ललित

होळी

Submitted by bnlele on 7 March, 2012 - 08:58

केंव्हाची पेटली जनहिताची होळी
तेंव्हापासून शेकत आले नेतेच पोळी,
आता नवा डाव नवी खेळी.
दुसर्^या ची पाळी पण भांगेची तीच गोळी.
भ्रष्टाचाराची गंगा अन भिजली सामान्याची लाही,
कुणावर ठेवावी भिस्त?
एरवी असायची संध्याकाळी,
यंदा मात्र पेटली भार दिवसा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

होळी

Submitted by bnlele on 7 March, 2012 - 08:58

केंव्हाची पेटली जनहिताची होळी
तेंव्हापासून शेकत आले नेतेच पोळी,
आता नवा डाव नवी खेळी.
दुसर्^या ची पाळी पण भांगेची तीच गोळी.
भ्रष्टाचाराची गंगा अन भिजली सामान्याची लाही,
कुणावर ठेवावी भिस्त?
एरवी असायची संध्याकाळी,
यंदा मात्र पेटली भार दिवसा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

होळी

Submitted by bnlele on 7 March, 2012 - 08:58

केंव्हाची पेटली जनहिताची होळी
तेंव्हापासून शेकत आले नेतेच पोळी,
आता नवा डाव नवी खेळी.
दुसर्^या ची पाळी पण भांगेची तीच गोळी.
भ्रष्टाचाराची गंगा अन भिजली सामान्याची लाही,
कुणावर ठेवावी भिस्त?
एरवी असायची संध्याकाळी,
यंदा मात्र पेटली भार दिवसा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाव-बदल: हिंदु विवाह कायदा

Submitted by भानुप्रिया on 7 March, 2012 - 06:07

Hindu Marriage Act ह्या बद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत.

लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
मात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का?

म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का?

कायदेशीर बाबींमधील माहिती असणाऱ्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

आणि सोबत काही लिंक्स दिल्या तर सोन्याहून पिवळे!

धन्नो!

गुलमोहर: 

लीना - (जागतिक महिला दिना निमित्त)

Submitted by आशयगुणे on 6 March, 2012 - 08:26

दोन दिवसांपूर्वी रविवारी माझ्या बायकोने मला भाजी आणायला धाडले तेव्हा ती दिसली. चेहऱ्यावर हास्य आणि तिचा हात हातात धरून शेजारी चालणारा तिचा लहान मुलगा, हे नक्कीच एक सुंदर दृश्य होतं. गेल्या १५ वर्षात काहीच बदललं नव्हत. ती अजूनही तशीच आणि तितकीच सुंदर होती. ती एका भाजीवाल्याकडे जात असतानाच दोन बाईकस्वार कॉलेज तरुण तिच्याकडे बघत बघत पुढे गेले. शेजारी उभ्या बायका काहीसा मत्सर डोळ्यात साठवून तिच्याकडे बघत होत्या. १५ वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये हेच दृश्य तर घडत असे. आणि थोडं पुढे येताच तिने मला पाहिले. आश्चर्य, अविश्वास, आनंद हे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

गुलमोहर: 

त्रिवार अभिनंदन-मयुरी राळे!

Submitted by टोकूरिका on 4 March, 2012 - 22:38

व्यास क्रिएशन्स आयोजित निबंध लेखन स्पर्धेत मायबोली सदस्या मयुरी राळे यांनी लिहिलेल्या '' रम्य ते बालपण'' या विषयावरील निबंधास तृतीय पारितोषिक (रोख रूपये ११११/-) प्रदान करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! Happy

सर्व माबोकर हा निबंध http://vyascreations.files.wordpress.com/2012/02/mayuri-rale.pdf इथे वाचु शकतात.

गुलमोहर: 

लाभले आम्हास भाग्य (भाषा ४/४)

Submitted by Arnika on 1 March, 2012 - 03:32

जागतिक मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छांसह सप्रेम...

“तू आधीपासून शिकलीस मराठी म्हणून बरं आहे. पण आता मुलांना मुद्दाम शिकवण्याचा व्यावहारिक्दृष्या काही उपयोग नाही. आम्ही शिकवायचं म्हंटलं तरी आमच्या समाधानासाठी आणि अभिमान वगैरे जपण्यासाठी.” चारपाच पालक कार्यक्रमाच्या मध्यांतरात चहाचे घोट घेत मला म्हणाले. माझ्या मते त्यांचं म्हणणं शंभर टक्के खरं होतं आणि म्हणूनच मला त्याचा कुठेतरी त्रास होत होता. ज्या भाषेत आपण विचार करतो, ज्या भाषेने जग बघायचा एक नज़रिया दिला तिचा कुठेतरी ‘उपयोग’ नाही ही बोच फार सलत होती. मध्यांतर संपलं, आणि आम्ही ‘विविध गुणदर्शनाचे’ उरलेसुरले कार्यक्रम बघायला जागेवर बसलो.

गुलमोहर: 

एक संध्याकाळ "संतूर"लेली

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 1 March, 2012 - 02:02

संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ….. कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !!

संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर……. ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल …. ?

गुलमोहर: 

नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि शब्दाचा उगम...

Submitted by Arnika on 28 February, 2012 - 12:13

“अर्निका, यावर्षी नाचात मानाची जागा तुझी.” ग्रीक नाचाच्या रंगीत तालमीत आमचा रिंगमास्टर पानोस म्हणाला. “मंचावर तू मधोमध असणार आहेस. स्तो केंद्रो!” मी स्तब्ध होऊन बघत राहिले. पानोस माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, “आम्हाला सगळ्यांनाच वाटतं तू मधोमध असावंस.”
चावीचं खेळणं चालावं तशी चालत चालत मी मधोमध उभी राहिले.

एकदा नाच झाल्यावर पानोसला विचारलं, “तू मधोमध ला काय ग्रीक शब्द वापरलास?”
“केंद्रो. नवीन आहे नाही का हा शब्द तुला?”

गुलमोहर: 

मना घडावी संस्कार !

Submitted by यशू वर्तोस्की on 27 February, 2012 - 04:50

संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित