अंदोलने

Submitted by अज्ञात on 4 May, 2012 - 03:58

पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू
काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू
हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू
घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू

ओठांस माणकांची आलेपने फिरंगी
गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी
काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी
अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी

अस्पर्श गोत न्यारे गेले विरून वारे
चहुओर रजतकांती आनंदघन पसारे
हळव्या सुरात हलके गंधर्व गीत भारे
गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय सारे

............................अज्ञात

गुलमोहर: 

ग्रेट राव तुम्ही ..............
जुन्या वाटणार्‍या मराठी भाषेतल्या शब्दाना संजीवनी देण्याचे काम आपण समर्थपणे व नेटाने करताहात .खूप बरे वाटते

आणि आपल्या काव्यगुणाबद्दल तर दंडवतच........... उत्कृष्ट खयाल..........जबरदस्त शब्दगुंफण.........सकस व उठावदार अभिव्यक्ती ...........तेही नेहमीच ...........मला तुमच्याकडे असलेल्या या सगळ्या गोष्टीचं कौतुक वाटतं आणि कधीकधी हेवाही .....