कविता

शीण थोडा घालवू या

Submitted by निशिकांत on 10 May, 2012 - 03:22

पेलले ओझे, जिवाचा
शीण थोडा घालवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

जे घडावे ते न घडले
प्राक्तनाचा खेळ सारा
भोगला होता किती तो
भावनांचा कोंडमारा
जिंकली आहे लढाई
चल तुतारी वाजवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

चैन म्हणजे काय असते
हे कुठे माहीत होते
पोट भरण्या घाम आणी
कष्ट हे साहित्त्य होते
भोगले अन्याय जे जे
चल जगाला ऐकवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

वेदना भोगीत चेहरा
नाटकी हसराच होता
मुखवट्याच्या आत दडला
तो कुणी दुसराच होता
लक्तरे शोकांतिकेची
चावडीवर वाळवू या
ये सखे पाने स्मृतींची
सांजवेळी चाळवू या

दोन असतिल फक्त नोंदी

गुलमोहर: 

चिरजीवीत कहाणी

Submitted by अज्ञात on 10 May, 2012 - 00:18

सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी

ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी

बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी

............................अज्ञात

गुलमोहर: 

....तिनं कधी गायलंच नाही..

Submitted by किरण..... on 9 May, 2012 - 07:43

तांडव माझ्या शब्दांतलं तिच्या सुरात मावलंच नाही..
रुदन माझ्या काळजातलं तिनं कधी गायलंच नाही..

लय अशी आखुडली, ताल काही जमेना,
चाल अशी विस्कटली, आलापही फुटेना..
तडकले सूर सारे, तान सुरु होईना,
छंदातल्या लहरींना साथ कोणी देईना..
संगीत-पाखराचं पिल्लूही तिच्या घशात फडफडलंच नाही..
रुदन माझ्या काळजातलं तिनं कधी गायलंच नाही..!!

माझ्या शब्दांच्या गर्तेतून राग तिचा हरवला,
गाण्याच्या 'मूड'चा 'अचंबा' 'अर्थानंही' मिरवला,
कुटलेल्या भावनांचा पसारा मग त्या कवितेनंही हिणवला,
जिच्याशी खेळण्याचा कित्ता तिनं निमुटपणे गिरवला,
'Keyboard'वरील एखादं सप्तकही तिच्या बोटांखाली रमलंच नाही..

गुलमोहर: 

किरण..

Submitted by किरण..... on 9 May, 2012 - 05:55

कधी चंद्रावरती खेळतो
कधी चांदण्यांत घुटमळतो
कधी क्षितिजावरती रडतो
कधी व्यर्थ नभातून फिरतो
तो पृथ्वीवरती पडतो...
चरा-चरातून भिनतो
अंधार कसा तडफडतो....
इथे जेव्हा-जेव्हा एक 'किरण' अवतरतो.........!

धरा कशी मोहरते..
त्याच्यासाठी झुरते
अलवार स्पर्शता तो,
कळी-कळी उमलते
पाचूवर दवबिंदू थेंब-थेंब विरतो,
इथे जेव्हा-जेव्हा एक 'किरण' अवतरतो.........!

उषा कशी हुरहुरते...
मिठीत त्याच्या सजते
चाहूल त्याची होता,
दिशा-दिशा उजळते
पाऊसही मग तेव्हा उन्हामध्ये कोसळतो,
इथे जेव्हा-जेव्हा एक 'किरण' अवतरतो.........!

कधी ढगांतून लपतो

गुलमोहर: 

तो मी..तोच मी...

Submitted by आठवणीतला मी.... on 9 May, 2012 - 05:39

हसत खेळत स्वतःचाच
असाच आहे तो मी,
स्वता:च्या जगात बेधुंदपणे
स्वछंद वावरणारा तोच मी..

सुख थोडे दु:ख भारी
हसत सोसणारा तो मी,
लयबद्धतेने आयुष्य जगणारा
माणुस सामन्या तोच मी..

सहन करणे पुरुण ऊरणे
लढत जगणारा तो मी,
शत्रुलाही पुरुण ऊरेण
झुंजणारा तोच मी..

प्रेम करणे विरह सोसणे
॑अश्रु न ढाळणारा तो मी,
आठवणीमधे तुझ्याच प्रत्येकक्षणी
गुंफणारा तोच मी..

तो मी नव्हेच
होता तो तुझाच कोणी,
तु निघुन गेल्यावर मात्र
स्वत:मध्ये विखुरलेला "तोच मी"....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

" तो एक पदर मायेचा ... "

Submitted by विदेश on 9 May, 2012 - 00:06

तो एक पदर मायेचा
आधार किती आईचा

वादळात सामर्थ्याचा
भयमुक्ती उपदेशाचा
नजराणा संस्काराचा

संदेश शांत जगण्याचा
रागास शांत करण्याचा
मस्तकास थापटण्याचा

तो दर्शक सन्मार्गाचा
तो रक्षक कल्याणाचा
तो पूजक सौंदर्याचा

गुलमोहर: 

सुमनजी, सुमनजी..........

Submitted by pradyumnasantu on 8 May, 2012 - 19:33

संध्याकाळी मंद वारा
कळीरुपाला देईल फुलोरा
श्वासात त्याला घ्यायचं
मनसोक्त फुलायचं
पहाटेच्या दवबिंदूंना पाकळीनंच टिपायचं
सुमनजी सुमनजी टेन्शन नाही घ्यायचं

उमलवून जाईल पहाटवेळ
आरंभेल मग दिवसखेळ
संकटांच्या तलवारींना
लवचिक होऊन झुलवायचं
धीटाईनं हरवायचं
चतुराईनं पळवायचं
सुमनजी सुमनजी टेन्शन नाही घ्यायचं

गुलमोहर: 

माणूस आणि नावाचं नातं

Submitted by जयदीप. on 8 May, 2012 - 07:41

किती विचित्र असतं, माणूस आणि नावाचं नातं
त्याने घ्यायच्या आधी त्याचं, नाव जन्म घेतं
ओळख त्याची असूनही, त्यालाच माहीत नसतं

किती विचित्र असतं, माणूस आणि नावाचं नातं
तो जिथे पोचत नाही, तिथेही त्याचं नाव पोचतं
आणि तो पोचल्यावर, त्याचं नावच काय ते उरतं

गुलमोहर: 

दोन चारोळ्या -

Submitted by विदेश on 7 May, 2012 - 08:11

१.
अनोळखी वाटेवर क्षणभर

भेटुन जाई राजकुमार -

नाही दिसला पुन्हा जरी तो

ओढ तयाची का अनिवार !

२.
मिठीत तुझिया विसावतो मी -

म्हणू लाडके कसे तुला ?

चवळीची तू शेंग बारकी ,

दुधी टम्म मी फुगलेला !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माय....!!

Submitted by मकरन्द जामकर on 7 May, 2012 - 06:45

माय....!!

मकरंद जामकर
०७-०५-१२

आमास्नी वरपाया,
रांधतीस चारठाव ,
शिळपाक सोतास्नी ,
हाय मला ठाव .

आमास्नी गंद पावडर ,
सणा वारा चंगळ,
काटकावानी तू ,अन,
जूणेर लई वंगळ.

भाजले लेकीचे हाथ ,
घरदार ईकून ,
तीत बी म्होर तू ,
दाग दागीन ईकून .

घरादाराच्या वज्यान,
वाकलीस तू माय ,
संसाराच्या फिकीरीन ,
झिजलीस तू माय .

नाक लगड निट मेल्या ,
उग देतीस शिव्या मला ,
तुज्याकून मोट्टा देव ,
माय,दाव तरी मला ...!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता