मुलगी पहायला गेलेला कवी.

Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 10:43

एका श्रीमंत घरी एक कवी मुलगी पहाण्यासाठी येतो. सोबत त्याचे बाबा आणि ताई असते.
तिघेही अलिशान घरातील कोचावर जाऊन बसतात. औपचारीक पाहुंचारा नंतर मुलीला बोलवलं जातं. ताईला तर वहीनी पहाण्याची केंव्हापासून घाई झाली होती. मुलगी येते, पदर सवरत अगदी न लाजता समोर येऊन बसते. आणि तिचा हाच बाणेदारपणा कवीच्या बोलघेवड्या ताईला खुप आवडतॊ. मुलीकडे पहात न राहून पहील्यांदा तिच बोलायला सुरुवात करते. आणि सुरुवात करते ती ही अशी की यापुर्वी खुप दिवसाची ओळख असल्याप्रमाने,

ताई : अं.... तुम्हाला कविता आवडतात? नाही म्हणजे आमचा दादा देखिल कवी
आहे म्हणुन म्हटलं.
(ताईच्या या बोलण्याने मुलीच्या चेहयावर चांदणं आणि तिच्या पित्याच्या
चर्येवर काळे ढग पसरले)

मुलगी : आय्या खरंच?

ताई : ( हसून) हो,

मुलगी: मलाही खुप आवडतं कविता करायला.
ताई : ( आनंद आश्चर्याने) काय खरंच ?

(एव्हांना कविराज ही आतुन आनंदीतच झालेले असतात. ते हळूच आपल्या
ताईच्या कानात मुलीला कविता म्हणन्याची विनवनी करायला सांगतात.)

ताई : (लगेच तयारीने) हो..हो.. वहिनी म्हणाना एक कविता,.. छानसी

( मुलगी किंचित लाजुन आपल्या आई-बाबांकडे पहाते ते तिला नजरेनेच दिलासा देतात.)

मुलगी : (काव्याचा सूर काढत)

भुंगा म्हणतो कळीला प्रेम कर प्रेम कर
कळी म्हणते भुंग्याला दम धर दम धर
पहीले माझे एकच एक काम कर काम कर
सोड माझा पानांचा हिरवा हिरवा पदर

भुंगा म्हणतो कळीला कस्सा सोडू तुझा पदर
शोधू कुठे पुन्हा तुला गेलीस मला सोडुन जर.
प्रेम भारले धडधडते इवले इवले माझे अधर.

कवी : (हळूच आपल्या बहीनीला) ताई कापुस आहे का गं आपल्याकडे?

ताई : (बावचाळून कपाळाला अट्या पाडत) नाही. कशाला रे?
लागतो का?

कवी : (तीची बडबड बंद व्हावी म्हणुन) नही असंच विचारलं आपलं.
(ताई त्याच्याकडे क्षणभर कधीच न पाहील्यासारखी पाहाते.)

तोपर्यंत इकडे दुसरी कविता ऎकू येऊ लगली.....

धुंद हवा सुगंधी, मंद हवा सुगंधी
फ़ुलपखरु एक नाचते मनामंधी
आहे मी अशीच एक साधी-सुधी
पण विषेश आहे एक माज़्यामंधी

काय विशेष काय विशेष सांगणार नाही जा.
एका एका मणसाची केली कशी मजा. ( मान तिरकी-स्मितहास्य)

कवी : ( गडबडीने चर्येवर हसू आणत) ...अ.., छान.... फ़ारच छान.

मुलगी : ( आनंदाने भारावुन).. हो ना..? पुढचं कडवं तर या ही पेक्षा छान आहे. बघा..हं.

(कवीनं कपाळावर हात मारता मारता सावरुन आपण डोक्यावरचे केस मागे सारतॊय असं दर्शवलं.)

तोपर्यंत इकडे काव्य वाचनाला सुरुवात झाली होती...

चांदण्याची झुल मी, कमळाचे फ़ूल मी,
आता तरी ओळखा पाहू कोण मी. ... ( मुलीच तिरकं पाहून स्मितहास्य)

कवि : (मनातल्या मनात) तू माझं कप्पाळ अन मी तुझं.

मुलगी : कोण मी कोण मी सांगणार नाही जा
एका एका माणसाची केली कशी मजा. (उस्फ़ुर्त स्मित)

कवी : ( या पुढे आता हिला बोलु द्यायचे नाही या निश्चयाने) व्वा. व्वा. वाह, छान..खुपच छान. अगदी मन कसं
भारावुन गेलं. नाव काय आपलं?

मुलगी :(लडीकपणे मान वेळावुन) शितल.

कवी : व्वा, नावाप्रमाणेच तुमच्या कविता ही अगदी शितपेय्य
पिल्यासारख्या मधुर वाटतात.( मनात - मदिरा)

........................................................................ .................................. ......... : क्रमांश.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>> हे काय आहे?????? <<<<
माहित नाही, अन हे पण माहित नाही की ऑर्फिअस.. स्वतःच कवि आहे की काय! Proud Wink

(मुलगी हर्षभरीत नजरेने कवीरजांकडे पहात रहाते, कवीराज ती महदप्रयासाने चुकवू पहातात. शेवटी कवीचे बाबा काही औपचारीक प्रश्न विचारतात आणि विचारांती निर्णय कळवला जाईल असे म्हणुन निघतात.)

>>>>> बापरे आता हा शेवटचा कंस जाऊन क्रमशः आलंय..... Uhoh

क्रमश: नाही... क्रमांश - (क्रमा चा अंश) - Trailer असं आहे ते. Happy धन्यवाद. सर्वांचा आभारी आहे. Lol

विनोद कळायला ही बुध्दी असावी लागते म्हणतात. Lol

क्रमशः असल्याने गोंधळ होत आहे ..
काही जणांना कथा वाटत आहे तर ...
काही जणांना कथेतील कविता वाटत आहे
काही जणांन विनोदी देखील वाटत आहे..
तर काही जनांना एलदुगो चा" घना आणि कुहु एक मुलीला पाहण्यासाठी घरी तिला बघायाला गेले" असे वाटत आहे. .................
तर काही जणांना काहीच वाटत नाही आहे...
तर काही जण काही तरी आहे पण काय आहे ते कळण्याचा प्रयत्न करत आहेत........
तर.काही जणांना काहीतरी वाटत आहे पण ते जे काही कळले ते नेमके सिध्द करु शकत नाही आहेत...... Uhoh
.
.
.
कदाचित पुर्ण झाल्यावर प्रकरण कळेल........... बहुतेक .........मुलगी मुलाच्या कवी असण्याची टिंगल करत आहे...आणि तो कविता ऐकवण्याआधीच ती ऐकवुन ......कविता ऐकणे किती त्रासदायक आहे ...हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे.................:हाहा:

घ्या... आता घरचं झालं थोडंन् ह्या व्याह्यानं धाडलं घोडं, आन् झंपी म्हण्ते चंपीला घोडं ह्याचं कुहू-कुहू आरडतं
DesiSmileys.com