ललित

त्याचे असे झाले... भाग ७

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 05:02

कामाचे काही विशेष नव्हते, बरखाला भेटावे की नाही याचाच विचार करत मी यांत्रिकपणे इ-पत्रांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होतो. पण सुदैवाने लौकरच मला बहु-कर्मे (multi-tasking) करता येत नाहीत याची जाणीव झाली आणि मी अंक-उच्च मिटून ठेवला.

बरखाला भेटण्यातल्या अडचणींचा मी प्रामुख्याने विचार केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझे मालूशी लग्न झाले आहे आणि बरखा पंजाबी आहे या दोन्ही गोष्टींपैकी एखादीही बदलणे माझ्या कुवतीबाहेरचे होते. तेव्हा काय करायचे ते संपूर्णपणे मलाच ठरवायचे होते. केव्हातरी असा 'हान तू' छाप निर्णय घ्यावाच लागतो. आणि हीच ती वेळ होती. मी जाण्याचे ठरवले.

गुलमोहर: 

त्याचे असे झाले... भाग ६

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 05:00

हुश्श करून बसलो खरा, पण त्याच वेळेस दोन गोष्टी मला अचानक जाणवल्या. एक म्हणजे आतून काहीतरी आवाज येत आहेत. आणि दुसरे म्हणजे बसताना मला काहीसे अडचणीचे वाटत आहे.

गुलमोहर: 

त्याचे असे झाले... भाग ४

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 04:57

ढाराढोरी घुर्घुरायते....

माणसाने बेडकाच्या मेजवानीची स्वप्ने बघितली तर ताटात झुरळसुद्धा येत नाही. त्यामुळे कलिंगडाच्या वाळलेल्या बियांचेच स्वप्न पाहावे, म्हणजे जे ताटात येईल ते गोड भासते अशी एक चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. तत्प्रमाणे मी 'दीड तासाची झोप' अशा कलिंगडाच्या वाळलेल्या मूठभर बियांचे स्वप्न पाहिले. त्यातल्या बऱ्याचशा बिया मिळाल्या. काही हुकल्या. पण त्या खवट निघाल्या असत्या असे स्वतःचे समाधान करून घेतले.

गुलमोहर: 

त्याचे असे झाले... भाग ३

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 04:55

तो दूरध्वनी घ्यायला गेलो आणि सगळे जागरण नेमके त्या क्षणीच अगदी अगदी अंगावर आले. कडाडून जांभई देतच मी दूरध्वनी उचलला. जांभई पूर्ण होण्याची वाट का पाहिली नाही? प्राक्तन बरे हे, प्राक्तन.

"हॅलो, मी बोलत्येय....... मी, (इथे माझी जांभई संपली) तुझी बायको.... लग्न झालंय तुझं... आठवतं का?" अत्यंत हळू, समजावणीचा स्वर. तुम्हाला जर पाच वर्षांच्या कोणाला रेषीय बीजगणीत (linear algebra) शिकवायची वेळ आली तर तुमचा काय स्वर आणि बोलण्याचा वेग असेल तसा अगदी. फक्त त्यात 'आंबटपणा' चेपून भरलेला.

गुलमोहर: 

त्याचे असे झाले... भाग २

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 04:50

तर मी उठलो.

हे थोडेसे लाक्षणिक अर्थाने घ्यावे. डोळेमिटल्या अवस्थेत दिवा न लावता आपल्या घरात तीन फुटांच्याहून कमी उंचीच्या कायकाय गोष्टी आहेत त्याचा स्वतःच्या पायाची नडगी वापरून शोध घेणे म्हणजे 'उठणे' म्हणायचे असेल तर हरकत नाही.

शेवटी तीन छोटी स्टुले (त्यातले एक दोनदा), एक खुर्ची (या गोष्टी झोपायच्या खोलीत हव्यातच का?) आणि एक पलंगाखाली ठेवलेला पेला (तो मीच ठेवला होता) इतक्या गोष्टी 'शोधून' झाल्यावर अखेर डोळे उघडले. मग पुढची नैमित्तिक कृत्ये फारसा घोळ न घालता पार पाडली.

गुलमोहर: 

त्याचे असे झाले...भाग १

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 04:43

च्यायला आजचा दिवसच असा कसा उगवला होता देव जाणे. किंबहुना उगवण्याआधीच त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती.

कालचा दिवस कार्यालयात 'प्रकल्प व्यवस्थापक' (Project Manager) या बिरुदाबरोबर येणाऱ्या डोकेदुख्या (अनेकवचन बरोबर नसेल, पण भावना जाणून घ्या) मिटवण्यात गेला. आणि हे सगळे (कधी नव्हे ते) वेळेत पूर्ण करून 'संध्याकाळी घरी लौकर येण्याचा' सनातन वायदा पूर्ण होण्याचा इरादा दिसायला लागताच वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक नावाचा असुर जागृत झाला.

गुलमोहर: 

वाक्यात उपयोग (भाषा १/४)

Submitted by Arnika on 15 February, 2012 - 11:58

भाषा...म्हणजे आपली एक ओळख!
कानी येणारे आवाज, अर्थांचे भास
तोंडचा प्रत्येक शब्द, आणि प्रत्येक श्वास
भावनेचा आकार, शाईचं ओलं वळण;
काना,मात्रा,रफारांचं अर्थवाही वजन.
नाम, विशेषण, क्रियापदे, कविता आणि म्हणी;
खोदाल तितक्या खोल खोल विचारांच्या खाणी...
मौन, वाचन, कथन; परेपासून वैखरी
हृदयांच्या हृदयांशी भेटी उराउरी...

गुलमोहर: 

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते - [५]

Submitted by दामोदरसुत on 14 February, 2012 - 12:46

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते - [५]

गुलमोहर: 

शब्देविण संवादिजे........

Submitted by मनस्वि on 14 February, 2012 - 06:32

निमित्त होत घसा खराब व्हायचं! त्यातून बरेच साक्षात्कार झाले. घसा इतका बिघडला कि बोलणच बंद झाल. मग सुरु झाल्या खाणा-खुणा. घरातले सगळे मला चांगलेच ओळखून असल्याने त्यांना मला काय म्हणायचे आहे ते लगेच कळत होते. त्यामुळे कम्युनिकेशनचा त्रास झाला नाही. पण बोलण कमी झाल्याने आपोआपच मन अंतर्मुख झाले. आणि मी परिस्थिती एन्जोय करायला लागले. गरज असेल त्याच्याशीच बोलायचे इतरांसाठी कारण होतेच कि घसा बसलाय ते!
.......................
..........................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - ललित