मानसिक आत्महत्या

Submitted by अनाहक on 3 June, 2012 - 08:47

खळाळते असे तुझ्या डोळ्यांतील पाणी
अशी पाण्यासवे गायली आसवांची गाणी

कोणा उमगली तू, कोणा समजलीस कधी
श्वेत श्रुंगाराशिवाय तू सजलीस कधी

तू विशीत विधवा, मी आजन्म विधुर
माझे दुख आक्रोशी, तुझा तरी मूक सूर

एकांत माझा साथी, तुज जवळ काय उरे
तू खेळले मरणाशी, माझे त्यासही अपुरे

देह तडफडतो अजुनी, घेई बाजू तो सत्येची
त्यास काय कळे वेदना, मानसिक आत्महत्येची

गुलमोहर: 

तू विशीत विधवा, मी आजन्म विधुर
माझे दुख आक्रोशी, तुझा तरी मूक सूर

देह तडफडतो अजुनी, घेई बाजू तो सत्येची
त्यास काय कळे वेदना, मानसिक आत्महत्येची>>>

वा