Submitted by अवल on 1 May, 2011 - 11:26
ते स्वप्न म्हणू की
सत्यची घडले सारे ?
तीज कविता म्हणू की
होते त्याचे भाव खरे ?
किणकिणल्या सार्या
त्या होत्या का तारा ?
की हृदयची माझे
झंकारियले होते ?
हळुहळुच येउनी
शीळ घालूनी गेला तो वारा
कि निश्वासच त्याचा
मज कुरवाळुनि गेला ?
क्षण कुणी असा हा
गंधीत करुनि गेला ?
हा धुंद मारवा
कि या पाऊसधारा ?
कि तोच तो हा
मज आजवरी जो
खेळ अनोळखी
प्रितीचा हा सारा ?
गुलमोहर:
शेअर करा
वा!! भावना मस्त आहेत... लिहीत
वा!!
भावना मस्त आहेत...
लिहीत रहा...
(लयीत अजून थोडी सफाई अपेक्षित आहे.. पण ते होईल हळूहळू... भावना महत्वाच्या
)
धन्स चैतन्य ! अरे ही खुप जुनी
धन्स चैतन्य !
काल अचानक इथे टाकावी वाटली.
अरे ही खुप जुनी कविता साधारण १९८५ ची
हळूवार आणि लयबद्ध..!
हळूवार आणि लयबद्ध..!
की हृदयची माझे असं हवंय
की हृदयची माझे असं हवंय ना?
hRudayachI असं टायपावं लागेल..
शुभेच्छा!
हृ / र्हु हा एकच शब्द जो
हृ / र्हु हा एकच शब्द जो मायबोलीवर नीट/ मनासारखा लिहिता येत नाही.
धन्स आनंदयात्री, बदल केलाय....
कि निश्वासच त्याचा मज
कि निश्वासच त्याचा
मज कुरवाळुनि गेला ?<<< अनोखी कल्पना