आमरस
मी पायरी तू हापूस
दोघे होऊ समरस
नका घालू साखर
आमचा होईल विरस
त्यात घाला मिरपूड
पचायला नाही जड
पुरीशी ही सोयरीकी
आहे जन्मो जन्माची
मंगल समयी आमचाच मान
म्हणून आमची ताठ्यात मान
मी पायरी तू हापूस
दोघे होऊ समरस
नका घालू साखर
आमचा होईल विरस
त्यात घाला मिरपूड
पचायला नाही जड
पुरीशी ही सोयरीकी
आहे जन्मो जन्माची
मंगल समयी आमचाच मान
म्हणून आमची ताठ्यात मान
स्वच्छ किनारी हिरव्या दारी
नभी खगांची सोनभरारी
आकाशी विरघळे चांदवा
दिवस; उषेच्या दरबारी
पुनव जशी; शीतल अंबारी
स्वप्न पापण्यांच्या मखरी
ओतप्रोत गाण्यांच्या लहरी
जळ; प्रतिमेच्या गाभारी
गोड पिसे स्वच्छंद अंबरी
दिसे दूरचे जवळ उरी
उत्सव हा जुळल्या धाग्यांचा
रोज असावा संसारी
.............................अज्ञात
आयुष्याच्या वाटेवर तो गात होता गाणे
होता दुनियेत आपल्याच नाचत स्वछंदपणे
डोळ्यात होती स्वप्ने दिव्य आणी मनात आशा दुर्दम्य
मित्र मइत्रिणि आजुबाजुला सारे कसे उदात्त
लहानपणापासुन पाहीले होते फक्त उदात्त आणी भव्य दिव्य
त्याला कळणार कसे यापेक्षाही असते काही निराळे जीवन
हळुच त्याच्या वाटेवर भेटले दोन तिन मुर्ख मित्र
प्रशंसेने गेला भारावुन खुणवु लागले नाविन्य
हळुच अलगद वाट सुट्ली भरकटली दिशा
कळलेच नाही उदात्तेच्या वाटेवरुन घसरण झाली केव्हा
धुंदीत होता अजुनही आपल्याच, नवीन वाटेवर
खाच खळग्यांनी ठेचाळुन रक्त बंबाळलेले मन
वाटत होते आयुष्य हे असेच असायचे
खळाळते असे तुझ्या डोळ्यांतील पाणी
अशी पाण्यासवे गायली आसवांची गाणी
कोणा उमगली तू, कोणा समजलीस कधी
श्वेत श्रुंगाराशिवाय तू सजलीस कधी
तू विशीत विधवा, मी आजन्म विधुर
माझे दुख आक्रोशी, तुझा तरी मूक सूर
एकांत माझा साथी, तुज जवळ काय उरे
तू खेळले मरणाशी, माझे त्यासही अपुरे
देह तडफडतो अजुनी, घेई बाजू तो सत्येची
त्यास काय कळे वेदना, मानसिक आत्महत्येची
पहिल्या प्रहरी
तुझ्या माझ्यात
निव्वळ शब्द,
जुळवलेली वाक्ये,
पुढे परिच्छेदातल्या गप्पा,
मग रंगलेल्या पानांची चळत....
सूर्य कलू लागला आणि
मग चर्चा,
ठरवलेली वाक्ये,
उरलेले शब्द....
हुंकार... नकार..
नात्यांचे प्रयोग आणि
शास्त्रातले भौतिक नियम..
....
..
पण सगळेच नियम लागू पडतात असं नाही.
तेव्हा येणार्या पहाटेची स्वप्ने पाहू नकोस,
उरलेल्या श्वासात ही कातरवेळ निभावली तरी पुरे !
भारतातून)
पंतप्रधान-ए-पा्विस्तान
आदाब,नमस्ते,प्यार,सलाम
विनंती ही की, "पाठवा प्लीज,
उस टेररिस्ट्को हिंदुस्तान"
*
चार घरे तेथे त्याची
आठ घरे येथे देऊ
जेलमधे सा-या सुविधा
मटणपुलाव्याचाही खाऊ
*
झेड दर्जाच्या पुढची
सुरक्षा मिळेल त्याला
तुरुंगातही देऊ आम्ही
मदिरा चाखायाला
*
(शेजारी राष्ट्रातून)
मंत्रीजी, वो नही है इधर
मिला तो कर देंगे खुर्दा
प्रॊमिस करते है भेजेंगे
जिंदा हो या फीर हो मुर्दा
*
कितीक वर्षे अशीच गेली
टेररिस्टचे नख ना दिसले
त्याच्या पार्टीत जरी नाचुनी
नेते पोलीस नट्याही आले
*
क्रिकेटच्या मैदानावरही
गॊगल घालुन होता बसला
उभ्या जगाला दिसला होता
शब्द, शब्द...
इकडून तिकडे नेती वाहून
नाही कधीही हमाल रे
नित्यनूतन सदैव ताजे
शब्द मोकळे खुशाल रे
शब्द नेमके अर्था दाविती
कधी ना लावी गुर्हाळ रे
कुणीही करु दे अर्थ अनर्थी
लाऊ न घेती किटाळ रे
कितीही मोठा अर्थ बांधिती
शब्द केवढे विशाल रे
उलगडून तो दावित असता
होती आपण रुमाल रे
शब्दाशब्दी वाढत जावो
कधीही ना बेताल रे
आपण अपुल्या जागी र्हाती
हे मुलखाचे खट्याळ रे
रंगत आणिती जीवनात या
शब्द नुसती धमाल रे
रंग न अंगा लावून घेती
कितीदा नावाजाल रे
मन असेही ...मन तसेही
चाल समजण्यासाठी http://youtu.be/wvQlRB-R1Gs या संपर्क स्थळावर जा.
गगन सदृश मन अगम्य । गहन सागराशी साम्य ॥१॥
मन खंबीर खडकासमान । मन अस्थीर वाऱ्यासमान ॥२॥
कधी राग द्वेष वैऱ्यासम । कधी करुणा दया बंधुप्रेम ॥३॥
वाऱ्यासम कधी सुसाट । कधी स्तब्ध नाही कलकलाट ॥४॥
संवेदनशील सुर मन । असुर क्रूर अमानुष मन ॥५॥
मन राम पतित पावन ॥ मन बुद्धीभ्रष्ट रावण ॥६॥
जेव्हा आपलं असं कुणीही नसतं,
तेव्हा सोसता येतो एकटेपणा
एक अनिवार्य सत्य म्हणून !
आणि
साहता येतो
मनाच्या उदार भिंतींचा कोसळता आक्रोश
मनाच्याच सांदीकोपऱ्यात पिशाच्याप्रमाणे,
निर्विकार..
इथे
मनाच्या स्मशानात
स्तब्ध शांत काळोखात पेटत जाताहेत
आत्मघाती चिता -
अंधाराला डागण्या देत प्रसवताहेत
दु:खाची चिवट पिलावळ...
आताशा
तुझ्यामाझ्या मिसळत्या श्वासांतूनही
प्रकटत नाही अद्वैत !
होत नाही आताशा
तुझ्या ओठांच्या आणि डोळ्यांच्या सीमारेषेवरील सत्य , एक !
पापण्यांतील खाऱ्या पाण्यात
उरलीय नुसती धग;
नाही सोसवत आता
तुझ्या मिठीतले माझे एकटेपण ...!
_डॉ.सुनील अहिरराव
कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्या कवितेशी कुठेही संबंध नसतो
एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात
त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी
बर्याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...