ललित

सूर तरंगाची त्रिवेणी - 'तबला सतार आणि जलतरंग'च्या जुगलबंदीची पर्वणी

Submitted by किंकर on 22 April, 2012 - 23:42

यंदा एकूणच कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावर बर्फाची पांढरीशुभ्र शाल लपेटून थंडीने आपला मुक्काम ठेवलाच नाही असे वाटले.माहेरी खूप दिवस राहयचे असे ठरवून आलेली नव परिणीत वधु जसे लगेचच पुन्हा सासरी निघते, त्याप्रमाणे कडाक्याच्या थंडीने थोडा लवकरच काढता पाय घेतला. चैत्र पालवी हळूहळू उमलू लागली आणि त्याच बरोबर पुढील चार/सहा वीक एन्ड्सना काय काय करायचे याचे मनसुबे रचले जाऊ लागले. पण हा हवामानातील बदल आणि एप्रिल मध्येच थंडीचे एप्रिल फुल ,यामुळे महिन्याच्या उत्तरार्धातील पहिलाच वीक एण्ड इतका आनंददायी ठरेल, याची आम्हा टोरोंटोवासियांना जराही कल्पना नव्हती.

गुलमोहर: 

बाबा नसताना...

Submitted by सुमेधा आदवडे on 22 April, 2012 - 11:54

मानवाच्या जन्मापासुन सर्वप्रथम त्याच्याशी निगडीत अशी सर्वात सशक्त आणि प्रभावी सामाजिक संस्था जर कुठली असेल तर ते त्याचं ’कुटुंब’. रक्ताच्या,लग्नाच्या किंवा दत्तक ह्या नात्यांनी एकत्र किंवा विभक्त पद्धतीने राहणारी माणसे ही ’अमुक-अमुकचे बाबा’ किंवा ’अमुक-अमुकच्या आत्याची मुलगी’ या व अशा नात्यांनी ओळख पटण्यापलिकडेही एकमेकांशी जोडली गेलेली असतात. पण जागेची निकड,व्यवसाय-नोकरी,शिक्षण किंवा रोज नव्याने येणारे जुनेच मतभेद या व अशा अनेक कारणांमुळे हल्ली विभक्त कुटुंब जास्त पहायला मिळतात.

गुलमोहर: 

डॉक्टरेट इन भ्रष्टाचारालॉजी

Submitted by दामोदरसुत on 22 April, 2012 - 07:49

डॉक्टरेट इन भ्रष्टाचारालॉजी (कोठल्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराचे शास्त्र)

भ्रष्टारालॉजी विषयात डॉक्टरेट घॆण्यासाठी एकाने विद्यापिठाकडे अर्ज करतांना जोडलेले विषयाचे सिनॉप्सिस:
कुप्रसिद्ध भ्रष्टाचारी होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या नवोदितांसाठी गोत्यात आल्यास सुटण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा वस्तुनिष्ठ अभ्यास (सिनॉप्सिस)
(पीएच्डी च्या विषयाचे नाव लांबलचक असल्याशिवाय अर्जच घेतला जात नाही)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सूररात्र

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 19 April, 2012 - 02:55

रात्रीचे सव्वा नऊ वाजले आहेत. ऑफिसमधून येऊन दमून जेऊन मी असच घड्याळाची टिकटिक ऐकत आहे. छान वाटते ऐकायला. आता झोपायचं. पण दोन-तीन दिवस डोक्यात काहीतरी चालूच असत, ते मग ती शांत टिकटिक ऐकू देत नाही. बरेच दिवस गेलो नाही. आपोआप अंगावर कपडे चढवले जातात. चावी घेऊन जिन्यावरून रस्त्यावरून घूssघुss, हॉर्न, सिग्नल, काय वाट्टेल ते सव्वा नऊ नंतर एव्हडी गर्दी! पण सवयीच्या रस्त्यांवरून दोन्ही बाजूंची दृश्ये चपापत शेवटी मी त्या वास्तूच्या आवरत शिरतो. पार्किंग रिकामच असत.

मग तिकीट खिडकीपाशी पोचतो, प्लान सगळा रिकामाच आहे.
‘धी व्होल वावर ईज आवर!’ - मी.
एक तिकीट बरोब्बर मध्यभागी दोनशे रुपये.

गुलमोहर: 

आसक्ती

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 19 April, 2012 - 02:37

जवळपास गेला महीनाभर मी नेट पासुन दूर होतो. आज आलोय, पुन्हा आपल्यात आल्यासारखं वाटते. खरीगोष्ट म्हणजे आपण अजुनही एकमेकांना पाहीलेले नाही. परंतु मायबोलीने म्हणा किंवा आपल्या सारख्या सहकार्‍यामूळे एवढी आसक्ती झाली आहे की दिवसभरात किती तास आपण वा मी नेटवर घालवत आहोत कळत नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रात्र

Submitted by एडी on 18 April, 2012 - 03:06

एक काळोखाचा आविष्कार...

रात्र तस पाहायला गेल तर एक संपलेला दिवस...

पण ती खर तर एका नव्या दिवसाची सुरुवात असते..

काही रात्री कुणाच्या आठवणीत बुडालेल्या...तर काही मदहोश करून टाकणाऱ्या...

काहींना आवडतं रात्रीत बुडून जायला...त्यातलाच मी एक....

दिवसापेक्षा मी खर तर रात्रीची वाट पाहत असतो... दिवसभराच्या धकाधकीतून एक रात्रच आपली असते जी आपली हक्काची वाटते...

ना कुणाला प्रश्न विचारण...कि ना कुणाला उत्तर देण...

काळोख असा एन्जोय करावा असा...

आपल्याशी संवाद साधण्याची अचूक अशी वेळ...

आपण काय केल... काय करणार आहोत...साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तुम्हाला...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मौसिकीसे मुहब्बत - फरहान

Submitted by दाद on 18 April, 2012 - 02:34

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात अन अक्षरश: अगदी थोडक्याच वेळात जातातही. एखादा झरा थोडकाच काळ का असेना पण रानातही वाहिला की आपली खूण ठेऊन मगच सुकतो... आजूबाजूची झाडं, वेली... त्याच्या नुस्त्या आठवणींनीही कातर-हिरवी होतात. माथ्यावरलं एरवीचं निरभ्रं आभाळ अभ्रं होऊन झुकतं.... कुठं एखादं पाणथळ अजून असेल थरथरत.... त्यात का होईना, पण डोकावेन क्षणभर....
थरथरणार्‍या धुरकट बिंबातही.... आठवणी मात्रं किती नितळ, ताज्या असतात.

फरहान!

गुलमोहर: 

काही गोष्टी ज्या केल्याच पाहिजेत

Submitted by मोहन की मीरा on 17 April, 2012 - 01:13

आपण कळत नकळत अनेक गोष्टी करत असतो. काही समजुन काही नकळत पणे. पण काही गोष्टी "मस्ट" विभागात मोडतात. की ज्या केल्याच गेल्या पाहिजेत. मी माझ्या परीने वर्गीकरण केले आहे.

रोज करायच्या गोष्टी.

१. तुमच्या आई वडिलांशी बोला. मुलांशी बोला. जोडीदाराशी बोला. काहितरी हितगुज करा.
२. तुमचा ज्याकोणावर विश्वास आहे त्यांची मना पासुन प्रार्थना करा.
३. लवकर उठा, पटकन आवरा आणि आपल्या कामाला लागा. काहीच काम नसेल तर सुंदर पुस्तक वाचा.
४. रोज आपल्या आयुष्या बद्दल सकारात्मक स्वप्न पहा.
५. नीदान आर्धातास चाला. कधीही. कुठेही. पण नक्की चाला.

गुलमोहर: 

माऊली अन् मोगरा

Submitted by श्रीकांत काशीकर on 13 April, 2012 - 08:47

चैत्र - वैशाख म्हटलं की कैरीचं पन्हं, आंब्याची डाळ, हरबऱ्याची उसळ या साऱ्या गोष्टी आठवतात. तसाच मोगराही आठवतो. मोगरा म्हणजे वसंत ऋतू. वसंत म्हणजे यौवन, अर्थात शृंगार. पण मग विरागी वृत्तीच्या ज्ञानेश्वरांनी "मोगरा फुलला... " असं का म्हटलं ? त्यांना मोगरा का आवडला?

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित