भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया

Submitted by चिखलु on 31 May, 2012 - 08:43

या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती. म्हणतात नं, If there is will, there is way. बाईने दावा साधलाच शेवटी. थ्यंक यु रे शाहरुख़ खान.

या निमित्ताने आम्ही (म्हणजे मी ) काही सन्माननीय लोकांच्या मुलाखती घेतल्या.

दिग्गी राजा उर्फ़ दिग्विजय सिंह - हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान आहे.
मोहन भागवत: हे काँग्रेस पक्षाचं षड्यंत्र आहे. पूनम हि मूलतत्ववाद्यांच्या/पाकिस्तानच्या हातातले बाहुले आहे.
हीना रब्बानी खार - यह हिंदुस्तान की साजिश हैं, हम भी इसका मुहतोड़ जवाब देंगे! (आणि नंतर या बाईने वीणा मलिक यांना फोन केल्याचं ऐकिवात आहे)

अरविंद केजरीवाल - हा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाजी उपोषण करणार आहेत.
अण्णा हजारे - डॉक्टरांनी मला उपोषण करू नका असे इंग्लिश मध्ये लिहून दिले आहे.
प्रशांत भूषण - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. ते उपोषण नव्हे तर आमरण उपोषण करणारच. पूनम शिखंडी आहे.
किरण बेदी -प्रशांत भूषण, पूनमला शिखंडी म्हणालेच नाहीत.
अण्णा हजारे - जर पूनमला आमच्यापैकी कोणी शिखंडी म्हणाले असतील तर मी राजीनामा देईल.
अरविंद केजरीवाल - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. अण्णा राजीनामा नव्हे तर आमरण उपोषण करणार आहेत.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.
अण्णा हजारे - मी उपोषण करणार नाही. मात्र ही पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
कपिल सिब्बल - ह्या प्रकाराला पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.
सुषमा स्वराज - कपिल सिब्बल यांनी अण्णाजींची माफी मागावी. मी अण्णाना विनंती करते, त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देईन.
कॉंग्रेस प्रवक्ता - ते कपिल सिब्बलांचे वैयक्तिक मत आहे. अण्णाजीनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी रामलीला मैदानावर आमरण उपोषण करणारच.
अरविंद केजरीवाल - मी अण्णाना विनंती करतो , त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.

रामदेव बाबा - अरेच्च्या, मी जिचे कपडे घालून पळून गेलो तिचे नाव पूनम पांडे आहे तर.
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी थी, मुजसे पूछा, "बाबा मैं famous कैसे बनूँगी? मैंने पुछा "बेटा कपड़े पहनती हो? उसने जवाब दिया "हांजी" मैंने तभी उसे कह दिया "तभी तो कृपा रुकी हुयी हैं"

मनमोहन सिंग - या असैन्विधानिक कृत्याचा मी निषेध करतो. (आणि नंतर म्याडम ला फोन जातो, आज्ञा विचारायला)
सोनिया गांधी - आम्ही या घटनेचा निषेध करतो. (आणि नंतर एक फोन प्रणब मुखार्जीना जातो)
प्रणब मुखर्जी - सरकारच्या प्रगतीवरच लक्ष हटवण्यासाठी हे विरोधकांच कारस्थान आहे.
मोमता ब्यानर्जी - घटक पक्षांना काँग्रेस ने विचारात घेवून कृती करावी अन्यथा आम्हाला निर्णोय घ्यावा लागेल. ही डाव्या पक्षांची चाल आहे. आम्ही पूनमला कोपडे देणार आहोत.
जयललिता: आम्ही तिला मोफत कपडे पुरवणार आहोत.
शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवू.

जया बचपन - मैं किसी पूनम पांडे को नहीं जानती, मैं सिर्फ पूनम धिल्लों को जानती हूँ!
राम गोपाल वर्मा : माझ्या पुढच्या पिक्चर चे नाव आहे "पूनम के शोले"
महेश भट्ट: जिस्म ची खरी हेरोईन मिळाली.
शक्ती कपूर - आऊ!
गब्बर सिंग - कितने कपडे थे!
कमाल आर खान - ती ज्या दिवशी पूर्ण कपडे घालेल, त्या दिवशी मी माझे सगळे कपडे काढणार आहे.
अवधूत गुप्ते - चाबुक तोडलंस sorry काढलस सगळं काढलस (आणि नंतर मिठी नेहमीच्याच सवयीने)
आदेश बांदेकर - पूनम वाहिनीने कपडे काढले म्हणून काय झालं मी तिला एक पैठणी देणार आहे.
ACP (सी आय डी फेम) - पूनम ने कपडे नहीं पहने इसका मतलब समजे दया? इसका मतलब यह हैं की, खुनी एक औरत हैं जो पूनम के कपडे ले भागी हैं!
राखी सावंत: मी एवढ्या वेळेस कपडे काढले तरी मला कोणीच का भाव देत नाही.

इतर पक्षी
मोन्टेक सिंग हळू हळू वालिया -लवकरच आम्ही तिला दारिद्र्य रेषेखाली आणणार आहोत.
सचिन तेंडूलकर - आयला.
राहुल गाँधी - मी तिच्या सेट वर जाऊन जेवण करणार आहे.

महाराष्ट्र माझा
धाकले ठाकरे - करून दाखवलं (ते कॅमेरा घेवून कुणाचे तरी फोटो काढायला गेल्याचं ऐकिवात आहे.)
राज ठाकरे - परप्रांतीयांचा आक्रमण आम्ही सहन नाही करणार, सडकून काढील एकेकाला, तिकडे विदर्भात पहा..... (आणि नंतर महाराष्ट्रीय अगम्य प्रश्न राखी सावंत यांना फोन गेल्याचा कळते )
दादा - एकदा सत्ता द्या मग दाखवतो...
सुशीलकुमार शिंदे -हायकमांड जसे सांगतील तसे करू. मी एक पट्टेवाला.........
मुख्यमंत्री - हायकमांड सोबत आज बैठक आहे. बैठकीनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

मानवतावादी कार्यकर्ते -
तिस्ता सेटलवाड - कपडे काढायचा हक्क तिला घटनेने दिला आहे, मी तिच्या पाठीशी उभी आहे.
ज्येष्ठ गांधीवादी - पूनम हि गांधीजींची शिष्य आहे, विदेशी कपडे काढून तिने तिच्या उच्च सामाजिक मुल्यांच दर्शन घडवलं आहे. मी तिला सुत कातायच शिकवणार आहे.

आम्ही - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले | तोची साधू मानावा, देव तेथेची जाणावा ||

आता होऊन जाऊ द्या. या लेखाचं वस्त्रहरण आणि तुमच्या प्रतिक्रियाही...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहे...........................
.

.
.
.पुनम चा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या जागी बसवावा..........खरे स्वातंत्र्य तिच उपभोगत आहे Happy

कल्पना सुंदर आणि डायलॉग्ज त्याहून

आता हेच मायबोलीला 'अ‍ॅप्लाय' करा

सर्वांनी हलके घ्यावे व प्रशासकांनी माफ करावे

=========================

मंदार जोशी - असल्या बायकांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे. हे चालतं वाटतं काँग्रेसला

========

जामोप्या - त्याचा पक्षाशी काय संबंध? संघवाल्यांनी पाहिलं नाही का तिला? Proud
=======

गा मा पैलवान -

जामोप्या,

'इथे' तुम्ही जे म्हणालात त्याबद्दल मी 'इथे' हे म्हणालो , त्यावर पूनम पांडेबद्दल 'इथे' जे लिहिले गेले ते 'इथे' कोणी वाचलेच नाही. त्याबद्दल तुम्हाला 'तिथे' काय म्हणावेसे वाटते?

आ न

गा मा

======

मास्तुरे - काँग्रेस पक्षाची नंगी धोरणे सिद्ध झाली (माझ्याशी सहमत असलेल्यांशी मी सहमत आहे)

======

किरण - फोटो टाका आधी

======

दिनेशदा - मी १९७६ युगांडाला असताना फूटबॉल मॅचनंतर एका तरुणीने असेच केले होते. तिला त्या संस्कृतीप्रमाणे शिक्षा झाली नाही.

======

डॉ. कैलास गायकवाड - ....'''''' पूनम पांडेचा फोटो'''''....

=====

मं जो - डॉक Angry तो ब्लर करा

====

डॉ.कैलास गायकवाड - फोटो काढून टाकलेला आहे. क्षमस्व

====

दामोदरसुत - पूनम पांडेला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला हवी

===

जामोप्या - ह्यांना पाण्याचा दुसरा रंग सुचतच नाही Proud

===

बेफिकीर - कोण पूनम पांडे?

===

ऋयाम - मागे मी तिचा फॅन क्लब काढला होता

===

बेफिकीर - कसा काय? तुम्हाला आधीच कळलं होतं आय पी एल नंतर असे होणार हे?

===

चिखल्या - चर्चा भरकटत आहे

===

महेश - इथे सर्व चर्चा भरकटल्याशिवाय रंगत नाहीत

===

राम - पूनम पांडेने नाहीतर काय खाकी अर्ध्या चड्ड्यांनी कपडे काढायचे का?

==

धागा बंद करण्यात येत आहे

=====================

बेफी लय भारी................ एक दोन नाव राहील पण यात.............झक्की साहेब राहीलेत... आणि भरत मयेकर साहेब सुध्दा .. Lol

आय्ला! मला कशाला चिकटवला मधे ? Proud चांगली मजा वाचत होतो लोकांची Rofl
लेख वाचला नाही अजून... बेफिकीरांचा प्रतिसाद तेवढा वाचला Lol

>> इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला.

हा द्रौपदीचा हीन उल्लेख आहे. ती समस्त हिंदूंना वंदनीय अशा पंचकन्यांपैकी एक आहे. तिचा असा उल्लेख होते योग्य नाही.

तसेच रामदेव बाबा, अण्णा हजारे हे देशाचे आदरणीय नेते आहेत. सामान्य जनतेसाठी धडपडणार्‍या लोकांची टिंगल करू नये असं मला वाटतं. देशद्रोह्यांची हवी तेव्हढी रेवडी उडवावी.

ही माझी वैयक्तिक मते आहेत.

-गा.पै.

देशद्रोह्यांची हवी तेव्हढी रेवडी उडवावी. >>>>>> हे ठरवणारे तुम्ही कोण......लंडन मधे बसुन तुम्हाला इथले देश द्रोही दिसतात ????????????????????? Uhoh

दक्षिणा - मुस्काड फोडून खडी फोडायला पाठवा तिला

झक्की - शिव शिव. आता शिव म्हणण्याचीही अडचण झालीय. शैव मतनुसार शिव म्हणावं का काय म्हणावं यावरही वाद. म्हणूनच मी भारतात येत नाही. इथे असे कोणी केले तर शेजारून जाणारा बघतही नाही.

भरत मयेकर - ,क्झद्क्झ्स्च्;इउ /अस्झ.कॉम या साईटवर बघा. स्वेच्छेने कोणी वस्त्रे उतरवली व भोवतालच्या जमावास ते आवडले तर त्याला शिक्षा नाही. मला कोणत्याही वादात पडायचे नाही आहे. मी फक्त माहिती पुरवली.

भुंगा - Rofl Biggrin Proud Rofl शाहरूख खानने काढले असते तर लेख आलाच नसता

कसले सही प्रतिसाद दिले आहेत मायबोली वरचे ID घेऊन बेफिकीरजीनी!!!

एक प्रश्न: ह्या पूनम पांडे म्हणजे कोण ? क्रिकेट चा उल्लेख आहे म्हणून वाटते Cheerleader Girl आहे का?

Cheerleader Girl आहे का >>>>>>>. हो फक्त तिला मैदानात येण्यास मनाई आहे Lol

चिखल्या : सोडलस रे मित्रा...( पण मिठी नाही !!)

बेफि, फक्त पुरुषांच्याच प्रतिक्रिया दिल्यात त्या.... "हा" काही "तो" धागा नाही.

अशोक -

सर्वश्री चिखल्या यांनी एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडलेली आहे. विनोदाच्या हळुवार शिडकाव्यातून त्यांनी आजच्या युगात घडत असलेले अश्लाघ्य सांस्कृतीक बदल प्रभावीपणे दाखवले आहेत याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. डोक्यावरून पदर खांद्यावर आला तर जीभ चावणार्‍या खानदानी स्त्रियांच्या कोल्हापूरमध्ये बसून हा लेख वाचताना व्यथित व्हायला होत आहे. श्रीमती पूनम पांडे यांनी जे देहप्रदर्शन केले त्यामागचा हेतू आणि त्या हेतूने केलेले कृत्य हे दोन्ही घृणास्पद आहेत. या व्यासपीठावर त्या कृत्यावर केली जाणारी टीका पाहून आजच्या पिढीतही संस्कृतीच्या बीजांनी स्वतःसाठी घट्ट अधिष्ठान निर्माण केल्याची जाणीव ही त्यातल्यात्यात सुखद. श्रीमती पूनम पांडे यांनी नेमके काय आणि का केले हे वाचावेसे वाटत नाही. मागे श्रीमती पद्मिनी कोल्हापूरे या मराठी व कोल्हापूरे असे आडनांव लावणार्‍या एका अभिनेत्रीने एक जाहीर चुंबन घेऊन महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली होती.

हा लेख वाचून विषण्ण मनस्थितीत रजा घेत आहे

- अशोक पाटील

Lol
.
.
.
.बेफी ....... एक स्वतंत्र धागा मायबोली साठी उघडाच आता......... Happy

आपल्या पद्मिनीआक्का कोल्हापुरे बाईंनी, युवराज चार्ल्स च्या गालाचे चुंबन घेतले होते ... आणि त्याच्या
गालावरची तिची लिपस्टीक शांतारामबापूंना आपल्या रुमालाने, पुसावी लागली होती... त्याची आठवण झाली..

बेफि, हि प्रतिक्रिया कुणाच्या नावावर खपवणार ते सांगा.

Pages