विठ्ठलाची वारी

Submitted by हेमंत पुराणिक on 29 June, 2012 - 07:54

नजरेत दया हृदयात माया
कटेवरी हात विठ्ठलाचे
चिपळीचा नाद मृदुंगाचा ताल
वारकरी नाचती पंढरीचे
खांद्यावरी गठुड डोईवरी टोपली
टोपलीत तुकडे भाकरीचे
आषाढ सरींनी भिजे हे अंग
परी मुखी नाम पंढरीचे
डोळ्यात सुखली भुकेची आसव
पोटाला खळगी तरी पंढरीची धाव
दिसावा पंढरी भेटावा पंढरी
जीवात भक्ताच्या तळमळ होई
ज्ञानाची पालखी तुक्याची पालखी
नाचतो वारकरी भीमातीरी
भजनी रंगतो कीर्तनी रंगतो
रिंगण घालतो वारकरी
भक्तीचा भुकेला भावाचा भुकेला
विटेवरी उभा विठुराया
जरी विटेवरी उभा पंढरपुरी
भक्ताच्या हृदयी वास करी

गुलमोहर: