तिथे चल..!

Submitted by sarode_vaishnavi on 4 May, 2012 - 08:38

माझ्या नकळत
मला-
तिथे घेऊन चल.!
त्या विलोभनीय दुनियेत ..!

जिथे,
चंद्राला त्याच क्षितीज
आणि
वाऱ्याला त्याचा स्पर्श
कधीच दूर नाही..!
माझ्या विचारांना
आणि
माझ्या मनाला
भूतकाळाचा गंध नाही..!!
जिथे
सांजवेळी-मनाची शांती
आणि
रात्रीत -उद्याचे स्वप्न
माझी वाट पाहत आहे..!!

माझा हात
अलगद पकडून
मला-
तिथे घेऊन चल..!!
त्या मनाच्या राज्यात ..

जिथे
डोळ्याचे विचार सांगायला,
शब्दांचा डाव
आणि
शब्दांच्या अर्थामागे
स्वार्थी हेतू कधीच नाही..!
माझं मन
आणि
माझा श्वास
ओल्याचिंब शब्दासाठी
तरसत नाही..!!
जिथे
प्रत्येक डोळे ओळखतात
शब्दांचे भाव ,
आणि तो मोगरा
तरीही कोमेजत नाही..

माझी पापणी
हळूच बंद करून
मला-
तिथे -घेऊन चल..!
त्या स्वप्नाच्या स्वर्गात..!!

जिथे
फुलापाखाराना उडण्यासाठी
फुलाच आकाश
आणि
प्रत्येक भोवारयासाठी
कमळाच अंगण
अगदी नेहमी खुलं आहे..!
माझ्या कल्पनेतील धुकं
आणि
माझं सत्यातील अस्तित्व
अगदी नेहमी एकत्र आहे..!!
जिथे
विचारांना दावांचा,
रात्रीला चंद्राचा
स्पर्श
आजही तसाच आहे..!!

तुझ्या सोबत
माझी विचारांची दुनिया ..!!
माझं मनाच राज्य..!!
माझ्या स्वप्नातील स्वर्ग..!!
पाहायला,
अनुभवायला,
खरच मजा येईल..!!

तिथल्या मातीला
तुझा गंध नक्की आवडेल..!!
तिथेही मग -
आशेचे किरण,
आठवणींच्या हिंदोळ्यावर खेळेल..!!

गुलमोहर: