Submitted by मकरन्द जामकर on 4 May, 2012 - 11:42
भस्म्यांची पंगत
हे राव, ते राव,
या ना सगळे,
खा ना राव!
डोक्यास्नी लंगोट,
गेंद्याचं कातडं
पेव फुटलय,
खा ना राव!!
रस्ते खा!
पूल खा!
शस्त्र खा!
अस्त्र खा!
बापाचीच पेंड,
जरा निवांत खा!!
चारा खा!
भूखंड खा!
खनिज खोदून खा!
वाळू उपसून खा!
वाइच दमानं खा!
“आदर्श" ठेवा,
देशास गहाण ठेवा,
जागतीक बँकेचा मेवा
निवांत खावा!
सडू द्या गहू पाव्हणं,
जरा निवांत जेवा!!
देश थंड, प्रजा षंढ!
न्यायपालिका दंड!
भ्रष्टाचार उदंड!
काय नाय होत बंड!
चार घास दमानं खा!!
बोटी घ्या बोटी,
टुजी थ्रीजीच्या बोटी,
राजा झ्याक आचारी,
प्रधान दरबारी,
फक्कड जमलाय बेत,
जरा दमानं घ्यावा!!
अरे!
हाणा त्या कुत्र्यांना,
दृष्ट लागेल ना,
सर्वांना!
वंगळ साले,
केजरी, बेदी, आण्णा,
म्हणे लोकपाल आणा!
म्हणे लोकपाल आणा!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान
छान
धन्यवाद.
धन्यवाद.
केजरी, बेदी, आण्णा, म्हणे
केजरी, बेदी, आण्णा,
म्हणे लोकपाल आणा!
म्हणे लोकपाल आणा!!>>>>
कोकलती आण्णा,
म्हणे लोकपाल आणा!
म्हणे लोकपाल आणा!!
केजरी,बेदी हे अण्णा नावाच्या झाडावर वाढलेली बांडगुळ आहेत.
छान आहे कविता.
विभाग्रज , मनापासुन आभार.
विभाग्रज , मनापासुन आभार.
जबराट सद्य परिस्थितीवर आसूड
जबराट
सद्य परिस्थितीवर आसूड ओढणारी कविता
सह्ही...., जमलीये
सह्ही...., जमलीये अगदी........
क्या बात है बहुत बढिया
क्या बात है
बहुत बढिया
मस्तच. लय आणि फोर्स दोन्हीही टॉप ............
सगल्यान्चे मनापासुन आभार.
सगल्यान्चे मनापासुन आभार.