अ‍ॅप्रेझल / अप्राईझल

Submitted by Sanjeev.B on 28 May, 2012 - 05:32

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
एप्रिल / मे महिना उजाडलं कि सर्वच नोकरदार वर्गाला वेध लागतात एका गोष्टीचे ते म्हणजे अॅप्रेझल.

जेव्हा मी नवीन नवीन नोकरी ला लगलो होतो, तेव्हा मला असे वाटले होते कि वर्षारंभी अॅप्रिल महिन्यात होणारे पगार म्हणुन अॅप्रेझल म्हणत असावे.

नंतर जस जसे मॅनेजमेंट पॉलिटिक्स कळायला लागले तेव्हा पक्के समजुत झाले कि अप्रेझल म्हणजे मॅनेजमेंट सर्वांच्या नावाची चिठोरे बनवुन वर (अप) फेकत असतील आणि ज्यांचे चिठोरे टेबलाच्या अप (वरती) असतील त्यांना अप्रेझल मिळत असावे आणि टेबलाच्या डाऊन वे चिठोरे असतील त्यांना डाऊन जाण्याचे मार्ग म्हणजेच पहिल्या मजल्या वरुन खाली जाण्याचे मार्ग अणि तेथुन सरळ गेट च्या बाहेर चे मार्ग.

आणखी एक पक्की समजुत झाली, ते म्हणजे जसे क्रिकेट चे मॅचेस फिक्स असतात, मॅच खेळणे हे एक दिखावा असतं, तसेच पगारवाढ सुध्दा मॅनेजमेंट ने फिक्स केलं असतं, अप्रेझल चे मॅच हे फक्त दिखावा असतं.

जेव्हा रिव्ह्यु मिटिंग चे बोलावणे येते तेव्हा मनात अश्या काही भावना उचंबळुन आलेले असतात कि असं वाटतं यमुना जळी खेळु खेळ कन्हैया का लाजता आणि मिटिंग मध्ये बसल्या क्षणी आपल्या मनात हे गाणं रुंजी घालायला लागतं, सांग कधी कळणार तुला "भाव" (आकडा) माझ्या मनातला.

रिव्ह्यु मिटिंग सुरु होताच पुर्ण चित्रच पालटतं, आपल्या मना सारखे काहीच घडत नाही, बॉस, अस्मादिक कसे दिवस भर मायबोली वर उनाडक्या करत फिरत होते ह्याचे तपशिलवार, तारिख, दिवस वेळेसकट माझ्या श्रीमुखात भिरकावतो, त्याक्षणी असे वाटु लागते वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, करील जो हरण संकाटाचे.

पण, मी पण पुर्ण तयारीनीशी गेलेला असतो, मागच्या वर्षातले सगळे अचिवमेंट्स मी पण टिपुन ठेवलेलो होतो, ते मी त्यांच्या समोर ठेवतो. मग बर्‍याच बोलाचाली नंतर मॅनेजमेंट ने जे फिक्स केलेले असते ते त्यांच्या मनातले भाव आपल्याला कळतं आणि मग मनाची अशी अवस्था होते, दु:खी मन मरे, सुन मेरा कहना, यहा नही रहना, यहा नही रहना........

Proud

- संजीव बुलबुले / २८.०५.२०१२

गुलमोहर: 

पूर्वी अप्रेजल च्या आधी बॉसच्या घरी भाजी आणून देणे, मुलाला क्रिकेट बॅट देणे असे करत. आता सरळ त्याच्या हातावर पाच दहा हजार (किंवा जो काय आजकालचा भाव असेल तेव्हढे) टिकवा! देईल तो हवी तेव्हढी पगारवाढ, त्याच्या बापाचे काय जाते?

सरकारी नोकर दिसता? >>>> नाही......... आहे खाजगीच नोकरी.......पण स्वतःच महत्वच इतके वाढवुन ठेवले आहे की.... आरामात फाट्यावर मारता येते.. Happy

>>> रिव्ह्यु मिटिंग सुरु होताच पुर्ण चित्रच पालटतं <<<< नशिबवान आहात, निदान रिव्ह्यू मिटिन्गातरी होतात,
आमच्यात गेल्या दहा वर्षात माझी अशी काही मिटीन्ग बॉस बरोबर झाली नाहीये.
तो जे काय दोनचार टक्क्यान्चे तर कधी "NIL" तुकडे फेकतो ते आकडे त्याचे त्याला समजायची अन त्याचे माझ्यावरचे दूरगामी दु:ष्परिणाम जाणवण्यायेवढी अक्कल त्याचेपाशी नक्कीच आहे ही खात्रि असल्यामुळे त्याच्यापुढे जाऊन येवढेच का दिले अन तेवढे का नाही असले युक्तिवाद कम लाचारीयुक्त भीक मागणे मूलतः स्वभावात नसल्यामुळे त्या बाबीला मी देखिल गेल्या दहा वर्षात "फाट्यावरच" मारले. असो.
आमच्या इकडे देखिल नेमेची येतो पावसाळा, अन मग रस्त्यान्ना, रस्त्यातील गटारान्ना नेमेची पूर येतो, तसेच या अ‍ॅप्रेझलचे अस्ते. बॉस वर्षभरातील त्याची साठलेली सगळी भडास त्या आकड्यान्द्वारे व्यक्त करतो, आता त्याचे तेवढे स्वातन्त्र्य तरी मानलेच पाहिजे, नै का? Proud

Proud

एक पोल्ट्री फार्म असतो त्याचा मालक बदलतो. नवा मालक आल्याआल्या सगळ्या कोंबड्यांना वॉर्नींग देतो " प्रत्येक कोंबडीने दर आठवड्याला किमान दहा अंडी दिलीच पाहीजेत. नाहीतर...."
एक आठवड्या नंतर तो प्रत्येक कोंबडी ची अंडी मोजत फिरत असतो. " अकरा.. छान!! दहा ..ओके , नउ...प्रयत्न चांगला होता; पुढचेवेळी दहा पाहीजेत. बारा,.... फारच छान!! चार.... खाटका कडे पाठव रे,
.
.
.
.
.
हे काय?.... फक्त एक? लाज वाटत नाही? तुझ्या खाण्याची किंमत ही यापेक्षा जास्त आहे....
.
.
.
"त्याच काय आहे साहेब, अप्रेझल टाईम आहे म्हणून हे एक तरी आहे. अदरवाईज तसातर मी एक कोंबडा आहे !!"

अप्प्रेसल टाईम असल्यामुळे सध्या आमच्या इथे हे इमेल हिट आहे
petrol.JPG

आबासाहेब , तुमच्या पोस्ट चा दुसरा व्हर्जन
Bhaad mey jaye Tu aur tera appresal ... jaa nai chaiye… clip_image001.jpg

धन्यवाद गिरी, उदय, इब्लिस, झक्की काका, वेका, श्री, रिया, लिंबुकाका, आबासाहेब, मंदार, योगुली, मुक्तेश्वर, श्रीकांत, सामी आणि प्रणु.

त्याचे माझ्यावरचे दूरगामी दु:ष्परिणाम <<< Rofl सहीच, लिंबु काका एक वेगळा विनोदी लेख होऊ शकतो ह्यावर.

अन मग रस्त्यान्ना, रस्त्यातील गटारान्ना नेमेची पूर येतो, तसेच या अ‍ॅप्रेझलचे अस्ते. <<< Lol अगदी अगदी.

रस्त्यातील गटारान्ना नेमेची पूर येतो<<< हे छान वाक्य सुचवलात, आता कुणी डिसर्विंग नाहीये आणि त्यांना चांगले इंक्रिमेंट मिळतं त्यांना टाँट मारण्यासाठी मस्तच आहे हे वाक्य.

बॉस वर्षभरातील त्याची साठलेली सगळी भडास त्या आकड्यान्द्वारे व्यक्त करतो, आता त्याचे तेवढे स्वातन्त्र्य तरी मानलेच पाहिजे, नै का? <<< कित्तीही काहीही करा, बॉस कधीच खुश होत नाही.

Management Pot Pourri.jpg

कित्तीही काहीही करा, बॉस कधीच खुश होत नाही.
हा खुप येकांगी विचार आहे....
आपण जरा मॅनेजर (बॉस)यांच्या बाजुनी विचार करुयात का?
मॅनेजरच काम काय असत? त्याच्या टीमकडुन काम करुन घेणे.
जर मी , माझ्या टिममधल्या माणसांनी काम नीट केल नाही अस त्याच्या performance evaluation report मधे टाकल तर directly मॅनेजरनी त्याच काम नीट केल नाही असाच त्याचापण report बनतो.
यात राजकारण असत मान्य पण सध्याच्या परीस्थितीत लोक येव्हडे जॉब बदलत असतात की मॅनेजरला पण कोणावर विसंबुन राहता येत नाही.
मॅनेजरसारखी विचित्र परीस्थिती कंपनीत दुसर्याकोणाचीच नसते.
मॅनेजमेंट सतत माघे लागलेले असते कामासाठी आणि टीममधले १००% वेळेस हक्कासाठी खुप जागरुक असतात पण कर्तव्याबाबत १००% निष्काळजी / अन्भिद्न / जबाबदारी टाळणे करत असतात.

जरा आपल्या मॅनेजरलापण समजुन घेण्याचा प्रयत्न करुन बघा.

सुशांत, कित्तीही काहीही करा, बॉस कधीच खुश होत नाही माझ्या ह्या वाक्या व माझ्या लेखा मध्ये बॉस = मालक असे अभिप्रेत आहे. ९०-९५ % मालक जे असतात ते तुमच्या कामाशी कधीच संतुष्ट नसतात, उरलेले ५-१०% are exceptions.

माझ्या टिममधल्या माणसांनी काम नीट केल नाही अस त्याच्या performance evaluation report मधे टाकल तर directly मॅनेजरनी त्याच काम नीट केल नाही असाच त्याचापण report बनतो.
यात राजकारण असत मान्य पण सध्याच्या परीस्थितीत लोक येव्हडे जॉब बदलत असतात की मॅनेजरला पण कोणावर विसंबुन राहता येत नाही.
मॅनेजरसारखी विचित्र परीस्थिती कंपनीत दुसर्याकोणाचीच नसते.
मॅनेजमेंट सतत माघे लागलेले असते कामासाठी आणि टीममधले १००% वेळेस हक्कासाठी खुप जागरुक असतात पण कर्तव्याबाबत १००% निष्काळजी / अन्भिद्न / जबाबदारी टाळणे करत असतात.<<< मला ही यातुन जावं लागतं, फारच अवधड परिस्थिती होते आपली, कारण सब ऑर्डिनेट चे performance evaluation जर आपण नेगेटीव्ह करतो तर ते आपल्यावरच उलटतं अणि मॅनेजमेंट आपल्या सबऑर्डिनेट च्या अकार्यक्षमतेला आपल्यालाच जबाबदार धरते.

तु हा लेख बॉस = मालक ह्या अनुषंगाने वाचुन बध, कदाचित पटेल, नाही पटल्यास सोडुन दे ना यार.

मॅनेजरसारखी विचित्र परीस्थिती कंपनीत दुसर्याकोणाचीच नसते. <<< अनुमोदन.

मी काय अनुमोदनबिदन देणार नाय! Proud

>>>>>मॅनेजरच काम काय असत? त्याच्या टीमकडुन काम करुन घेणे. <<<< अनुभव असा कि बहुसन्ख्य म्यानेजर्स केवळ "मुकादम" म्हणुन काम करु पहातात. त्यान्ना स्वतःला कामातील कितीक काय येतय, वेळेस ते स्वतः किती खम्बिरपणे उभे रहातात कामास हे सर्व गुलदस्त्यातच रहाते. केवळ कामाची ऑर्डर सोडणे व कम्पिशन रिपोर्ट मागायला म्यानेजर्स हवेतच कशाला म्हणतो मी! स्वारगेट बुद्रुक यष्टी स्टॅण्डवरील म्यानेजर देखिल यापेक्षा जास्त गाड्या सोडतो/रिसिव करतो, तरी बिचारा या खाजगी म्यानेजर्सच्या तुलनेत एक चतुर्थान्श देखिल पगार घेत नाही!

>>> जर मी , माझ्या टिममधल्या माणसांनी काम नीट केल नाही अस त्याच्या performance evaluation report मधे टाकल तर directly मॅनेजरनी त्याच काम नीट केल नाही असाच त्याचापण report बनतो. <<<< सत्ययुगातील गोष्ट सान्गताय का? Wink

>>> यात राजकारण असत मान्य पण सध्याच्या परीस्थितीत लोक येव्हडे जॉब बदलत असतात की मॅनेजरला पण कोणावर विसंबुन राहता येत नाही. <<<< का? आयुष्यभराकरता एकच एक बायको करुन मोजकीच पोरे काढून त्यान्चेवर आयुष्यभराकरता विसम्बता येते, तर आयुष्यातीलच एक तृतियान्श पेक्षा जास्त वेळ ज्या सबऑर्डीनेटबरोबर काढला जातो त्यान्चे वर "विसम्बता" येत नाही हे कशाचे लक्षण? (काये, की बायकोपोरान्ना उठसुठ सहजासहजी डायव्होर्स वगैरे देता येत नाही, तिथे त्यान्चे खच्चीकरण करण्याची डाळ शिजत नाही, पण हापिसात तसे नस्ते उलट घरातील भडास हापिसातल्या सबऑर्डीनेटवर काढणे हा हक्कच असल्याप्रमाणे बहुसन्ख्य ठिकाणी वागले जाते)

>>>> मॅनेजरसारखी विचित्र परीस्थिती कंपनीत दुसर्याकोणाचीच नसते. <<< भरगच्च पगार, गाड्या-भत्ते घेताना बरे वाटते ना? मग विचित्र परिस्थिती काहून, अन ती कोण ओढवुन घेते? अर्थात, अशी परिस्थिती नस्तेच, कारण उन्दराला मान्जर साक्शी या न्यायाचे बॉसेसची टीम एकमेकाला साम्भाळूनच घेत अस्तात.

>>>> मॅनेजमेंट सतत माघे लागलेले असते कामासाठी आणि टीममधले १००% वेळेस हक्कासाठी खुप जागरुक असतात पण कर्तव्याबाबत १००% निष्काळजी / अन्भिद्न / जबाबदारी टाळणे करत असतात. <<<< फारच धाडसी विधान आहे हे! अहो मी जन्मजातरित्या कम्युनिझमच्या विरोधी असूनही असे मालकधार्जिणे अचाट विधान करू धजत नाही/इच्चित नाही.
असो. तुमचे मत तुमच्यापाशी, माझे माझ्यापाशी.
फक्त इतकेच सान्गतो, वीसबावीस वर्षान्पूर्वी निवडलेले/नेमलेले माझे सबऑर्डीनेट्स, आजही विविध ठिकाणी माझी आठवण ठेवतात, ते मी "त्यान्चा तेव्हान्चा खडूस बॉस होतो म्हणून नव्हे तर त्यान्चा एक सर्व बर्‍यावाईट प्रसन्गात साथ देणारा, शिकविणारा उच्चाधिकारी सहकारी होतो" म्हणून. (हे इतक्याकरताच सान्गितले की मी अनुभव अन अनुभूती शिवाय एक अक्षरही बोलत/लिहीत नाही हे माहिती व्हावे म्हणून)

Pages