिवन सुफलाम ठेवित आहे
जाणतेअजाणतेपणी झालेल्या
आपल्या सहकार्याचा ॠणी आहे
काय द्यावे काय घ्यावे,
मनाचा तेवढा धनी आहे
ज्येष्ठाचे आशीर्वाद, स्नेहीच्या शुभेच्छा
उत्कर्षा यातच आहे
आव्हाने येतात, मनमोकळेपणे
जिवन गाणे गातच आहे.
माझा होशील का?
माझा होशील का?
तुजसाठी मी आतुरलेली
नातीगोती सर्व विसरली
विसरली? नव्हे, तुझ्यात विरली
परंतु कधीतरी आठव येता
विसर पाडशील का?
सख्या, तू माझा होशील का?
कधी कधी मी खोड्या करता
बाबा मजला रागे भरता,
रागावून मी रुसून बसते
उपाशीच मग झोपून जाते
पगार
Pages
