एक अनुवाद

Submitted by भारती.. on 4 July, 2012 - 09:35

जावेदजी-हिल स्टेशन-
घुल रहा है सारा मंजर शाम धुंधली हो गयी
चांदनी की चादर ओढे हर पहाडी सो गयी

वादियोंमे पेड हैं अब नीलगूं परछाइयां
उठ रहा है कोहरा जैसे चांदनीका हो धुआं

चांद पिघला तो चटाने भी मुलायम हो गयी
रात की सांसे जो मेहकी और मद्धम हो गयी

नर्म हैं जितनी हवा उतनी फिजा खामोश हैं
टेहनीयोंपर ओस पीके हर कली बेहोश है

मोड पर करवट लिये अब उंघते हैं रास्ते
दूर कोई गा रहा है जाने किसके वास्ते

ये सुकूंमें खोई वादी नूरकी जागीर हैं
दूधिया पर्देके पीछे सुरमई तस्वीर हैं

धुल गयी हैं रुह लेकिन दिलको ये एहसास हैं
ये सुकूं बस चंद लमहोंकोही मेरे पास हैं

फासलोंकी गर्दमे ये सादगी खो जायेगी
शहर जाकर जिन्दगी फिर शहरकी हो जायेगी.. .

------------------------------------------------------------

माझा पद्यानुवाद

दृश्य झाकोळे सगळे सांज अंधुक झालेली
पांघरुन चांदण्याला *गिरिमाळ झोपलेली

घाटीमधल्या झाडांच्या निळसर बाह्यरेषा
धुके उठे दरीतून चांदण्याचा धूर जसा

चंद्र वितळला आणि मृदू खडकही झाले
श्वास रात्रीचे गंधित आता भरामध्ये आले

मंद वाहती झुळुका वातावरणात शांती
दंव डहाळ्यांवरचे कळ्या पिऊन गुंगती

कूस बदलून रस्ते वळणावर पेंगती
दूर कोण गीत गाते कुणासाठी ना माहिती

घाट शांत सुखमय ठेव तेजाची निर्भर
दुधी पडद्याच्या मागे चित्र एक निळसर

चित्त निर्मळ झालेले हृदयाला ठावे पण
सुख मला लाभले हे आहे फक्त काही क्षण

प्रवासाच्या मैलांमध्ये साधेपण हरपेल
परतून जगणे हे पुनः शहरी होईल..

भारती बिर्जे डिग्गीकर
*आभार,वैभव,शशांकजी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त झाला आहे अनुवाद
अष्टाक्षरीची लय निवडलीत......... .इथेच १००% मार्क्स

फक्त 'पर्वतराजी झोपलेली' या ओळीत एक अक्षर कमी करायला हवे आहे
घाटी शब्द हिन्दीचा फील देतो त्या ऐवजी सरळ मराठीतला घाट हा शब्द वापरा.....रास्ते ऐवजी रस्ते करा . बस बाकी परफेक्ट आहे.

खूप खूप आवडला हा अनुवाद

मी पहिला प्रतिसाद दिला तेन्व्हा ही रचना आपण आधी प्रस्तुत केलीत तशी दिसत होती
आता पहिला प्रतिसाद सम्पादित केला आहे

धन्यवाद शाम,शशांकजी,येस्,गिरिरांग मुळे मात्रादोष दूर होतो,मनातल्या अर्थसमन्वयासाठी हा शब्द 'गिरिमाळ' असा बदल करून स्वीकारत आहे. खूप आभार.