बसsssss जगायचं.......!!!

Submitted by मराठी टायगर on 29 June, 2012 - 02:17

बसsssss जगायचं.......!!!
ओजंळ भर पीठासाठी तो
खेळ डोंबाऱ्याचा रंगला होता
भुकेल्या त्या पिल्ला साठी
आईचा तो पराकाष्ट होता...!!!

आजही मीठ भाकरीचे पैसे
पदर पसरूनही नाही सुटले
झोपडीच्या वेशीवरचे पोर
मग पुन्हा पाणीच पिऊन झोपले...!!!

उद्याचे काही माहित नाही हा
तर जीव घेणा खेळ आयुष्याचा
कितीही दुखः सहन केले तरी
प्रयत्न हा झीद्दीने जगण्याचा...!!!

उपासमार , भुकमारीने पोर ते
असेच कुपोषित जगत आहे
भ्रष्टाचार कितीही वाढून देखील
माझा भारत तर महानच आहे...!!!

गुलमोहर: 

उद्याचे काही माहित नाही हा
तर जीव घेणा खेळ आयुष्याचा
कितीही दुखः सहन केले तरी
प्रयत्न हा जिद्दीने जगण्याचा...!!!

खूप छान !

श्री, योगराज, आपली कविता खुपच आवडली. पण मला वैयक्तीकपणे काही उणीवा वटतात म्हणुन खाली
काही टीपा देतोय. कृ.गै.न.

* कवितेतील पहील्या तिन कडव्यांचा आशय आणि विषय मनाला भिडणारा आहे. तोच शेवटी अधिक उग्रतेन
यायला हवा होता.

* उद्याचे काही माहित नाही हा
तर जीव घेणा खेळ आयुष्याचा ........... इथे 'हा' हे अक्षर खालील ओळीत हवे होते. व 'हा' च्या ठीकाणी 'पण'
टाकले तरी चालेल.

लिहीत रहा .....पुलेशु.