मना घडावी संस्कार !

Submitted by यशू वर्तोस्की on 27 February, 2012 - 04:50

संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले. माणुसकी, प्रेम ,दया ,भक्ती ,आपुलकी आणि त्याग हे संस्कार कालातीत ठरले आणि ज्या संस्कारांचा उगम दररोजच्या जगण्याच्या प्रक्रियेतून झाला ते संस्कार व्यक्ती आणि समाजानुरूप बनले आणि वेळोवेळी बदलालेही गेले. धार्मिक संस्कारंचे अश्या बाबतीत उदाहरण घेता येईल. त्या मुळे संस्कार देणे ही प्रोसिजर नसून ती अव्याहत पणे घडत राहणारी प्रोसेस आहे. यात आजूबाजूच्या वातावरणाचा खूप प्रभाव पडतो . आपल्या मुलांच्या शाळेत , मित्रांबरोबर , नातेसंबंधातून, आजूबाजूच्या समाजामधून त्यांच्यावर कळत- नकळत बरे वाईट संस्कार होतच असतात. त्यालाच आपण कदाचीत वाईट संगत लागणे म्हणतो . पण घरात होणारे संस्कार त्यांचं काय ?

आता हेच बघा ना आजच्या जगात आपल्या वाढलेल्या अपेक्षा ,लोभ यातून आपणच .... "कोणत्याही मार्गाने मार्क्स मिळवणे आणि पुढे जावून कोणत्याही मार्गाने पैसा मिळवणे अश्या पद्धतीचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करतो आहोत. मग पुढची पिढी बिघडली अशी ओरड करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला उरला आहेच कुठे ? किती घरांमधून मुलांपुढे "अंबानी" किंवा " मल्या " ऐवजी " डॉ. अभय बंग ,बाबा आमटे किंवा अण्णा हजारे यांना आदर्श मानायचे संस्कार दिले जातात ? मुलांवर होणाऱ्या संस्काराची चर्चा करीत असताना आपणच आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या पुढे कोठले आणि कसले आदर्श ठेवत आहोत याचा विचार करण्याची खरं तर वेळ आली आहे.

कोवळ्या वयातील मुलांचे मन म्हणजे जणू ओळी मातीच असते आणि या मातीचा आकार आपण देवू तसा घडतो . त्या मुळे पैशाकरता काही "वेगळे मार्ग " न अवलंबता फक्त गरजे पुरताच पैसा कमावणे ......आपल्या भोवतालच्या लोकांशी आपुलककीने वागणे .....मृगजळाच्या मागे न धावता ....छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख मिळवणे , आणि मुख्य म्हणजे मानवता हीच जात आणि मानवता हाच धर्म पाळणे असे कालानुरूप संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करायला हवा.

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार ...विठ्ठला तू वेडा कुंभार.

यशोधन वर्तक

गुलमोहर: 

आता हेच बघा ना आजच्या जगात आपल्या वाढलेल्या अपेक्षा ,लोभ यातून आपणच .... "कोणत्याही मार्गाने मार्क्स मिळवणे आणि पुढे जावून कोणत्याही मार्गाने पैसा मिळवणे अश्या पद्धतीचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करतो आहोत. >> हे खूप स्वीपिन्ग जनरलाइझेशन आहे. इथे माबोवरच मुलांवर जाणीव पूर्वक चांगले संस्कार करणारे जागरूक पालक आपल्याला भेटतील. उत्तम पालकत्व व संस्कार मिळालेली एक जाणती पिढीही इथे कार्यरत आहे. लेख जरा अर्धा वाट्तो आहे. पुढील भाग अ‍ॅड करायला हवा. शुभेच्छा.

अश्विनिममि
नक्किच असेअपालक मझ्याआजुबाजुला देखिल आहेत . पन दुर्दैव हे कि त्यन्चि सन्ख्या खुपच कमि आहे.
अपन असे चुकिचे सन्स्कार जानुन बूजुन करित नसतो परन्तअपापल्याहि नकलत असे सन्स्कार अपल्यच वागन्यतुन घदत असतत. कधि कधि तर आपल्या पुधे हि दुसरा पर्याय नसतो . सद्यच्या चधा ओधिच्या जगात अपन देखिल परिस्थितिचे गुलाम बनलेले असतो . परन्तु यचि जानिव आप्ल्यला असवि एवधिच इच्छा आहे !

कलावे लोभ असवा !
यशोधन.