मी वाट बघतोय

Submitted by सुमित खाडिलकर on 1 May, 2011 - 23:51

चंद्र वरी आला, सूर्याचा अलविदा झाला
वाहे शांत वारा, क्रम रोजचाच झाला
तुझं मात्र हल्ली गणित चुकलंय
मी वाट बघतोय

ठिकाणालाही अता हे कळलंय
तेही बुचकळ्यात पडलंय
ते गवत बसलंय रुसून
तिथे नाहीत तुझी पावलं सजून
त्या दगडाची झालीये चुळबुळ सुरु
त्यावर कुणी टेकलं नाही अजून
वाऱ्यालाही त्या लागलेत वेध
खेळायला मिळाले नाहीत अजून तुझे केस
पिवळी फुलं आलीयेत खुलून
त्यांच्याकडे लक्ष जातंय म्हणून

ही वाटही अता लाजतीये भारी
त्यावर नाही आली अजून तुझी स्वारी
म्हणे माझ्या कडे पाहशील किती
भाव अता असा मला देशील किती
आली ती कि हा माझा राहणार नाही थाट
दाखवशील बघ तेंव्हा मलाच वाट

नाही नाही तू असं बोलूनकोस आज
माझ्या सारख्यांना असते अखेर तुझीचतर साथ

गुलमोहर: 

छान ..... निसर्गातल्या अचेतन घटकांना चेतनेने फुलवायचा चांगला प्रयत्न…… (चेतनागुणोक्ती)
“वाऱ्यालाही त्या लागलेत वेध
खेळायला मिळाले नाहीत अजून तुझे केस”
हे अधिक आवडलं.