सागराची अथांगता जमिनीपाशी
.... थांबलेली.
जमिनीची उंची समुद्रापाशी
..... संपलेली.
निळाई त्याची, हिरवाई हिची
एकमेकात बेमालूमपणे मिसळून
..... उरलेली.
दोघांची मान-मर्यादा दोघांनी
.... राखलेली.
हृदयाची नाती मनापासून
.... जपलेली.
वेगळेपणा राखत, एकरूपत्व
....लाभलेली.
http://cdn.gamerant.com/wp-content/uploads/Limbo-Review.jpg
उधाणलेला समुद्र
रोरावता वारा
लाटांचे तांडव चाले
अन प्रतिकूल आसमंत सारा
दिशांचे ढळले तारे
घोंघावती वडवानल रौद्र
उदरी तयास घेण्या
आसुसला हा समुद्र
कडाडली विद्युल्लता
लख्खं प्रकाश चोहीकडे
पाठोपाठ ऐकू येती
नभांचे चौघडे
विरत चालला हा
दिपगृहाचा प्रकाश
अंधारून आले
निळेभोर आकाश
.
हो!
त्रास होतोय मला...
तुझ्या नसण्याचा....
नाही, नाहीच सुचतय गझल...
तू असताना....
शेर सुचायचे ...एका पठोपाठ एक...
तू नाही बोललास म्हणुन...१
तू नाही पाहिलस माझ्याकडे म्हणून ...१
पाहून न पाहिल्यासारख केलस म्हणून ...१
जाम रागावलायस म्हणून...१
नि राग गेल्याचा १.....
गझल पूर्ण !
आता कफ़िये...रदीफ़....
नुसते घोंघावतात अवती भवती...
पण ...पण...त्यांचा शेर कसा बनणार
कारण शेरात आत्मा जगावा लागतो न?...
तोच हरवलाय रे केव्हाचा...
हो!
त्रास होतोय मला...
तुझ्या नसण्याचा....
नाही, नाहीच सुचतय गझल...
ए ! ऐकशील एवढ?
माझ्यासाठी नको...
रोज सकाळी रोजच्याच त्या वाटेवरुनी जाताना..
गर्दीमधले कित्येक चेहरे येता जाता पाहताना..
दिसली होती शाळेमधल्या गणावेशातील चार मुले..
भाषा त्यांची दुर्मिळ अवघी शब्दांनाही जी ना कळे..
चेहर्यावरती हसरे भाव.. उसंत नाही हातांना..
हृदयामधली शब्द-संपदा कळली होती बोटांना..
नजरे मधूनी सांधत होती संवादाचा सेतू जणू..
अबोल वाणी वदते - हसते.. या सार्याला काय म्हणू..
मला त्या क्षणी इतुके कळले.. कशास शब्दांची चाकरी..
भाषेमधले पंडीत आम्ही.. भावना तरी शून्य उरी..
धडधाकट मी.. अगाध वाचा.. तरी बोलूनी सुके गळा..
मनाच्या कानाकोपर्यात व्यापुन असतात स्वप्न तुझी
पहाटओल्या वेळा सर्व अस्वस्थ होतात
तेव्हा राहुन राहुन वाट्त............
आथवूच नयेत तुझे बोलके ओधाळ डोळॅ
ज्यात दडल आहे एक
प्रश्नचिन्ह माझ्या होकाराच
आणी आणूच नयेत डोळ्यापुधे
त्या विरलेल्या गुलाबी आथवनी
तुझ्या माझ्या प्रेमाच्या
आपल्या धुन्द सहवासाच्या
देवुच नये मनालाही कधी तुझ्या
अबोल प्रश्ननाच होकारर्थी उत्तर
या अस्वस्थ पहाटओल्या वेळी
इतक्या वर्शान्न्तर्ही!!!
पाणी पाणी रे............
खारे पाणी रे..............
नयनांचे झाले स्वस्त रे .........
न उरला कुणी सानी रे.........
नशिबी दुष्काळ र कसा .......
येतो नेमीची कसा.......
त्यासी हसू मी कसा......
त्रिश्ने ओठ फाटला कसा........
नयनी आहे ओलावा..........
दुष्काळ,मग , कसा म्हणावा ........
डोंगर हिरवेच आवडतात मला,
आकाश निळंच हवं असतं..
कसं कळत नाही, त्या हिरवाईला
ढगांचं येणं किती हवं असतं...
जयदीप
(हास्यदिना निमित्त हास्य विषयावर एक गंभीर कविता)
तणावात जगत मीच टाकलय मला वाळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
दिवाळखोर अमीर वस्ती भीक नाही मिळत
हसावं कसं हेच मुळी त्यांना नाही कळत
बाकी उतलंय हसू आता गरिबांच्याच चाळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
जीव झाला स्पर्धायुगी खूप खूप बेजार
हास्याच्या कमतरतेचा पसरलाय आजार
शोध लावुन भरा हसू औषधाच्या गोळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
हास्यक्लबात जाउन कधी मिळतय का हसू?
आतून हसू फुलवण्याला कंबर थोडी कसू
नाही तर हसू उरेल कवितेच्याच ओळीत
दान म्हणून हसू टाका एक पसा झोळीत
ही हाडामासांची माणसे,
मला काय देणार आहे?,
देवाच्या क्रुपेनेच,
मला खरे सुख लाभणार आहे
तो टाकेल नक्की माझ्या झोळीत,
चन्द्र आनि तारे
मिळालेत मला की,
ह्रुदयात मी जपुन ठेवील सारे
कित्येक दिवसाने तु,
पुढे केलास स्नेहाने हात
खरेच खुप आनंद झाला,
अण अश्रुंचे वाहिलेत पाट
ईतक्या दिवसापासुन
रुसली होती ग्रह आनि तारे
अचानक अमावसेच्या रात्री,
चमचमु लागली सारे ...........