" हे माझे पंढरपूर ! "

Submitted by विदेश on 29 June, 2012 - 21:51

हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर,
घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर |

वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर
नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर |

सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर
सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर |

कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर |

घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||

गुलमोहर: 

कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर | >>>>> क्या बात है......... फारच सुरेख....