Submitted by निशिकांत on 29 June, 2012 - 22:41
दु:खाचे आगार i संसार सागर l
करी बेडा पार I विठ्ठला रे II १ II
विठ्ठलची आस I विठ्ठलची ध्यास I
विठ्ठलची घास I प्रसादाचा II २ II
पंढरीची वारी Iआलो तुझ्या दारी I
नको रे मघारी I प्रपंचात II ३ II
केली पायपीट I झाली तुझी भेट I
चरणीची वीट I स्वर्ग माझा II ४ II
संसारात दंग I असंगाशी संग I
जाहलो नि:संग I दर्शनाने II ५ II
तुझी रे सावली I मनाला भावली I
माउली पावली I धन्य झालो II ६ II
मनोभावे सेवा I केली तुझी देवा I
वैकुंठीचा मेवा I भिक्षा देई II ७ II
मोहाचा आजार I जाहलो बेजार I
नको येरझार I पांडुरंगा II ८ II
निशिकांता सोड I प्रपंचाची ओढ I
हरीनाम गोड I घेई मुखे II ९ II
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
३०.०६.२०१२--आषाढी एकादशी
गुलमोहर:
शेअर करा
अतिशय सुंदर, अतिशय गोड
अतिशय सुंदर, अतिशय गोड अभंग.....
शशांक + १
शशांक + १
जय हरि विठ्ठल श्रीहरि
जय हरि विठ्ठल श्रीहरि विठ्ठल.....