कविता

अनुवाद-२

Submitted by भारती.. on 6 July, 2012 - 05:57

अनुवाद -चार कडवी..

तपकिरी डोळ्यांची एक मुलगी
चिडते एक गोष्टीमुळे
का नाही भेटलास आधीच
रोज वाद आमचा चिघळे

लाख आमची प्रीतिकूजने
एक युद्ध नित्याचे आहे
एक तिचा खुपतो मित्र मला
तिला माझी ती सखी न साहे..

जवळ येऊनही दूर आम्ही का
आहे उलगडले हे गूढ मला
कुणास तरी ती अजून आठवे
..विसरू न शकलो मीही तुला

मीही होतो तिखटच तेव्हा
तीही होती खूप चलाख
पूर्वी दोघे खेळत होतो
पण आता आहे प्रेम अमाप!

जावेद अख्तरजी- चार कतएं

कत्थई आंखोवाली एक लडकी
एकही बात पर बिगडती हैं
तुम मुझे क्यों नही मिले पहले
रोज ये कहके मुझसे लडती हैं

लाख हो हममें प्यारकी बाते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आठवांच्या हिंदोळ्यावर

Submitted by सुधाकर.. on 5 July, 2012 - 12:41

तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा
व्याकुळला कसा आज संधीकाळ
हरवल्या क्षणांची फुले दिपमाळ

झर्‍यातून येई जुन्या दिवसाची हाक
असेल का आज तरी कुणी तिथे एक
तळ्याकाठी फांदीवर बोलावितो काक
अनाठायी उगा लागे जिवाला या धाक

कशा कधी उलगल्या मनातल्या गाठी
मोहरल्या पुन्हा चंद्र-बनातल्या भेटी
अजूनही प्रियकरा इथे तुझ्यासाठी
रोज एक स्वप्नतारा जळे माझ्या दिठी

हलताना संथ स्वैर बदकांच्या माळा
अजूनही साक्ष देई तो जलाशय निळा
तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस..

Submitted by poojas on 5 July, 2012 - 08:18

धो-धो .. कोसळणारा.. पाऊस गडी मुसळधार..

रिम-झिम बरसणारी.. नाजूक नार संततधार..

सारे कसे हिरवेगार.. मरगळ झटकून पुन्हा तयार..!!

तसे एरव्ही चिखलापासून शंभर पाऊल आम्ही लांब..

आता पाऊले बिलगून उठती.. त्या चिखलातील मौज अपार..

सारे कसे हिरवेगार.. मरगळ झटकून पुन्हा तयार.. !!

तुटकी काडी.. विटका रंग.. जुन्याच छत्रीचा सरताज..

होता उलटी.. खाते पलटी.. भिजून पुरते पडलो गार..

सारे कसे हिरवेगार.. मरगळ झटकून पुन्हा तयार.. !!

गरम भजीचा खमंग दरवळ.. मृदा सुगंधी निर्झर निर्मळ..

बुटात पाणी.. खिशात वारा.. कशास कुठला पारावार..

सारे कसे हिरवेगार.. मरगळ झटकून पुन्हा तयार..!!

गुलमोहर: 

सर येते जेव्हा जेव्हा....

Submitted by रसप on 5 July, 2012 - 03:18

सरल्या स्मरणांच्या ओठी उत्कट शब्दांचे गाणे
हलकासा शीतल वारा हातातुन निसटुन जाणे
सावरतो भरकटणाऱ्या बेधुंद मनाला जेव्हा
दरवळत्या संध्याकाळी सर रिमझिम येते तेव्हा

विसरुन गेलेली प्रीती धडधडत्या हृदयी दाटे
झुकलेले अंबर पाहुन संदेह अनामिक वाटे
खिडकीची चौकट मजला खिळवून ठेवते जेव्हा
आक्रोश आतला घेउन सर धो-धो येते तेव्हा

हातावरच्या रेघांतुन भलतीच वाट सापडते
अन मनासारख्या देशी मन पळभर हे बागडते
माझ्यातच रमलो असतो मी कधी नव्हेतो जेव्हा
दबकून छुप्या रस्त्याने सर उगाच येते तेव्हा

ओथंबुन येता डोळे निर्धास्त चिंब मी भिजतो
आभाळ मोकळे होता मी क्षितिजापाशी थिजतो

गुलमोहर: 

तुला कधीच जाणवलं नसेल ना..?

Submitted by रसप on 5 July, 2012 - 03:00

तुला कधीच जाणवलं नसेल ना
तुझं 'कविता' असणं..?
कसं जाणवणार!
शब्दाला स्वत:चं यमक कळत नसतं ,
मग कवितेला तिच्या असण्याचं गमक कसं कळणार?
म्हणून हा माझा वेडा अट्टाहास असतो..
तुझ्याशी कविता बनूनच बोलायचा
कधी तू 'वाह' म्हणतेस
कधी तू 'आह' म्हणतेस..
पण तल्लीन होऊन जेव्हा डोळे मिटतेस ना...
तेव्हा माझ्या कवितेचा परीघ बनतेस..

मी मोठा आव आणतो..
छंदमुक्त असल्याचा..
पण परिघाबाहेर पडून भरारी भरण्याचं
आजपर्यंत तरी जमलंच नाही!
तूच माझी कविता आहेस..
तुला वगळून कधी लिहिलंच नाही!

गुलमोहर: 

हवेच आता जळभरले ढग

Submitted by पुरंदरे शशांक on 5 July, 2012 - 02:11

खुपत रहाते डोळ्यांना ही
आषाढातिल नितळ निळाई
जादूभरले रंग असुनही
इंद्रधनूही टोचत राही

नको वाटते तिरिप उन्हाची
नावहि आता नको रवीचे
हवेच आता जळभरले ढग
गदगदलेले करडे गहिरे

नसो जरी तो गडगडणारा
बरसणारा मेघ येऊ दे
नित झरणा-या झारीमधुनी
थेंब सुखाचे जरा वर्षु दे

जुनेर अंगी लपेटलेली
तृषार्त झाली अवघी अवनी
लाज राख रे तू गिरिधारी
धरेस सजवी हिरव्या वसनी...

गुलमोहर: 

पुन्हा पाउस.

Submitted by suneha on 5 July, 2012 - 01:32

पावसाच्या सरी झिरमिर झिरमिर
ढगांची लगबग भरभर सैरभैर
विजेची अदा कमनीय सुंदर
वाऱ्याचा दंगा गरगर सरसर.

मनाची लपाछपी, पापण्यांची भिरभिर
मायेचा ओलावा, बटांची भुरभूर
पाऊस माझा, पावसाची मी,
अंगावर तुषार, काळजाची हुरहूर.

सुस्नात धरती, हिरवळीची सळसळ
बिलोरी पिंपळपानांची लोभस चमचम
प्राजक्ताचा सडा झुरमुर झुरमुर
ओल्याशार जमिनीच्या गंधाची दरवळ.

ओथंबलेली पाने, थेंबांची टपटप
भिजलेले पंख, गुपचूप चिडीचुप.
भारावलेला आसमंत, पावलं झपझप
दूर एकांड्या माडाच्या उरात धकधक.

गुलमोहर: 

एक अनुवाद

Submitted by भारती.. on 4 July, 2012 - 09:35

जावेदजी-हिल स्टेशन-
घुल रहा है सारा मंजर शाम धुंधली हो गयी
चांदनी की चादर ओढे हर पहाडी सो गयी

वादियोंमे पेड हैं अब नीलगूं परछाइयां
उठ रहा है कोहरा जैसे चांदनीका हो धुआं

चांद पिघला तो चटाने भी मुलायम हो गयी
रात की सांसे जो मेहकी और मद्धम हो गयी

नर्म हैं जितनी हवा उतनी फिजा खामोश हैं
टेहनीयोंपर ओस पीके हर कली बेहोश है

मोड पर करवट लिये अब उंघते हैं रास्ते
दूर कोई गा रहा है जाने किसके वास्ते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता