कविता

टिक्कू - जिथे अंधारते परिपक्वतेने तिथे बाल्यामुळे होते दिवाळी

Submitted by बेफ़िकीर on 9 July, 2012 - 04:46

Tikkoo Sleeping.jpg

बिलगणे फार आवडले तुझे ते
घरी आलीस उत्साहात माझ्या
किती मस्ती किती दंगा तुझा तो
किती आनंद या नशिबात माझ्या

तुला खाऊ दिला जो जो हवा तो
तुझे ते सांडणे अन हात ओले
तुला मी तोंड धू अन पुस म्हणालो
तुझे ते बोबड्या शब्दात "होले"

तुला बसवून या पोटावरी मी
कराव्या गुदगुल्या अन तू हसावे
मला तू गुदगुल्या करताक्षणी मी
हसू यावे न यावे पण हसावे

तुझा माझा किती आवाज होतो
घरातिल लोक म्हणती बास आता
तसा खोटाच मी नाराज होतो
नि तू म्हणतेस काका हास आता

तुला घरभर फिरवणे अन हसवणे

गुलमोहर: 

बाप्पा मोरया

Submitted by मोहन वैद्य on 8 July, 2012 - 07:38

एकदंत तू मूलाधार तू
महाकाय लंबोदर देवा

सुखकर्ता तू दुखहर्ता तू
रिध्दिसिध्दीनायक तू देवा

अकारही तू, उकारही तू
मकारही तूच एक देवा

विजोड भासले मूषकवाहन
अजोड तरी नॄत्यलाघव देवा

मोदक अर्पून दुर्वांकुर वाहून
तोषवितो तुज मी देवा

कॄपा असावी म्हणून वंदितो
वरद विनायक तुज देवा

गुलमोहर: 

वर्षासूक्त १

Submitted by मोहन वैद्य on 8 July, 2012 - 07:37

आकाशातील झारीमधुनी
जल बरसे झरझर फिरुनी

लपंडाव अंधार उजेडाचा
सूर्यकिरण अन नभपटलांचा

मंद समीराच्या झूल्यावरती
हिरवे पर्णपाचू मोदे डुलती

रवितेजा पैजू पाहे लखलखती चंचला
साहे ना तेज त्यापरी बघु इंद्रधनुला

ओलेतीचे सौंदर्य बघुनी वसुंधरेचे
तृप्त मनी साफल्य झाले द्रूष्टीचे

गुलमोहर: 

बनूनी तुझा मी हरी सावळा

Submitted by रसप on 8 July, 2012 - 02:21

तुझ्या चाहुली जाणवाव्या कितीदा
मनाला फुटावी नवी पालवी
किती तारकांनी नभाशी सजावे
तुझा चंद्र स्वप्नामधे मालवी

कळे ना मला मी कुठे लुप्त होतो
निवारा तुझ्या सावलीचा मला
जणू सांजवेळी कुणी सप्तरंगी
मुखावर पदर रेशमी ओढला

विचारांस माझ्या नसे आज थारा
पतंगाप्रमाणे इथे वा तिथे
हवेच्या दिशेशी जुळे खास नाते
तुझा गंध मोहून नेतो जिथे

पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन् आपला वाटतो

कशी रोज माझी सरे रात्र येथे
तुला आकळावे कसे? दूर तू
मनाच्या सतारीतुनी छेडलेला
सुन्या जोगियाचा सुना सूर तू

सरी पावसाच्या सवे आणती हा

गुलमोहर: 

मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही....!

Submitted by रसप on 7 July, 2012 - 04:40

जा दूर कितीही तू पण, असशील तरीही जवळी
ना सूर्य कधीही विझतो, किरणांस जरी तो उधळी
मी असाच तळपत होतो, पण तुलाच दिसले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

भिरभिरता नीलाकाशी मी एकलकोंडा मेघ
वा तांबुस क्षितिजावरची मी क्षणात पुसली रेघ
गहिवरलेल्या धरणीला मी कधी भिजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

पानांना झाडुन साऱ्या गुलमोहर मी मोहरलो
झेलून झळा दु:खाच्या मी मनासारखा फुललो
मी चाफा बनून माझ्या गंधास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही

तू हसताना मी माझ्या डोळ्यांचा सागर प्यालो
तू चिंब चिंब भिजताना मी मनात माझ्या न्हालो

गुलमोहर: 

एक देह

Submitted by निलेश बामणे on 7 July, 2012 - 01:22

एक देह

आज जाळला एक देह आठवणीतला
त्याच्यासह घालविलेल्या प्रेमळ क्षणासह

घेऊन काहीही न जाता देऊन बरच गेला
हृदयातील आणखी एका पोकळीसह

त्याचा हळवा प्रेमळ स्वभाव आठवणीतला
जळला आज त्याच्या निर्मळ चेहऱ्यासह

माझ मन अचानक अशांत करून गेला
विचारून प्रश्न अनेक जीवनातील क्षणभंगुरतेसह

तो या जगातून गेल्याचा निरोप मिळाला
भरून आले मन डोळ्यातील अश्रूंसह

कवी - निलेश बामणे

गुलमोहर: 

तुझ्याविना

Submitted by रमा-रातराणी on 6 July, 2012 - 09:46

ल्यायली नयनात जी, फक्त काळी रात्र होती,
आंधळी अन घुसमटती, सय तुझी रे मात्र होती,
मज पिसारे का मिळाले, कापलेले मोर जेव्हा,
माझिया उरात तेव्हा, एकटी लांडोर होती.

गुलमोहर: 

प्रीतीचा छंद

Submitted by रमा-रातराणी on 6 July, 2012 - 09:44

प्रीतीचा छंद वेडा लागला या जीवा

अनुरागी रात्रीला मोहला चांदवा..

थबकुनी जावे श्वासांनी आता

रुपेरी स्वप्ने मनी साठवता

आभाळाचे गाणे गाता, सांग ना,

देशील का मिठीचा झुलवा, या जीवा..

शांतता ही बोलू लागावी

रात्र ओली भारून जावी

नजरेची ही भाषा कळावी, होय ना,

डोळ्यांया डोहीयात फुलवा, या जीवा..

गुलमोहर: 

चक्र

Submitted by रमा-रातराणी on 6 July, 2012 - 09:41

नियतीच्या या खेळामध्ये बेभरवशी हरेक साथी,

आंधळा हा हिशोब सगळा,मांडिलेला जगाच्या माथी..

पुन्हा फिरुनी जन्मा येती, जुनीच गाणी नवीन ओठी,

सैलावतसे जुनेच बंधन बांधण्या मग नवीन गाठी..

गुलमोहर: 

वनवास

Submitted by रमा-रातराणी on 6 July, 2012 - 09:37

पाणावले आज डोळे,संथ श्वास गुदमरे..

कशासाठी कासावीस कुणासाठी मन झुरे..

मना नाही थांग आज,वेडे उगी जगी फ़िरे..

स्वतःच्याच घरी आज वनवासी जीव उरे.....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता