ललित

सायकल कुठली घ्यावी...???

Submitted by आशुचँप on 9 February, 2012 - 08:57

कॉलेजची वर्षे संपून जवळ जवळ एक तप संपले. कॉलेज जीवनाच्या काही आठवणी धूसर झाल्या तश्याच आपण एकेकाळी सगळीकडे सायकलनी जात होतो याची जाणीवदेखील पुसट झाली. आणि इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा सायकल चालवण्याच्या इच्छेने उसळी घेतली.
सायकल चालवल्याने फिटनेसपण राहील, सुटलेले पोट कमी होईल आणि पेट्रोलचा खर्चही वाचेल असा तिहेरी हेतू मनाशी बाळगत सायकलच्या दुकानात पोहचलो. जरी कॉलेज संपून १०-१२ वर्षे झाली असली अजूनही मन त्याच काळात होते. त्यामुळे मस्तपैकी २-३ हजार घालून एक चांगल्यातली सायकल घ्यावी असे म्हणतोय तोच पहिल्या सायकलने दणका दिला.
किंमत १२,०००.

गुलमोहर: 

सखा

Submitted by चिमुरी on 9 February, 2012 - 06:06

पहिल्यांदा ४थी त असताना अलिबागला भेटला.. बघुनच जाम घाबरले होते.. पायाखालची जमीन सरकत नसली तरी वाळु सरकलेली जाणवत होती आणि ती जाणीव आजही तितकीच ताजी आहे.. बाईंनी हात घट्ट धरुनही माझी बाहेर पडायची धडपड आठवली की अजुनही हसु येतं की.. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट वगैरे काही नसतं हो.. ओहोटी लागल्यावर रेतीतुन चालत जावुन केलेला किल्ल्यात प्रवेश.. किल्ला मात्र जाम आवडला आपल्याला.. पण नंतर भरती यायला लागली म्हणुन जीव खावुन पळत गाठलेला किनारा.. अजिबात न आवडलेला तो खारट चिकटपणा..

मधे अधे केव्हातरी झालेली कोकण ट्रिप पण तेव्हाचा अजिबात न आठवणारा तो..

गुलमोहर: 

सारासार विचार करण्याची कुवत

Submitted by शुभांगी. on 9 February, 2012 - 00:41

"अरे, तुला काय शिव्या दिल्या की मारलं मी इतकं रडायला?" तो ड्रायव्हर बाकिच्या मुलांच्या स्कुलबॅग्ज व्यवस्थित रचत त्या मुलाला विचारत होता. मुलाचं हुंदके देऊन टिपं गाळणं सुरुच होतं. बाकीचे चिडीचुप, काही बोललं तर दादा आपल्याला पण ओरडेल म्हणुन. मुलांचा वयोगट ५-११ मधला आणि ड्रायव्हरही पंचविशीतला. नेहमीपेक्षा जरा चढलेला आवाज ऐकुन आजुबाजुचे पालकही जमले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वेदर...वेदर!!

Submitted by प्राजु on 8 February, 2012 - 22:12

"इफ़ यू डोन्ट लाईक द वेदर .. वेट फ़ॉर सम टाईम" असं म्हणतात कनेटिकटमध्ये. इतका प्रचंड लहरी निसर्ग आहे इथला. २००६ च्या मार्च -एप्रिल मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा इथला स्प्रिंग चालू होता. हलकी गुलाबी थंडी होतीच मात्र बर्फ़ नव्हतं. गवतामधून पिवळी धमक डॅंडीलायन्स हळू हळू डोकावू लागलेली. झाडांच्या खराट्यांवरती नाजूक इवली इवली पालवी कळ्यांच्या रूपाने दिसू लागलेली.... नकळत भारतातल्या निसर्गाशी तुलना होत होती. मात्र धोधो पडलेला पाऊस पाहिला आणि मग वाटलं, असा केव्हाही कसा काय पाऊस पडू शकतो!! पण हो... इथे तेच होतं.

गुलमोहर: 

पिकनिक

Submitted by नीतु on 7 February, 2012 - 23:51

जागतिक महिला दिनानिमित्त सोसायटीची पिकनिक मी arrange करतेय, तेव्हा आपल्याला कोणाला महिलांसाठी पिकनिक मध्ये खेळता येणारे खेळ माहिती असल्यास जरुर कळवावेत.

गुलमोहर: 

शांततेचा सूर...

Submitted by स्मितागद्रे on 6 February, 2012 - 22:25

"बस एक चुप सी लगी है, नही उदास नही" सन्नाटा चित्रपटातल हे गाणं परवा अगदी अचानक पणे रंगोलीत ऐकायला मिळालं. रंगोलीत अधून मधून अजून ही बर्‍यापैकी जुनी हिंदी गाणी लावतात. कधी कधी अस अचानक ऐकायला मिळालेल आवडीच गाणं, मुद्दाम ठरवून ऐकलेल्या गाण्यांपेक्षाही जास्त आनंद देऊन जातं तसच काहीस झाल.

गुलमोहर: 

श्रद्धा

Submitted by sabha on 5 February, 2012 - 04:27

श्रद्धा

"श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा.

पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ? माझ्यामते श्रद्धा म्हणजे यापैकी काहीच नसाव.

गुलमोहर: 

पाऊस.. तुझा माझा ( स्फुट )

Submitted by Kiran.. on 4 February, 2012 - 22:42

पाऊस.. तुझा माझा
---------------------------

मुसळधार पाऊस..
गुलजारच्या सिनेमामधला
आपण उभे वळचणीला एका पडवीत
भिजायचं का ?
या प्रश्नावर तुझा नकार असणार..
माहीत असतं,.. मलाही नि तुलाही
पावसाने झालेली नजरबंदी, दमून जमिनीवर टेकलेलं आकाश..दिसू देत नाही..
त्या क्षितिजरेषेपाशी धरेला कुजबुजत दिलेलं वचन हिरवंगार होऊन फुलतं
नजर तुझ्या टिकलीपाशी स्थिरावते..नकळतच
या विश्वासाला मी ही जपलंय
खरंचच...!
कुठुनतरी गाण्याची लकेर हवेवर तरंगत येते
छोटीसी कहानी से.. बारीशों के पानी से... सारी वादी भर गयी
आणि मनात नाजूक घंटा किणकिणतात

तेव्हाही पाऊस असाच असतो.. मुसळधार

गुलमोहर: 

गौरी

Submitted by लंपन on 4 February, 2012 - 13:45

आश्विन पौर्णिमेची वाड्यात धूम असायची. सर्व 'ज्येष्ठ' मुला-मुलीना घरी आणि शेजारीपाजारी काही ना काही 'अश्विनी' मिळायची. दिवेलागणीच्यावेळी आम्ही सगळी 'नकटी' धाकटी दादा तायांच्या मागेमागे या घरातून त्या घरात, या वाड्यातून त्या वाड्यात...'अश्विनी' सुद्धा काय तर एखादी वही, पुस्तक, बिस्कीटचा पुडा असले काहीबाही.. सर्वात आधी घरी आई गौरीला ओवाळीत असे आणि हमखास एखादा ड्रेस 'अश्विनी' म्हणून देई. वाड्यातल्या अंधार्‍या खोल्यात निरांजनातल्या दिव्याने आई आणि बहिणीचा चेहरा उजळून निघे, उपडी मांडी घालून ईतर चिल्लर पार्टी तो सोहळा एकटक बघत बसायची... मग शेजारच्या दादा तायांना आई ओवाळी आणि छोटीशी भेट देई..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित