चुकलेली वाट

Submitted by गुलाबी on 3 June, 2012 - 14:04

आयुष्याच्या वाटेवर तो गात होता गाणे
होता दुनियेत आपल्याच नाचत स्वछंदपणे

डोळ्यात होती स्वप्ने दिव्य आणी मनात आशा दुर्दम्य
मित्र मइत्रिणि आजुबाजुला सारे कसे उदात्त

लहानपणापासुन पाहीले होते फक्त उदात्त आणी भव्य दिव्य
त्याला कळणार कसे यापेक्षाही असते काही निराळे जीवन

हळुच त्याच्या वाटेवर भेटले दोन तिन मुर्ख मित्र
प्रशंसेने गेला भारावुन खुणवु लागले नाविन्य

हळुच अलगद वाट सुट्ली भरकटली दिशा
कळलेच नाही उदात्तेच्या वाटेवरुन घसरण झाली केव्हा

धुंदीत होता अजुनही आपल्याच, नवीन वाटेवर
खाच खळग्यांनी ठेचाळुन रक्त बंबाळलेले मन

वाटत होते आयुष्य हे असेच असायचे
कधी सुख तर कधी दु:ख असेच झेलायचे

रक्तबंबाळलेल्या त्याला पाहुन मुर्ख मित्र हसायचे
आता कसे हा आपल्यातलाच म्हणुन स्वमनी सुखवायचे

उडत होता आधी कसा सुखाच्या आकाशी
आपटला आता जमीनीवर पहा कसा आम्ही
संवाद हा मुर्ख मित्रांचा कळणार त्याला कसा
चांगुलपणा , उदात्तेशिवाय काही पाहीले नसणार्याला

हळुच एक परी आली, म्हटली, तु वाट चुकलास
राजहंस असुन कावळ्यासोबत उडालास

चल ऊठ , थांब कुरवाळणे हे रक्तबंबाळलेले मन
घे भरारी उंच आकाशात फिरुन एकदा परत

दु:ख करु नकोस जरी वाट एकदा चुकली
त्यामुळेच तर कळले ना ही वाट नव्हे आपली

स्वप्नांच्या आकशात उंच उंच उड्णे,
स्वप्नांना आयुष्यात प्रत्यक्षात साकरणे
हेच जीवन आपले
उंचच उंचच उड आता फिरुन एकदा ताकदीने

या भव्य दिव्य हेतुने झाला राजहंस प्रेरीत
उडाला स्वप्नांच्या दुनीयेत पुन्हा भरारी मारीत

वाट चुकण्याचा आता संभवच राहीला नव्हता
वाट स्वत:ची कळल्यावर उंच जाणे हाच मार्ग राहीला.

गुलमोहर: