अनुवाद-२

Submitted by भारती.. on 6 July, 2012 - 05:57

अनुवाद -चार कडवी..

तपकिरी डोळ्यांची एक मुलगी
चिडते एक गोष्टीमुळे
का नाही भेटलास आधीच
रोज वाद आमचा चिघळे

लाख आमची प्रीतिकूजने
एक युद्ध नित्याचे आहे
एक तिचा खुपतो मित्र मला
तिला माझी ती सखी न साहे..

जवळ येऊनही दूर आम्ही का
आहे उलगडले हे गूढ मला
कुणास तरी ती अजून आठवे
..विसरू न शकलो मीही तुला

मीही होतो तिखटच तेव्हा
तीही होती खूप चलाख
पूर्वी दोघे खेळत होतो
पण आता आहे प्रेम अमाप!

जावेद अख्तरजी- चार कतएं

कत्थई आंखोवाली एक लडकी
एकही बात पर बिगडती हैं
तुम मुझे क्यों नही मिले पहले
रोज ये कहके मुझसे लडती हैं

लाख हो हममें प्यारकी बाते
ये लडाई हमेशा चलती हैं
उसके इक दोस्तसे मैं जलता हूं
मेरी इक दोस्तसे वो जलती हैं

पास आकर भी फासले क्यों हैं
राज क्या हैं समझमें ये आया
उसको भी याद हैं कोई अबतक
मैं भी तुमको भुला न पाया

हम भी काफी तेज थे पहले
वो भी थी अय्यार बहुत
पहले दोनो खेल रहे थे
लेकिन अब हैं प्यार बहुत..

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे ठीक आहे पण माफ करा, जास्त अपील नाही झाले.....
मला वाटतं कधी कधी भावानुवाद ही वापरुन बघायला पाहिजे......

आभार,शशांकजी,वैभव,किरण..u guys r right..मी अर्थानुवाद केलाय एका मुळातच सोप्या चटपटीत रचनेचा.पण अनुवादकाराच्या याच भूमिकेच्या आत राहणे मला इष्ट वाटते.भावानुवाद ही एक समांतरपणे स्वतंत्र निर्मितीच असते,जावेदजींचा मी केवळ अर्थानुवाद केला आहे,तीच भूमिका व मर्यादा स्वीकारून.