जिवंत मुर्दा

Submitted by pradyumnasantu on 2 June, 2012 - 16:41

भारतातून)
पंतप्रधान-ए-पा्विस्तान
आदाब,नमस्ते,प्यार,सलाम
विनंती ही की, "पाठवा प्लीज,
उस टेररिस्ट्को हिंदुस्तान"
*
चार घरे तेथे त्याची
आठ घरे येथे देऊ
जेलमधे सा-या सुविधा
मटणपुलाव्याचाही खाऊ
*
झेड दर्जाच्या पुढची
सुरक्षा मिळेल त्याला
तुरुंगातही देऊ आम्ही
मदिरा चाखायाला
*
(शेजारी राष्ट्रातून)
मंत्रीजी, वो नही है इधर
मिला तो कर देंगे खुर्दा
प्रॊमिस करते है भेजेंगे
जिंदा हो या फीर हो मुर्दा
*
कितीक वर्षे अशीच गेली
टेररिस्टचे नख ना दिसले
त्याच्या पार्टीत जरी नाचुनी
नेते पोलीस नट्याही आले
*
क्रिकेटच्या मैदानावरही
गॊगल घालुन होता बसला
उभ्या जगाला दिसला होता
नेत्यांना तो नाही दिसला
*
आणि अचानक एके दिवशी
फोन आला पाविस्तानातुन
अति आनंदे बोलत होते
आपले मित्र वजिरे आझम
*
हमने एन्काउंटर है किया
टेररिस्टभाईको मार दिया
पेटी कलेवरकी भेजी है
जैसे प्रॊमिस आपको किया
*
खूष जाहले सारे मंत्रीगण
एअरपोर्टवरही जमलेपण
पत्रकार अन चॆनेलवाले
वार्तांना देण्याला सरपण
*
छबी काढण्या शवपेटीशी
अहमहमिका सुरू जाहली
अखेर जेव्हा उघडली पेटी
अलोट गर्दी तिथे उसळली
*
"शव फारच ते विद्रुप झाले
म्हणून आम्ही इथे दफनले
पाठविलाहे काळा चष्मा"
चिठ्ठीमध्ये होते लिहिले
*
मंत्र्यानी मग फोन जोडला
वजिरे आझम पाविस्तानला
"काय पुरावा चष्मा त्याचा
हे तर तुम्ही सांगा मजला"
*
(शेजारी राष्ट्रातून)
स्वत:च त्याने कचेरीमध्ये
गॊगल दिधला आणि म्हणाला
"मेरी मौतका सबूत करके
द्या हा गॊगल हिंदोस्ताला"
*

गुलमोहर: 

खल्लासच

जगावेगळी शैली थेट रोख्ठोक अभिव्यक्ती

वाह

मस्त

अभिनन्दन प्रद्युम्नजी

अजून इतरान्नी एकही प्रतिसाद का दिला नाही हे पाहून आशर्य वाटते आहे